Skip to main content

Posts

Showing posts with the label लेख

'भाई : व्यक्ती की वल्ली' - आकाश व्यापणारी असामी

पुलंचं बायोपिक म्हणजे अक्षरशः अशक्य वाटलं होतं. पण  टीजर आवडला आणि काहीही झालं तरी बघायला जायचं हे ठरवलंच होतं.  घरी पु.लविषयक काहीही म्हणजे 'घरचं कार्य', त्यामुळे खोकला, कणकण,  निर्माता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हे सगळे प्रॉब्लेम असूनही फर्स्ट डे फर्स्ट शो ला गेलेच. आणि सोबतीला मंडळीही तगडी. सगळ्यांनी भाई, भाईकाका जवळून पाहिलेले, अनुभवलेले अशी माणसं सोबत घेऊन सिनेमा पाहिला. एखादा माणूस आवडता कलाकार किंवा पब्लिक फिगर म्हणूनच नाही तर जिव्हाळ्याचा विषय म्हणून त्याच्यावरील चित्रपट पाहण्यासाठी आले खरंतर. चित्रपटाचं कास्टिंग चांगलं झालं आहे. सागर देशमुखचा खरेखुरे पु.ल साकारण्याचा प्रयत्न अगदीच कौतुकास्पद आहे. अगदीच कमाल. तसेच इरावती हर्षेनी तरुणपणीच्या सुनीताबाईंच्या भूमिकेत अप्रतिम काम केले आहे. पुलंचं बालपण ते तरुणपण या चित्रपटात उलगडून दाखवण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. त्यांची वैविध्यपूर्ण शैली, भाषेवरचं प्रभुत्व, निकोप, मार्मिक विनोद याचा प्रत्यय पावलोपावली येतो. यातले सगळे प्रसंग आधी लिखित, ऐकीव स्वरूपात असूनही कंटाळा असा कुठे येत नाहीत. पुलंचे विनोद, कि...

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

अपूर्व प्रकाशवाटा

आज एका अलौकिक, कल्पनातीत कलाकृतीचा आस्वाद घ्यायला मिळाला. महाकवी, कविकुलगुरू कालिदास यांची महान कलाकृती 'मेघदूत' आजवर अनेकांनी बसवलेली आहे, पण आजचा प्रयोग नावाप्रमाणेच 'अपूर्व मेघदूत' होता. एक अद्भुत नाट्यप्रयोग. द्रुष्टीक्षीणतेपासून, दृष्टिहीनतेपर्यंत अंधत्त्वाचे भिन्न प्रकार असलेले १९ प्रतिभाशाली अंध कलाकारांनी सादर केलेला नाट्यप्रयोग. गणेश दिघे यांचे लेखन असलेले हे दोन अंकी नाटक बसवले होते स्वागत थोरात यांनी. त्यांच्या बद्दल वेगळ्यानेच लिहायला हवे. पण कोल्हापुरात  'रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, मिड टाऊन' आणि 'सावी फाउंडेशन' यांनी हा प्रयोग घडवून आणला होता. प्रत्येक माणसाला व्यक्त व्हायचं असतं, त्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळी अभिव्यक्ती साधने निवडतो. तशीच ही अंध मंडळी. यांना नाटकाद्वारे आपली कला सादर करायची होती. महाराष्ट्राच्या विविध भागातून शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी पुण्यात असलेल्या अशा या मुलांना एकत्र घेऊन हे नाटक बसवलं गेलं आहे. आपापली कामे, शिक्षण सांभाळत ही मुले नाटक करत आहेत. आणि नाटक करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडून आले आहेत असे ते ...

