Skip to main content

Posts

Showing posts with the label Web Series

शांतीत क्रांती - मैत्री, विनोद आणि आत्मभानाची गोष्ट

काल खूप दिवस ज्याची वाट पाहणं सुरू होतं त्या ' शांतीत क्रांती ' या वेब सिरीजचं binge watch केलं. सारंग साठ्ये, पॉला मॅक्ग्लिन  दिग्दर्शित या बहुचर्चित सिरीज मध्ये 3 मित्रांची कथा आहे. प्रसन्न ( ललित प्रभाकर ), श्रेयस ( अभय महाजन ) आणि दिनार (आलोक राजवाडे ) यांची ही आजच्या तरुणाईला रिलेट होईल अशी गोष्ट. तीन मित्र, अगदी लंगोटी यार. अगदी 'हम दोस्त थे, दोस्त है और हमेशा रहेंगे' कॅटेगरी. तिघे गोवा रोड ट्रिप प्लॅन करतात पण श्रेयस त्या दोघांना 'शांतीवन' या ठिकाणी आणतो. एका ध्यान आश्रमासारखी ही जागा. या मित्रांच्या वरवरच्या हसत्या-खेळत्या आयुष्यात आत वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, जे ते शेअर करत नाहीत.तिघेही वरून आनंदी दिसले तरी आतून पार गोंधळलेले, विस्कळीत मनस्थितीतले. आपल्याला बऱ्याचदा डिनायलमध्ये जगण्याची सवय असते,  बऱ्याचदा आपला स्वतःचा स्वतंत्र विचार, मत न मांडता, लोक काय म्हणतील याचाच विचार करून, 'मी कोण आहे, मला नेमकं काय हवंय?' हे प्रश्न आपण स्वतःलाही विचारत नाही. त्यामुळे काही केल्या वास्तवाचा आपण स्वीकार करत नाही. आपण जसे आहोत त्या आपल्यातल्या मूळ व्यक्ती...

द मॅरीड वूमन - रिक्त की मुक्त?

Alt बालाजी ची नवीन वेब सिरीज द मॅरीड वूमन पाहिली. मंजू कपूर यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित. आस्था एक ड्युटीफुल, कर्तव्यदक्ष बायको, सून, आई पण त्याच बरोबर एक कॉलेज टीचर. संथ आणि एकसुरी बनलेलं आहे तिचं आयुष्य. सतत गृहीत धरलं जाणं, सतत दुय्यम वागणूक. पण विना तक्रार नाती निभावत राहायचं. कारण समाजाने तसे नियम आखलेत. तिची कहाणी तीच आपल्याशी बोलत सांगते पूर्णवेळ.  ऐजाज खान(इमाद शाह), तिने लिहिलेले नाटकाचे दिग्दर्शन करणारा एक स्वतंत्र, पुरोगामी विचारांचा, सर्वधर्मसमभाव मानणारा, त्याच्याकडे ओढली जात आहे आस्था पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू होतो आणि तिच्या आयुष्यात येते पिपलिका.(मोनिका डोग्रा) ऐजाज ची विधवा. एक आर्टिस्ट. आस्थाहून खूप निराळी. दोघी दोन ध्रुवांसारख्या, तरी एकमेकींच्या जवळ खूप जवळ येतात, प्रेमात पडतात. पिपलिकाच्या मते, "प्यार जेंडर नही, रुह देखके होता है".  काय आहे नक्की या दोघींचं नातं? केवळ तनाचं की मनाचंही? भावनांचा कोसळणारा प्रपात, जो चिंब करत आहे दोघींनाही. हे सगळं हवं हवसं आहे आस्थाला. पण ती विवाहित आहे, तिला एक सर्वसाधारण कुटुंब आहे, मुलं आहेत. ती त्यांना सोडून ...

Once in a year..

