Skip to main content

Posts

Showing posts with the label Fillambaji

शांतीत क्रांती - मैत्री, विनोद आणि आत्मभानाची गोष्ट

काल खूप दिवस ज्याची वाट पाहणं सुरू होतं त्या ' शांतीत क्रांती ' या वेब सिरीजचं binge watch केलं. सारंग साठ्ये, पॉला मॅक्ग्लिन  दिग्दर्शित या बहुचर्चित सिरीज मध्ये 3 मित्रांची कथा आहे. प्रसन्न ( ललित प्रभाकर ), श्रेयस ( अभय महाजन ) आणि दिनार (आलोक राजवाडे ) यांची ही आजच्या तरुणाईला रिलेट होईल अशी गोष्ट. तीन मित्र, अगदी लंगोटी यार. अगदी 'हम दोस्त थे, दोस्त है और हमेशा रहेंगे' कॅटेगरी. तिघे गोवा रोड ट्रिप प्लॅन करतात पण श्रेयस त्या दोघांना 'शांतीवन' या ठिकाणी आणतो. एका ध्यान आश्रमासारखी ही जागा. या मित्रांच्या वरवरच्या हसत्या-खेळत्या आयुष्यात आत वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, जे ते शेअर करत नाहीत.तिघेही वरून आनंदी दिसले तरी आतून पार गोंधळलेले, विस्कळीत मनस्थितीतले. आपल्याला बऱ्याचदा डिनायलमध्ये जगण्याची सवय असते,  बऱ्याचदा आपला स्वतःचा स्वतंत्र विचार, मत न मांडता, लोक काय म्हणतील याचाच विचार करून, 'मी कोण आहे, मला नेमकं काय हवंय?' हे प्रश्न आपण स्वतःलाही विचारत नाही. त्यामुळे काही केल्या वास्तवाचा आपण स्वीकार करत नाही. आपण जसे आहोत त्या आपल्यातल्या मूळ व्यक्ती...

द मॅरीड वूमन - रिक्त की मुक्त?

Alt बालाजी ची नवीन वेब सिरीज द मॅरीड वूमन पाहिली. मंजू कपूर यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित. आस्था एक ड्युटीफुल, कर्तव्यदक्ष बायको, सून, आई पण त्याच बरोबर एक कॉलेज टीचर. संथ आणि एकसुरी बनलेलं आहे तिचं आयुष्य. सतत गृहीत धरलं जाणं, सतत दुय्यम वागणूक. पण विना तक्रार नाती निभावत राहायचं. कारण समाजाने तसे नियम आखलेत. तिची कहाणी तीच आपल्याशी बोलत सांगते पूर्णवेळ.  ऐजाज खान(इमाद शाह), तिने लिहिलेले नाटकाचे दिग्दर्शन करणारा एक स्वतंत्र, पुरोगामी विचारांचा, सर्वधर्मसमभाव मानणारा, त्याच्याकडे ओढली जात आहे आस्था पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू होतो आणि तिच्या आयुष्यात येते पिपलिका.(मोनिका डोग्रा) ऐजाज ची विधवा. एक आर्टिस्ट. आस्थाहून खूप निराळी. दोघी दोन ध्रुवांसारख्या, तरी एकमेकींच्या जवळ खूप जवळ येतात, प्रेमात पडतात. पिपलिकाच्या मते, "प्यार जेंडर नही, रुह देखके होता है".  काय आहे नक्की या दोघींचं नातं? केवळ तनाचं की मनाचंही? भावनांचा कोसळणारा प्रपात, जो चिंब करत आहे दोघींनाही. हे सगळं हवं हवसं आहे आस्थाला. पण ती विवाहित आहे, तिला एक सर्वसाधारण कुटुंब आहे, मुलं आहेत. ती त्यांना सोडून ...

