मार्ग वेगळे आपले तरी थोडी सोबत करूया त्या तिथल्या नाक्यावर मग वेगळे होऊया ... आश्चर्याने साधर्म्याच्या आवडीची गाणी म्हणूया कवी अन लेखक यांच्यावर मग उतार्यातून बोलूया ... नाका नकोच यायला, आज असेच भटकत राहूया तुझा थोडा , माझा थोडा वेळ सहज चोरूया ... मार्ग वेगळे कशाला, जर एकाच जागी जायचय तुझे - माझे विश्व आता एकत्रच तर फ़ुलायचय...
सुचेल ते, रुचेल ते, दुखेल ते, खुपेल ते.. Random Mindnotes..