'स्टारडम' ही संकल्पना क्षणिक असणाऱ्या काळातही दिलीपकुमार हा एक दुर्मिळ अभिनेता आहे जो मनोरंजन क्षेत्रात 58 वर्षानंतरही तंबू ठोकून उभा राहिला. दिलीपकुमारने सहा दशकाच्या कारकिर्दीत केवळ 56 चित्रपट केले. पण प्रेक्षकांसोबत लगेच संवाद साधण्याचं अलौकिक वरदान त्याला लाभलेलं होतं, ज्याने त्याला हिंदी सिनेमात अनेक क्लासिक्स देता आले.
पेशावरहून पळून आलेला , पुण्यातील एका मिलिटरी कँटीन मध्ये काम करत करत फळांच्या दुकानाचा मालक बनलेला युसूफ खान. त्याच्यातला अभिनेता जागा होऊन त्याची अभिव्यक्ती युसूफ खानला मुंबईला घेऊन आली. बॉम्बे टॉकीजची महत्त्वाची नियंत्रक देविका राणी, अशोककुमार नंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी कोणा प्रतिभावंताच्या शोधात होती. युसुफच्या गुणवत्तेवर प्रसन्न होऊन त्याला 'ज्वार भाटा' मध्ये हिरो म्हणून ब्रेक मिळाला. देविका राणीने अत्यंत कडक शिस्तीने आणि कठोर शासनाने स्टुडिओ वर पकड ठेवली होती. अभ्यासण्यासाठी भरपूर सामान आणि सृजनशील वातावरणाने या गुणी कलाकाराला पाया मजबूत करता आला, ज्याने त्याच्यातला उत्कृष्ट अभिनेता बाहेर आला जो आज एक लेजंड आहे. नवीन स्क्रीननेम ने जन्माला आलेला 'दिलीपकुमार'.
1948 ला 'शहीद' आणि 'मेला' यांच्या येण्याने त्याला हिंदी चित्रपट सृष्टीत जम बसवायला मदत झाली. नर्गिस व राजकुमार सोबत चा, मेहबूब खानचा ब्लॉकबस्टर, अविस्मरणीय 'अंदाज'. एक दाम्पत्य आणि बायकोचा मित्र जो साकारला होता दिलीपकुमारने. नायिकेवरील त्याचे एकतर्फी प्रेम ही त्याची शोकांतिका. प्रेमातील अपूर्णता, वैफल्य आता दिलीपकुमार च्या पडद्यावरील व्यक्तित्वाचा अविभाज्य भाग बनला होता. 'ट्रेजेडी किंग' अशी त्याची ओळख बनली.
पण पडद्यावर सतत निराश प्रेमी साकारून, दिलीपकुमारला खऱ्या आयुष्यातही नैराश्यातून बाहेर येणं कठीण झालं. यामुळेच त्याने गुरू दत्तने उदारपणे ऑफर केलेला 'प्यासा' तील नायकाचा सर्वोत्कृष्ट रोल नाकारला. हार्ले स्ट्रीट वरील त्यांच्या मनोविकार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्याने काही हलकेफुलके रोल केले. काही साहसी प्रेमी साकारले. 'आझाद', 'इन्सानियत','कोहिनूर' त्याने सहज साकारले. 'मुघल-ए-आझम' आणि 'गंगा जमुना' असे अत्यंत प्रशंसनीय सुपरहिट्स 2 वर्ष लागोपाठ देऊन दिलीपकुमार सफलतेची पायरी चढून साठी च्या दशकात शिरला.
के. असिफ च्या अविस्मरणीय, काल्पनिक ऐतिहासिक 'मुघल-ए-आझम' मध्ये दिलीपकुमारने असा राजकुमार रंगवला जो आपल्या प्रेमासाठी (मधुबाला), राजगादी आणि अगदी आपले प्राण यांवर पाणी सोडायला तयार आहे. मधुबाला बरोबर त्याची केमिस्ट्री पाहून अजून हलकासा उसासा भरला जातो. या प्रेम कथेत दिलीपकुमारच्या भूमिकेस कुठलेही गाणे नाही.(के. असिफ चा या मागचा विचार हा होता की, 'हिंदुस्थान चा बादशाह' कधी गाणी गात नाही). तो बोलकी शांतता जेथे अलंकृत, आणि भारदस्त ओळींना जाऊन मिळते त्या नव्या शीर्षबिंदूला जाऊन पोहोचला.