गुलाबो सिताबो : बेग़मने खाल्लेला चित्रपट

बॉलीवूडमध्ये इतके हुशारीने बनवलेली 'ड्रॅमॅटिक सटायर' फारच कमी. डार्क कॉमेडीचा इतका सुंदर वापर  'जाने भी दो यारो' इतका नसला तरी तरी वेगळ्या खुबीने केला आहे. जुही चतुर्वेदी लिखित आणि शुजित सरकार दिग्दर्शित हा 'गुलाबो सिताबो' हा तो चित्रपट.लखनौ शहराची पार्श्वभूमी, मोडकळीस आलेली 'फातिमा महल' नामक खास लखनौवी हवेली, त्याची मालकिण बेग़म (फ़ारुख़ जाफ़र) हिचा नवरा एक हावरट, कंजूस ' सतत आयजीच्या जीवावर' असलेला ८० ला येऊनही ही हवेली कधीतरी आपल्या मालकीची होईल या भ्रमातला म्हातारा मिर्झा , आणि ढेर सारे भाडेकरू. अगदी ३०रु ते ७० रु इतक्याशा भाड्यावर राहणारे. आयुषमान खुरानाने साकारलेला 'बांके' हा 'मै गरीब हू' म्हणत आपल्या बहिणींना सांभाळणारा भाडेकरु सतत भाडे देण्यास कुचराई करण्यात पटाईत. यांच्या आयुष्यात पुरातत्व खात्याचे लोक आणि बिल्डर मंडळी यांची एन्ट्री होते आणि एरवी एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त मिर्झा (अमिताभ बच्चन) आणि बांके (आयुषमान) यांची अवस्था सुरुवातीला आणि शेवटाला दाखवलेल्या गुलाबो आणि सिताबो या कठपुतळ्यांसारखी होते.  अमिताभ बच्चनचे ...

Pursuit of Happiness : आनंदाचा अथक शोध

परसूट ऑफ हॅपिनेस : आनंदाचा अथक शोध आयुष्यात आनंद कुणाला नको असतो? कुणाला भौतिक सुखात तर कुणाला आत्मिक समाधानात आनंद मिळतो. जो तो आनंदाच्या शोधात आहे, सगळ्यांचं एकच ध्येय आहे. Pursuit of Happiness.  या सिनेमाची कथाही एक खऱ्या चरित्रावर बेतलेली आहे. ख्रिस गार्डनर ( विल स्मिथ ), ख्रिस्तोफर ज्युनिअर ( जेडन स्मिथ ) हे खऱ्या जीवनातले बापलेकच यात दाखवले आहेत. एक बोन डेन्सीटी स्कॅनर मशीन, ज्याला फारशी मागणी नाही विकणारा सेल्समन ख्रिस व्यावसायिक पतनामुळे हैराण असतो. त्याची बायको मुलाला त्याच्यापाशी ठेवून निघून जाते, राहतं भाड्याचे घर जाते, शेअर बाजारात काम करण्यासाठी इंटर्न म्हणून विनापैसा ख्रिसला काम मिळते आणि मग सुरू होतो एक संघर्ष. आनंदाचा अथक शोध. घर नाही तर कधी पब्लिक टॉयलेटमध्ये तर कधी ट्रेन, बसमध्ये, स्वस्त डॉर्मिटरी मिळेल तिथे मुलाला घेऊन राहणे, खिशात, बँकेत पैशाचा खडखडाट असून सकारात्मक राहून गुजराण करण्यासाठी त्याची राहिलेली मशिन्स त्याला विकायची असतात. अनेक संकटांना सामोरं जाताना हा सिनेमा आपल्याला खूप काही शिकवतो. सकारात्मक दृष्टिकोन, हार न मानणे, स्वप्नांच्या पूर...

ऑक्टोबर : नात्याला या नकोच नाव

सगळ्याच नात्यांना नाव नसतं. सगळ्याच भावनांत आर्तता नसते. सगळ्याच कथा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वाटतीलच असं नाही. पण ‘ ऑक्टोबर ’ मला स्वतःचा वाटला. डॅन आणि शिवली. हॉटेल मॅनेजमेंट इंटर्न्स , एकमेकांशी अगदी मोजका संवाद असलेले , सहकारी इतकेच काय ते त्यांचे नाते. डॅन बेफिकीर , अस्ताव्यस्त , कामात लक्ष नसलेला , बेधडक आणि कधी कधी दुखेल असे बोलणे तरी थोडा निष्पाप तर शिवली शांत , कामात सिन्सिअर. ‘ दोन ध्रुवावर दोघे आपण ’ असे त्यांचे अत्यंत विरुद्ध स्वभाव. एका अपघातामुळे शिवली कोमा आणि नंतर त्यासदृश परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये बेडला खिळलेल्या अवस्थेत आहे आणि नंतर डॅन मध्ये या घटनेने जे बदल घडत जातात आणि त्यांचे एक अतूट बंधन निर्माण होते त्याची ही सुगंधी कथा. डॅन अधिकाधिक शिवलीची काळजी करू लागतो , त्याच्या रोजच्या भेटींमुळे त्याच्या इतर सहकाऱ्यांना त्याचे वागणे विचित्र वाटते. असे काही होऊ शकेल आणि तेही डॅनकडून असे कुणालाही विचित्रच वाटेल. पण त्याचे शिवलीकडे वारंवार जाणे , याने त्याचा स्वभाव बदलतो. एरवी बालिश वाटणारा डॅन शिवलीच्या प्रत्येक बाबतीत सीरियस वागू लागतो. चित्रपटातील डॅन - शि...

