रात्री पिक्चर बघत बसले होते , ' गुडबाय ख्रिस्तोफर रॉबिन ' आणि मी शर्यंत लागल्यासारखी धावत फेसबुकवर लिहून टाकणार तोपर्यंत पिकलपोनीचा फोन . आवाजात सर्दी , खोकला , " हॅलो , मी पिकलपोनी बोलतेय." तोपर्यंत दादू तिच्याकडून फोन घेत म्हणाला "अगं रमाताई तू जरा ये घरी." मी म्हणाले , " का रे अचानक ? खरंतर मला यायचं असतं , पण राहून जातं.." , दादू म्हणाला , " हे बघ , आम्ही ४ मंडळी सायकलवर मावणार नाही गं , गाडी घेऊन ये.". मला काही कळेना. " चौघांना जायचंय कुठं खरं ?". पण मग " डॉक्टरांकडे जायचंय." एवढं ऐकताच मी पटकन निघाले. पोहोचते तर बघते काय ? सगळे बाहेर. दादू , पिकू मरगळून उभे. ” डॉक्टर आत्त्यांकडे गेल्यावर त्यांना तपासून , काही फिल्म्सची यादी , खेळ , पत्रलेखन वगैरे औषधं लिहून त्यांना बाहेर बसायला सांगून डॉक्टर आत्यांनी मला थांबायला सांगितलं. मला बसवून बोलायला लागल्या, " रमा , तू लिहून यांचं जग , पिकलवर्ल्ड बाहेर , आपल्या जगात आणलंस. पण त्यांना कायमचं इथे वास्तवात आणायची ही कसली धडपड ? राहू दे की त्यांना पिकलवर...
सुचेल ते, रुचेल ते, दुखेल ते, खुपेल ते.. Random Mindnotes..