दिलीपकुमार गंगा जमुनाच्या निर्मितीच्या सगळ्याच स्तरावर सहभागी होता. त्याने वैजयंतीमालाचा हेल भोजपुरी पक्का व्हावा यासाठी त्याने टेप रेकॉर्डरची मदत घेऊन, वैजयंतीमाला कडून डायलॉग घोटवून घेतले. त्याच्या वेदना आणि उत्कटता इतक्या नाट्यमय होत्या की त्याचे 'गंगा'च्या भूमिकेतील प्रदर्शन म्हणजे अभिनयाचे पाठ्यपुस्तकच जणू..
चाळीशी उलटल्यानंतर दिलीपकुमारने निवृत्ती घ्यायचा विचार केला. तरीही त्यानंतर 3 वर्षांनी त्याचा 'लीडर' प्रदर्शित झाला. 'लीडर' आणि 'दिल दिया, दर्द लिया' बॉक्स ऑफिसवर आपटले. तरीही 1966 मध्ये 22 वर्षीय नाजूक सुंदरी सायरा बानूशी 44 वर्षीय दिलीपकुमारच्या झालेल्या लग्नाने त्याला प्रकाशझोतात ठेवले. या काळात त्याने अशा काही संधी नाकारल्या, ज्याने त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली असती. डेव्हिड लीन ने त्याला 'लॉरेन्स ऑफ अरेबिया' मध्ये रोल ऑफर केले. भली थोरली चांगली कास्ट असलेल्या त्या चित्रपटात नंतर दिलीपला देऊ केलेली अली ची भूमिका नंतर ओमर शरीफ ने फार छानपणे साकारली. इंडस्ट्रीतल्या जाणकारांचे असे मत होते की, दिलीपकुमार त्या वातावरणात आणि लोकांत तसाही आरामात फिट होऊ शकलाच नसता.
सायरा दिलीपकुमारची लकी चार्मच ठरली. लग्नानंतरची त्याची पहिली फिल्म 'राम और श्याम' हिट झाली. यात दिलीपकुमारचा डबलरोल होता. यावरूनच नंतर 'सीता और गीता' आणि 'चालबाज' सारख्या फिल्म्स आल्या.
नंतर सायरा सोबत सिनेमांची मालिकाच झाली. (गोपी, सगीना, बैराग)- पण त्यात पूर्वीसारखी जादू नव्हती. बैरागमध्ये लोकांना दिलीपकुमारचा ओव्हरडोस झाल्यानंतर त्याने चित्रपटांपासून काही काळ दूर राहायचे ठरवले.
5 वर्षांनंतर तो 'क्रांती' मधून झळकला. दिलीपकुमार तेव्हा चरित्र अभिनेता असला तरी भूमिका महत्त्वाच्या आणि मूलभूत होत्या. 80 च्या दशकाचा सुरुवातीचा काळ त्याच्यासाठी आनंदाचा होता. रमेश सिप्पीचा 'शक्ती' मध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन सोबत त्याला प्रेक्षकांची वाहवा मिळाली ती सुभाष घई चा 'विधाता' मध्येही. सुभाष घईचे पुढील 2 मल्टिस्टारर फिल्म्स 'कर्मा' आणि 'शांती' ही आल्या. दोन्हीतही दिलीपकुमार चा मोठा रोल होता. 'सौदागर'मध्ये राजकुमारच्या सोबत काम केले.(पूर्वी त्यांनी पैगाममध्ये एकत्र काम केले होते)
सत्यजित रेंनी त्याला 'अल्टीमेट मेथड ऍक्टर' म्हंटले. अमिताभ पासून शाहरुख पर्यंत सर्वांनी त्याला फॉलो केले. त्याच्या समवयस्क अभिनेत्यांपेक्षा तो एक परिपूर्ण अभिनेता होता (राज कपूर, दिग्दर्शनात जास्त व्यस्त असल्याने आणि देव आनंद स्वतःच्याच अदांमध्ये धुंद असल्यामुळे). भूमिकेत उत्कटतेने स्वतःला झोकून दिल्याने त्याच्यावर परिणाम झाले. 'देवदास' मुळे दारुडा दारू प्यायला लागून निराशेच्या गर्तेतून बाहेर येण्यासाठी सायकीयट्रिक ट्रीटमेंटची गरज लागली. 'देवदास' च्या सर्व रुपांतरांमध्ये हाच सर्वात पूर्ण असेल. पण 'सलीम' च्या भूमिकेसाठी दिलीपकुमार सोडून दुसऱ्या कुणाचाही विचार मनात येत नाही. ज्यात त्याच्या संवादांबरोबरच त्याची ख़ामोशी खूप काही बोलून जाते. मधल्या काळात त्याने स्वतःला 'नया दौर' आणि 'गंगा जमुना' सारखे अनेक सामाजिक चित्रपट केले, तसेच 'आन', 'आझाद' आणि 'कोहिनूर' सारखे हळव्या भावनांचे चित्रपट केले.