सेक्रेड गेम्स- सीजन 2

प्रभू रामचंद्राच्या वनवासानंतर अयोध्या नगरीने ज्या आतुरतेने त्यांची वाट पाहिली असावी तशी नेटफ्लिक्सवासीयांनी GOT, Narcos नंतर 'सेक्रेड गेम्स' च्या पुढच्या सीजन ची वाट पाहिली आणि पदरी दर दोन शिव्यानंतर अजून शिव्या असं काहीसं आलं.  झालं काय की ते, 'कुकू का जादू बादू' यात काही नव्हतं. यात सत्य होतं. आयुष्यातले सगळे दरवाजे बंद झाले की हतबल मनुष्य जितकी धडपड करता येईल तितकी करतो, मारतो, उडवतो, ओरडतो,  गुरु-पंथाच्या नादी लागतो, गंडे- दोरे बांधतो. ज्यावर विश्वास नाही ते सारेही करून पाहतो. गायतोंडेचा(नवाजुद्दीन) तिसरा बाप 'गुरुजी' हाही एक प्रकारचा झिंग देणारा धार्मिक कल्ट चालवत असतो जो मुंबई खतम करण्यासाठी गायतोंडेचा वापर करत असतो.  मागील सीजन गायतोंडेचा होता, त्याने कमाल केली. दुसरा सीजन सरताजसिंग (सैफ) चा आहे. तो शोधात आहे. जे काही सापडत आहे तो चकित आहे , शोधण्यासाठीची धडपड गायतोंडेचा इतिहास आणि संपणारी मुंबई, धर्माचे राजकारण आणि राजकारणातील भ्रष्ट्राचार हे सगळं इथं दाखवायचा प्रयत्न आहे. सीजन 1 पाहिला नसेल तर यातील 1-1 मूव्हचं संदर्भासहित स्पष्टीकरण कराव...

रिंगण! सुटता तुटेना माऊली..

रिंगण! आज घरातल्या देव्हाऱ्यात एकलाच उभा पांडुरंग बघून मकरंद माने दिग्दर्शित 'रिंगण' ची आठवण आली. अर्जुन मगर (शशांक शेंडे) आणि त्याचा मुलगा अभिमन्यू (साहील जोशी) या बापलेकाची कथा.  दुष्काळाने कर्जाच्या ओझ्यात पिचलेला शेतकरी, त्यात गहाण गेलेली जमीन. आत्महत्येचे सततचे विचार झटकून, पोरासोबत पंढरपूराला जातो. पोराची आई देवाच्या गावाला गेली असं सांगितल्यामुळे, इथे माझी आई सापडेल अशी आशा घेऊन आलेला 7-8 वर्षाचा त्याचा मुलगा. निराशेतून आत्मविश्वासाने, श्रद्धेने सकारात्मक मार्ग दाखवणारा 'रिंगण'.  बापलेकाचे नाजूक नाते, पापभिरू निष्पाप अर्जुन मगर आणि त्याचा निरागस मुलगा अभिमन्यू पंढरीच्या गावी तरी काही पदरी पडेल का अशी आशा करत आलेले असतात त्यांची कथा. पंढरपूरला वारीला रिंगण सोहळे असतात त्यामुळे तर हे नाव साजेसे आहेच पण आपण ज्याला चमत्काराच्या अपेक्षेने शोधत फिरतो, तो कुठे ना कुठं आपल्या सोबत निरनिराळ्या रूपात सकारात्मकता देऊन जातो. आपल्या मातीशी सुरू झालेला प्रवास पुन्हा आपल्या मातीशी नेऊन पोहोचवतो असे रिंगण. आपल्याजवळ जे नाही त्या पळत्याच्या पाठी धावता आपण हातचं स...