कासव- माझ्या नजरेतून

सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटासाठी दिल्या जाणार्‍या सुवर्णकमळासह अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांत पारितोषिक पटकावणारा 'कासव' मी आज पाहून आले. माझे आवडते दिग्दर्शकद्वयी सुमित्रा भावे, सुनील सुकथनकार यांची अजून एक अप्रतिम कलाकृती. गेले काही दिवस मी पाहत असलेले चित्रपट हे खास 'माझ्यासाठी' बनवलेले आहेत, असं मला वाटतंय. त्यातला आशय, विषय, रचना, घटना हे माझ्याशी संबंधित असल्यासारखंच वाटतंय. (काही दिवसांपूर्वी 'बापजन्म' आणि आज 'कासव'), इतके की काही घटना आणि संवाद माझे आणि माझ्या आसपासचे असावेत असं वाटतंय. केवळ माझ्या मनात हा पाहून काय आलं, तेवढं लिहितेय नेहमीसारखं. 'नैराश्य' ही एकच थीम नाही या चित्रपटाची. माणूस हा समाजशील प्राणी आहे. आणि तरीही त्याला कधी कधी एकटेपणा हवासा वाटायला लागतो आणि या दोन परस्पर विरोधी प्रकृतीचा समतोल साधणं, हेच त्याचं जीवन आहे. कासवांसारखं तो कवचात जाऊन जगापासून स्वतःला फार काळ वेगळं ठेऊ शकत नाही. पण दुःख आत ओढून घेऊन बाह्य जगाला सामना करणं मात्र तो शिकतो.या समुद्री कासवांचं जीवनचक्र अगदी नवल वाटावं असं.. ...

स्मृतिगंध लिसनर्स क्लब- राग यमन आधारित गीते

स्मृतिगंध लिसनर्स क्लब च्या या महिन्याची थीम होती 'राग यमन' वर आधारित गीते. राग यमन,  अतिशय लोकप्रिय आणि अतिशय मोठा आवाका असणारा. शास्त्रीय संगीत शिकणार्यांना सर्वाना पहिल्यांदा शिकवला जाणारा राग. हा जरी प्रथम शिकवला जाणारा राग असला आणि वरवर सोपा वाटत असला तरी त्यात 'Deceptive simplicity' आहे. संध्याकाळ चा राग असला तरी तरी कुठल्याही वेळी सादर केला जाणारा राग. शांत राग असला, तरी ही गंभीरता नसलेला, आल्हददायी शांती रस असणारा असा यमन राग. कार्यक्रमाची सुरुवात झाली या रागातील अत्यंत लोकप्रिय पारंपरिक चीज ' ए री आली पिया बिन' ने.  नंतरचे गाणे होते 'चितचोर' चित्रपटातील 'जब दीप जले आना'. अमोल पालेकर, झरीना वहाब सारख्या  कलाकारांच्या करिअरला झळाळी देणारा असा हा एक मिडल रोड सिनेमा. येसूदास आणि हेमलता यांच्या आवाजात असलेले हे गाणे, संगीतकार रवींद्र जैन यांनी संगीतबद्ध केलेलं. रवींद्र जैन हे दृष्टीहीन होते. 'जब दीप जले आना' म्हणजे काय हे त्यांना कसे काय कळले असेल? येसूदास यांना केरळ मधून हिंदी चित्रपट सृष्टीत आणण्याचे काम ही त्यांनीच केल...

स्मृतिगंध लिसनर्स क्लब- 'अनोखे बोल'

'स्मृतिगंध लिसनर्स क्लब' म्हंटल्यावर दर्दी संगीत प्रेमींसाठी पर्वणीच असते. या महिन्याच्या कार्यक्रमाची थीम ही अगदी अनोखी होती. 'अनोखे बोल'!! काही गाण्यातले काही शब्द खूप वेगळेच असतात, बऱ्याचदा त्यांचे अर्थ, प्रयोजनही आपल्याला ठाऊक नसते, तर कधी कधी त्यांना अर्थ असतंच नाही. पण तरीही ते गाण्याला मजा आणत  असतात. तर असे 'अनोखे बोल' असणारे रेकॉर्डस यावेळी वाजवण्यात आल्या. या आयोजकांचा संग्रह आणि अभ्यास आपल्याला पुन्हा-पुन्हा थक्क करून सोडतो. कुठून कुठून या रेकॉर्डस् मिळवल्या आणि त्याचा इतका डिटेल अभ्यास या मंडळींनी केला आहे, आश्चर्यचकित करून सोडतो.  यावेळचे पहिले गाणे होते राज कपूर च्या श्री ४२० मधले, 'रमैय्या वस्तावैय्या'. या गाण्याची कथा अशी की गीतकार शैलेंद्र एकदा एका अर्धवट बांधलेल्या इमारतीजवळून जात असताना तिथले आंध्र कामगार 'रमैया वस्तावैय्या' या बोलांचे तेलगू लोकगीत गात होते. शैलेंद्र च्या मनात हे शब्द पक्के बसले आणि ते त्यांनी आपल्या गाण्यात बसवायचे ठरवले. या किश्श्यासोबतच अजून एक योगायोग म्हणता येईल असा किस्सा की संगीतकार शंकर...