आता गाण्यांपैकी सांगायचे, हा अवघड भाग आहे. माझी आवडती गाणी ही इतरांपेक्षा वेगळी असतात, पण मी त्यावर ठाम असतो. मुकेश ची 'अंदाज' मधील चार गाणी 'हम आज कही दिल खो बैठे' 'तू कहे अगर जीवनभर', 'झूमझूम कर नाचो आज','टुटे ना दिल टूटे ना'! यांनी माझं गाण्यावर प्रेम जडलं. आणि 'मधुमती' मधील गाणी कोणी कसं विसरू शकेल? 'सुहाना सफर और ये मौसम हसीन' आणि 'दिल तडप तडप के', 'यहुदी' मधील 'ये मेरा दिवनापन है' हे एक सुंदर गाणं आहे.
दिलीपकुमारच्या स्वभावाला तलत अगदी नीट सूट होत होता. पण का कुणास ठाऊक तो त्याचा आवाज बनला नाही. 'मिलते ही आँखे दिल हुआ', 'ए दिल मुझे ऐसी जगह ले चल जहाँ कोई न हो' आणि ' शाम-ए-ग़म की कसम' ही सदाबहार क्लासिक्स आहेत.
रफीने त्याची काही उत्तम गाणी दिलीपकुमार साठी म्हंटली. 'ये जिंदगी के मेले', 'मान मेरा एहसान','दिलमें छुपाकर प्यार का', 'ओ दूर के मुसाफिर, 'नैन लड गयी वे', 'आज पुरानी राहोंसे कोई मुझे आवाज ना दे', 'कोई सागर दिल को बेहलाता नही', 'मधूबनमें राधिका नाचे रे' (या गाण्यासाठी दिलीपकुमार ने महिनाभर सातार शिकली), 'आज की रात मेरे दिलकी सलामी लेले', 'दो सितारोंका जमीनपर है मिलन', 'टूटे हुए खाँबोने' आणि अजून कित्येक..
आज दिलीपकुमार त्याच्या पूर्वीच्या रूपाची केवळ सावली उरला आहे. पण मी त्या माणसाची खूप आभारी आहे, जो त्याच्या वेगवेगळ्या अवतारांत म्हणून गेला,
"मेरा दिलभी कोई आपका हिंदोस्तान नहीं, जिसपर आप हुकूमत करे.."
"हक हमेशा सर झुका के नहीं, सर उठाके मांगा जाता है!"
"जब पेट की रोटी और जेब का पैसा छीन जाता है ना, तो कोई समझ, वजह नहीं रह जाती है आदमी के पास"..
"कुल्हाडी में लकडी का दास्ता न होता, तो लकडी के काटने का रास्ता न होता"..
शुक्रिया दिलीपसाब, तुम्हारा शुक्रिया!
- रमा ( अनुवादित )
मूळ- A Tribute to Dilip Kumar
(11th December, Birthday)
~ Vikram Appasaheb Jadhav
Comments