'भाई : व्यक्ती की वल्ली' - आकाश व्यापणारी असामी

पुलंचं बायोपिक म्हणजे अक्षरशः अशक्य वाटलं होतं. पण  टीजर आवडला आणि काहीही झालं तरी बघायला जायचं हे ठरवलंच होतं.  घरी पु.लविषयक काहीही म्हणजे 'घरचं कार्य', त्यामुळे खोकला, कणकण,  निर्माता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हे सगळे प्रॉब्लेम असूनही फर्स्ट डे फर्स्ट शो ला गेलेच. आणि सोबतीला मंडळीही तगडी. सगळ्यांनी भाई, भाईकाका जवळून पाहिलेले, अनुभवलेले अशी माणसं सोबत घेऊन सिनेमा पाहिला. एखादा माणूस आवडता कलाकार किंवा पब्लिक फिगर म्हणूनच नाही तर जिव्हाळ्याचा विषय म्हणून त्याच्यावरील चित्रपट पाहण्यासाठी आले खरंतर. चित्रपटाचं कास्टिंग चांगलं झालं आहे. सागर देशमुखचा खरेखुरे पु.ल साकारण्याचा प्रयत्न अगदीच कौतुकास्पद आहे. अगदीच कमाल. तसेच इरावती हर्षेनी तरुणपणीच्या सुनीताबाईंच्या भूमिकेत अप्रतिम काम केले आहे. पुलंचं बालपण ते तरुणपण या चित्रपटात उलगडून दाखवण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. त्यांची वैविध्यपूर्ण शैली, भाषेवरचं प्रभुत्व, निकोप, मार्मिक विनोद याचा प्रत्यय पावलोपावली येतो. यातले सगळे प्रसंग आधी लिखित, ऐकीव स्वरूपात असूनही कंटाळा असा कुठे येत नाहीत. पुलंचे विनोद, कि...

हम आज कही दिल खो बैठे....दिलीप साब आपको..

'स्टारडम' ही संकल्पना क्षणिक असणाऱ्या काळातही दिलीपकुमार हा एक दुर्मिळ अभिनेता आहे जो मनोरंजन क्षेत्रात 58 वर्षानंतरही तंबू ठोकून उभा राहिला. दिलीपकुमारने सहा दशकाच्या कारकिर्दीत केवळ 56 चित्रपट केले. पण प्रेक्षकांसोबत लगेच संवाद साधण्याचं अलौकिक वरदान त्याला लाभलेलं होतं, ज्याने त्याला हिंदी सिनेमात अनेक क्लासिक्स देता आले. पेशावरहून पळून आलेला , पुण्यातील एका मिलिटरी कँटीन मध्ये काम करत करत फळांच्या दुकानाचा मालक बनलेला युसूफ खान. त्याच्यातला अभिनेता जागा होऊन त्याची अभिव्यक्ती युसूफ खानला मुंबईला घेऊन आली.  बॉम्बे टॉकीजची महत्त्वाची नियंत्रक देविका राणी, अशोककुमार नंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी कोणा प्रतिभावंताच्या शोधात होती. युसुफच्या गुणवत्तेवर प्रसन्न होऊन त्याला 'ज्वार भाटा' मध्ये हिरो म्हणून ब्रेक मिळाला.  देविका राणीने अत्यंत कडक शिस्तीने आणि कठोर शासनाने स्टुडिओ वर पकड ठेवली होती.  अभ्यासण्यासाठी भरपूर सामान आणि सृजनशील वातावरणाने या गुणी कलाकाराला  पाया मजबूत करता आला, ज्याने त्याच्यातला उत्कृष्ट अभिनेता बाहेर आला जो आज एक लेजंड आहे. न...

वो जिंदगी का साथ निभाता चला गया....