राजर्षी शाहू महाराज व नामदार भास्करराव जाधव

आज २६ जून. शाहू जयंती व भास्करराव जाधव यांची पुण्यतिथी. भास्करराव विठोजीराव जाधव यांचे घराणे रायगडाच्या परिसरातील बिरवाडीचे. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेच्या भास्कररावांच्या व्यक्तीमत्त्वाची जडणघडण मुंबईत झाली. डॉ. रा.गो. भांडारकर हे त्यांचे सहाध्यायी होते.  मॅट्रिकच्या परीक्षेत ते मुंबई इलाख्यात सर्वप्रथम आले होते. विद्यार्थी दशेत ते मुंबईच्या कामाठीपूऱ्यात सत्यशोधक समाजाचे द्रष्टे कार्यकर्ते रामय्या व्यंकय्या आय्यवारू यांच्याकडे सुमारे ३ वर्षे राहत होते. तेथील वातावरण सत्यशोधक समाजाच्या तत्त्वज्ञानाने भारलेले होते. भास्कररावांच्या व्यक्तिमत्त्वावर तेथे सत्यशोधक विचारांचे खोलवर संस्कार झाले . महात्मा फुले, आय्यवारू स्वामी , प्रा. केळूसकर ही त्यांची दैवते बनली . अशाप्रकारे ते सत्यशोधक समाजाचे खंदे पुरस्कर्ते बनले.  भास्करराव एम.ए होऊन मुंबईत कायद्याच्या पदवीसाठी अभ्यास करत होते . तेव्हा पुण्यातील 'डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी'चे अध्वर्यू अ‍ॅड. गंगाराम भाऊ म्हस्के यांनी त्यांचे नाव शाहू महाराजांना सुचवले. भास्काररावांचा संस्कृतचा गाढा व्यासंग होता आणि ...

प्रिय सावित्री

प्रिय सावित्री,  अज्ञान, कर्मकांड, वर्णभेद, जात-पात, बालविवाह, केशवपन,सतीप्रथा या कुप्रथांनी आणि समाजव्यवस्थेत पिचल्या जाणार्‍या बाईला, पुरुषाच्या आधाराशिवायही तिचं काही अस्तित्व आहे, हे तुझ्याकडे बघून वाटलं बघ..स्त्रिया आणि दलित यांच्या सामाजिक स्वातंत्र्यासाठी नवे कार्य तू सुरु केलेस. या सामाजिक परीवर्तनाच्या लढाईत आयुष्याची पन्नासहून अधिक वर्षे खर्च केलीस..अनेक आघात, छळ सहन करून विवाहोत्तर शिक्षण घेतलेस..देशाची पहिली महिला शिक्षिका तू, तू स्त्रियांना फक्त शिक्षण नाही ज्ञान दिलेस..असंख्य स्त्रियांना प्रेरणा देऊन शिक्षणक्षेत्रात आणलेस, तुझ्या वाड्यातली विहीर दलितांना खुली करून दिलीस, बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलीस, शोषण आणि असमानता या विरोधात अनेक विवेकनिष्ठ चळवळींचा पाया रचलास. सत्यशोधनाचा आग्रह धरलास..आज तुझ्या स्मृतीदिनी  मला सांग, एकोणीसाव्या शतकात, अस्पृश्यता, सतीप्रथा, वर्ण, लिंग,वंश, धर्म यांच्या आधारवर समाजात विषमता पोसणार्‍या समाजव्यवस्थेला छेद देणारी तू..कुठून आली तुझ्यात ही शक्ती?"ढोल, गवार, शुद्र, पशू, नारी, ये सब ताडन के अधिकारी" असे बेलाश...