3 डिसेंम्बर 2011, लंडनमधील उच्चवर्गीय भाग मेफेअर येथील वॉशिंग्टन हॉटेल मध्ये अचानक गोंधळ सुरू झाला. बाहेर दोन अँब्युलन्स आल्या. दोन पॅरामेडिक्स लगबगीने हॉटेल लॉबीत पोहोचले. रिसेप्शनिस्ट ओरडले "रूम 207". पॅरामेडिक त्यांची प्रथमोपचार साधने घेऊन लिफ्टकडे धावले. पण 207 मध्ये सारं काही संपलं होतं. सुप्रसिद्ध नायक देव आनंद यांचा हृदयविकाराचा मोठा झटका येऊन अंत झाला.  देव आनंद हा वर्तमानात जगणारा माणूस होता, पण त्याला भविष्याकडे पाहून काम करणं  चांगलंच ठाऊक होतं. . वयाची ऐंशी पार केल्यानंतरही, यश मिळो किंवा अपयश, टीका असो किंवा शेवटच्या काळात त्याची खिल्ली उडवलेली असो त्याचा वेळ, ऊर्जा आणि कल नवनवीन चित्रपट बनवण्यासाठी होता. या दुर्दम्य महत्वाकांक्षी व्यक्तिमत्त्वाला 'अशक्य' शब्दच जणू माहीत नव्हता. तो होता ख़ुशमिज़ाज, परिपूर्ण, देखणा.. देव आनंद!  देव आनंदच्या करिअरची विभागणी साधारणपणे अशी करता येईल- त्याचा 'कृष्णधवल काळ' जिथे त्याच्या बहुतेक दिग्दर्शकांनी (जास्त करून त्याचा भाऊ-विजय आनंद) त्याच्या अति टोकाला जायच्या प्रवृत्तीला काबूत ठेवलं होतं, आणि ...

बधाई हो: मज्जेदार, लज्जतदार कॉमेडी

बधाई हो: मज्जेदार, लज्जतदार कॉमेडी कौशिक कुटुंब, मध्यमवयीन जोडपं, त्यांना एक तरुण मुलगा लग्नाला आलेला, तर दुसरा किशोरवयीन मुलगा, आणि आज्जी, हे दिल्लीतले एक सामान्य कटुंब. एखाद्या बाळाचं येणं एखाद्या कुटूंबासाठी किती आनंदाची गोष्ट असते. येणाऱ्या नव्या पाहुण्यासाठी सारे अगदी सज्ज असतात. पण कौशिक कुटुंबावर बॉम्ब पडतो जेव्हा 50शी उलटलेलं आलेलं जोडपं जितेंदर (गजराज राव) आणि प्रियंवदा (नीना गुप्ता) यांना नवीन बाळाची चाहूल लागते. या ' Good news' कडे घरातल्या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया, शेजारी, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या प्रतिक्रिया, प्रत्येकाचे वेगळे दृष्टिकोन या सगळ्या ची ही गोष्ट आहे. अमित शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.  नकुल (आयुषमान खुराना) हा कौशिकांचा मोठा मुलगा त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर, प्रेमजीवनावर याचा होणारा परिणाम हे जरी कथानक असले तरी ते सेकंडरी म्हणावे लागेल. खरी कथा आहे, तिसऱ्यांदा मूल होणाऱ्या, तेही 50शी उलटलेल्या, अशा जोडप्याची. गजराज आणि नीना यांचा अभिनय जबरदस्त आहे. गजराज राव यांना तर काही सीन्स मध्ये संवाद नसूनही केवळ हावभावांवरून...

अंधाधून:- A Trilling Blind Game

अंधाधून:- हवीहवीशी अंदाधुंदी आत्ता अंधाधून बघून आले..  नाटकाचा एक साधा नियम आहे. पहिल्या अंकात जर भिंतीवर बंदूक दाखवली, तर तिसऱ्या अंकात तिचा बार उडलाच पाहिजे. नाहीतर ती दखवण्याचं प्रयोजन काय? (*Bertolt Brecht, Chekhov and others) एका लाईन मध्ये अंधाधूनची कथा सांगायची तर, एक तरुण प्रतिभावान 'अंध' पियानो आर्टिस्ट एक खून 'पाहतो'. आणि मग सुरू होते थरारक घटनांची मालिका. एक थ्रिलर असूनही दिग्दर्शक 'श्रीराम राघवन' यांनी बुफे सारखं, कुणाचा खून झाला, कुणी केला, कसा केला, का केला? सगळं वाढून ठेवलं आहे. काहीही प्रेक्षकांपासून लपलेलं नाही. आणि तरीही अत्यंत अनपेक्षित, वेगवान, उत्कंठावर्धक हे रहस्यपटाचे सारे गुण आपल्याला अनुभवायला मिळतात.  गुणी कलाकार आयुषमान खुराना याने त्याची versatility इथेही जपली आहे, राधिका आपटे तिच्या नेहमीच्या बिनधास्त अवतारात आहे. छाया कदम( सैराट, न्यूड फेम), अश्विनी काळसेकर, मानव वीजे, अनिल धवन लहान लहान भूमिकांत भाव खाऊन जातात. एकदम नैसर्गिक.  आणि तब्बू.. एक नंबर..Cold blooded, जहरी, दुटप्पी आणि चित्रपटात एक पात्र म्हणतं त्याप्र...

एक ही भूल..स्लो स्लो घूल

Tv मालिकांना कंटाळून पुन्हा पाऊले चालती नेटफ्लिक्सची वाट करत आज मी नेटफ्लिक्स वरची नवीन वेब सीरिज 'घूल' पाहिली. ते काय आहे, मला हॉरर प्रकार आवडतो आणि नेटफ्लिक्सने दत्तक घेतलेली राधिका आपटेही. अरबी लोककथेनुसार 'घूल' हे असे भूत असतात जे माणसांना खातात आणि मग त्यांचे रूप धारण करतात.  3 एपिसोडमध्ये याचा पहिला सीझन शूट केलेला आहे. साधारण हॉररपटांमध्ये होणारा धक्कातंत्राचा वापर इथे खूपच कमी आहे. त्यामुळे इथे घाबरण्यासाठी पाहणाऱ्या प्रेक्षकांना काही सस्पेन्स वगैरे मिळतच नाही.   काही ठिकाणी अक्षरशः बोर व्हायला झाले. ज्यांना इंग्रजी हॉररपट बघायची सवय आहे त्यांना फार काही वेगळा वाटणार नाही. पण राजकीय पार्श्वभूमी, गुप्त एजन्सी, मुस्लिमाना आतंकवादी लेबल लावून केलेले इंटेरोगेशन, देशभक्ती आणि धर्म अशा महत्त्वाच्या विषयातील काही clichés इथे आढळतील.  Sacred Games शी याची तुलना होऊच शकत नाही. त्यात छोट्याशा भूमिकेतही भाव खाऊन गेलेली राधिका आपटे यात निदाच्या भूमिकेत predictable वाटायला लागते.  पण तरीही it's worth a try. काळा, पांढरा, ग्रे शिवाय पुढच्या स...

लिपस्टिक अंडर माय बुरखा : फिस्कटलेली रंगीत स्वप्ने

आज बहुचर्चित 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' पाहिला. (सौजन्य-Netflix) एक हवाई मंजिल नामक पुरानी हवेली त्यातल्या 4 स्त्रियांची ही कहाणी. यांनी अपराध केला आहे. स्वप्नं पाहण्याचा. आपल्या मर्जीने आयुष्य जगण्याची स्वप्नं, स्वतःच्या शरीरावर प्रेम करण्याची स्वप्नं. कर्मठ कुटुंबाच्या कचाट्यापासून ते सेक्सिस्ट, दांभिक समाजाच्या so called मूल्यांशी झगडून स्वातंत्र्य मिळवण्याची स्वप्नं. त्यांना ती स्वप्नं पाहण्याचा अधिकार आहे तो एका उंबऱ्या आडूनच. लिपस्टिक च्या लाखो शेड्स सारखी रंगीत स्वप्नं असतील. पण ती लपवायची. त्यांना लपूनछपून रहायची परवनगी आहे. पण बुरख्याआड. भोपाळ सारख्या ठिकाणी असलेल्या या बायका. रेहाना ही कॉलेज कन्या. तिच्याघरीच बुरखा शिवण्याचा व्यवसाय आहे. पण रॉकस्टार बनावं, बेधुंद नाचावं, गावं, जीन्स सारखा पेहनावा करावा असं तिला वाटतं. सनातनी मुस्लिम कुटुंबातील बंधनांना झुगारुन, पारतंत्र्याच्या बुरखा फाडून तिला मोकळं व्हायचंय.  दुसरी लीला. बळजबरीने लग्न लावले जाणारी एक तरुणी, प्रियकर आणि होणारा नवरा यांच्या कात्रीत सापडलेली, बिझनेस करावा, दिल्ली गाठावी अशी तिची ...

लस्ट स्टोरीज: कथा चार, अनंत विचार

'बॉम्बे टॉकीज' या अँथॉलॉजि फिल्म नंतर त्याच दिग्दर्शकांनी पुन्हा एकदा एका थीम वर आधारित चार गोष्टींची मालिका आणण्याचा प्रयोग 'लस्ट स्टोरीज' च्या चार कथांमध्ये केला आहे. ज्यांना ज्यांना सांगितलं "पाहा जरूर", almost सगळ्यांच्या akward reactions आल्या. ( की बाई, तुला काही भीड, मुरवत आहे की नाही, हळू सांग की, या विषयावर अशी बोंबलतेस काय?) आणि काय सांगू, हीच थीम आहे. 'लस्ट स्टोरीज' केवळ 'शारीरिक वासना' इतकाच विषय नाही हाताळत. सेक्स, गरज, सामाजिक दृष्टिकोन आणि taboos, व्यक्तिस्वातंत्र्य आणि स्त्री..  एकंदर या सगळ्यावर आधारित आहेत लस्ट स्टोरीज.  पहिली कथा अनुराग कश्यपची. राधिका आपटेने खाऊन टाकली आहे. लग्न झालेल्या बाईचे कलीग सोबत विद्यार्थ्यांसोबत fling. त्यातून होणारी सेक्स, रिलेशनशिप, प्रेम , गिल्ट, जेलसी यांची सरमिसळ सगळं सगळं ती आपल्यासोबत शेअर करते. नेहमीप्रमाणे प्रामाणिक अभिनय, कसलाही भपका नाही. 'Bold & Beautiful yet Confused' कालिंदी तिने मस्त रंगवलीये. आकाश ठोसर ला चांगली संधी मिळाली आहे, पण त्याने त्याच्या बोलण्यावर अजून क...

मस्का- घ्या लज्जत

 आजवर लेखक, अभिनेता म्हणून परिचित प्रियदर्शन जाधव याचा 'मस्का' पाहिला.  लोकांना भावनांच्या जाळ्यात ओढून लुटणाऱ्या भामट्यांची ही ट्विस्टस आणि टर्नस नी भरलेली अनपेक्षित कथा. 'Suspense Comedy' असा काहीसा वेगळाच genre म्हणता येईल. सगळ्याच कलाकारांनी उत्तम काम केलं आहे. अगदी नैसर्गिक. 'बनचूका यादव' (शशांक शेंडे),  'नवशिका चिकू' (प्रणव रावराणे), 'गोंधळलेला करोडपती हर्ष' (अनिकेत विश्वासराव), रहस्याची किल्ली (चिन्मय मांडलेकर) आणि हुकुमाची राणी, Leading Lady (प्रार्थना बेहरे) यांच्या अभिनयाने प्रत्येक प्रसंग खुमासदार झालेला आहे. त्याच त्याच प्रकारच्या भूमिकांमधून बाहेर पडून नवीन काहीतरी करण्याचं स्वातंत्र्य त्यांना मस्कामध्ये मिळालं आहे.  नाटक, TV आणि चित्रपट तिन्ही माध्यमात का म करणाऱ्या प्रियदर्शन जाधवने 'मस्का'तून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. आणि ते यशस्वीही झाले आहे. एका अर्थाने डार्क कॉमेडी म्हणता येईल अशी कथेवर काम करणं खरंच खूप challenging आहे. चित्रपटात कोण कुणाला फसवतंय हे माहीत असूनही प्रेक्षक 'कसे' हे जाणून ...

राझी : सत्यकथा सेहमतची

'कॉलिंग सेहमत' पुस्तकावर आधारित आलिया भट स्टारर 'राझी' पाहिला. सत्यकथा असलेल्या या फिल्म मध्ये आलिया भटने मुख्य भूमिका 'सेहमत' साकारली आहे. तुम्ही लष्करात एखाद्या हुद्यावर काम करत असाल तर तुमचे नाव अभिमानाने मिरवले जाते. पण अनेक गुप्तहेर असतात जे हेरगिरीचे प्रशिक्षण घेऊन शत्रूपक्षाकडून माहिती काढून पुरवण्याचे काम करतात. देशासाठी गुप्तपणे, काम करणारे हे हेर शेवटपर्यंत गुप्तच राहतात. त्यांचं काम, बलिदान देशासमोर कधीच येत नाही. पकडले गेले तर देश त्यांच्या संरक्षणाला धावून येत नाही. त्यांचा त्यांनाच निभाव करावा लागतो.  1971 च्या भारत-पाक युद्धाचे शक्यता लागून आहे, अशा वेळी एक 20 वर्षीय तरुणी, जिचे वडील, आजोबा जे भारताचे स्वातंत्र्यसेनानी होते, तिचे लग्न पाकिस्तानातील आर्मीतील मोठ्या हुद्यावर काम करत असणाऱ्या उच्चभ्रू घरात केले गेले आणि तिने हेर म्हणून अत्यंत महत्त्वाची माहिती गुप्तपणे भारतात पाठवण्याचे काम केले त्या सेहमतची ही कथा आहे.  आलियाने 'उडता पंजाब', 'हायवे' सारख्या फिल्म्समध्ये मध्ये आपलं अभिनय कौशल्य वेळोवेळी दाखवलं...

भरधाव 'सायकल'

या सिनेमाच्या कथेत कोकणातलं लहानसं गाव, त्यातला ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असणारा प्रसिद्ध केशव आणि त्याच्या आजोबांनी त्याला दिलेली प्रसिद्ध सायकल आहे. गज्या - मंग्या हो चोरांची जोडगोळी गावागावांत, घराघरातून हात मारत असताना ही सायकल चोरतात, त्याची ही गोष्ट! केशव, हुशार आहे, सज्जन आहे, म्हणूनच गावातल्या लोकांत त्याला मान आहे. बाकी तो लोकांना मदत करण्यासाठी कासेची लंगोटी काढून देईल, पण त्याची एक कमजोरी आहे. त्याचा जीव अडकला आहे सायकलमध्ये! आजोबांनी वडिलांना डावलून ती आपल्याला दिली, आणि म्हणूनच त्यांची ज्योतिषविद्याही तिच्याद्वारे आपल्याला बहाल केली असा त्याचा वेडा समज आहे. एरवी वस्तूत अडकून पडायचं नाही हे पाळणारा, इतरांना सांगणारा केशव 'सायकल' विषयी मात्र फक्त हळवाच नाही, हट्टी आहे. प्रत्येकाचा एक weak point असतो. त्याला धक्का लागला की तो माणूस कोलमडतो, तुटून पडतो, शक्ती गमावून बसतो. तसंच केशवचं होतं. इतकं की "केशवमुळे सायकल की सायकलीमुळे केशव"असा प्रश्न पडावा. चोरांच्या (प्रियदर्शन जाधव, भाऊ कदम) आयुष्यात सायकल काय येते आणि प्रेम, आपुलकी, माणुसकी या तत्त्वांचं बळ त्...

"न्यूड : नग्नतेतील मुक्त कलाविष्कार"

आत्ता 'न्यूड' पाहिला. एखाद्या कथेचं चित्रात रूपांतर व्हावं आणि प्रत्येक ब्रशस्ट्रोक सोबत तयार व्हावी एक एक अप्रतिम फ्रेम आणि त्यांची एक बनावी चित्रमालिका या साऱ्यांनी बनला आहे 'न्यूड'. गावातून मुंबईला आलेली यमुना 'न्यूड मॉडेल' बनते. का? कशी? त्याचे होणारे परिणाम, पात्रांची आणि शेवटी आपलीही बदलत जाणारी विचारसरणी याची गोष्ट आहे न्यूड मध्ये.  चित्रपटाची कथा नग्नतेवर बेतली असली तरी कुठेही भडक होत नाही. अश्लीलतेचा लवलेश नाही. मॉडेल म्हणून तयार होताना आधी यमुनेची होणारी तडफड, तगमग, अगतिकता आपल्याला अस्वस्थ करून सोडते.  चित्रपटात एक मोठा कलाकार (एम.एफ.हुसेन वर बेतलेला)  मलिक (नसिरुद्दीन शाह) नायिकेचं न्यूड काढता काढता तिच्याशी आणि आपल्याशीही गप्पा मारतो. "मी घोड्यांची चित्रं काढली तर कुणाला हरकत नाही, पारव्यांची चित्र काढली कुणी बोलत नाही, मग मी माणसांची चित्रं काढली तर इतका हंगामा कशासाठी?", कलाकार 'रुह' पाहत असतो. तीच चितारत असतो.  चित्रपटाची कथा नग्नतेवर भाष्य करत असली तरी कुठेही भडकपणा नाही. काही प्रसंग अंगावर येतात पण ते त्य...