मुलगा अरिहंत ( Nipun Dharmadhikari )   आणि मुलगी रावी (मृण्मयी गोडबोले) भेटतात, त्यांची गोष्ट. वर वर साधं- सोपं वाटलं तरी वास्तवात असतं तसं क्लिष्ट असं त्यांचं नातं. 'वन्स इन अ यर' ही 2013- 2018 या वर्षांत घडणारी गोष्ट ( टायटल सॉंग अप्रतिम आहे, ऐकायला आणि बघायलाही). वय वाढतं तसं नात्याची परिपक्वता वाढत जाते तसेच प्रॉब्लेम्सही.  निपुणचा अभिनय पहिल्यांदाच पाहिला. सहज आहे, ओढून-ताणून नाही, कॅज्युअल आहे. मृण्मयीचे कॅरेक्टरही छान. दोघेही एकदम पुणेरी.  यातली सिनेमॅटोग्राफी ही एक उल्लेखनीय बाब आहे. लोकेशन्स छान आहे.  MXPlayer वर आहे. बघा जरूर.   - ©रमा

सेक्रेड गेम्स- सीजन 2

प्रभू रामचंद्राच्या वनवासानंतर अयोध्या नगरीने ज्या आतुरतेने त्यांची वाट पाहिली असावी तशी नेटफ्लिक्सवासीयांनी GOT, Narcos नंतर 'सेक्रेड गेम्स' च्या पुढच्या सीजन ची वाट पाहिली आणि पदरी दर दोन शिव्यानंतर अजून शिव्या असं काहीसं आलं.  झालं काय की ते, 'कुकू का जादू बादू' यात काही नव्हतं. यात सत्य होतं. आयुष्यातले सगळे दरवाजे बंद झाले की हतबल मनुष्य जितकी धडपड करता येईल तितकी करतो, मारतो, उडवतो, ओरडतो,  गुरु-पंथाच्या नादी लागतो, गंडे- दोरे बांधतो. ज्यावर विश्वास नाही ते सारेही करून पाहतो. गायतोंडेचा(नवाजुद्दीन) तिसरा बाप 'गुरुजी' हाही एक प्रकारचा झिंग देणारा धार्मिक कल्ट चालवत असतो जो मुंबई खतम करण्यासाठी गायतोंडेचा वापर करत असतो.  मागील सीजन गायतोंडेचा होता, त्याने कमाल केली. दुसरा सीजन सरताजसिंग (सैफ) चा आहे. तो शोधात आहे. जे काही सापडत आहे तो चकित आहे , शोधण्यासाठीची धडपड गायतोंडेचा इतिहास आणि संपणारी मुंबई, धर्माचे राजकारण आणि राजकारणातील भ्रष्ट्राचार हे सगळं इथं दाखवायचा प्रयत्न आहे. सीजन 1 पाहिला नसेल तर यातील 1-1 मूव्हचं संदर्भासहित स्पष्टीकरण कराव...

सेक्रेड गेम्स सीजन - १

सरताज सिंग ( सैफ अली खान ) या प्रामाणिक पोलिसाला अचानक माफिया जगतातील खूप मोठ्या गँगस्टर गणेश गायतोंडे( नवाजुद्दीन ) कडून टीप मिळते, की काहीच दिवसात मुंबई संपेल. आणि सुरू होतो एक खेळ माफिया, पोलीस जगत, राजकारण, सेक्सवर्कर्स, धर्म, यांचा खेळ. अश्वत्थामा, हलाहल, ययाती असे एपिसोडस्. (त्यांची नावे तशी का आहेत हे बघायला नीट पाहायला लागेल. दिवस फ्री असेल तर Bingworthy आहेच)  नवाजुद्दीनने नेहमीप्रमाणे काम छान केलं आहे पण तो मराठी माणूस नाही वाटत. गायतोंडे नाही वाटत. बाकी त्याचं काम सुंदर. मराठी नसता तर अजून चांगला इफेक्ट आला असता. कुकू, बंटी अशी काही पात्रं महत्त्वाची आहेत. सैफ अली खानने त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी झेप इथे घेतली आहे. गिरीश कुलकर्णी, राधिका आपटे अशा मराठी लोकांसोबतच भाव खाऊन जातो तो जितेंद्र जोशीने साकारलेला (काटेकर). जीव ओतणारा प्राणी. आहा. अप्रतिम.  शिव्यांनी ओतप्रोत भरलेला, सेक्स, हिंसेने भरलेला. सेक्रेड गेम्स.  बॉलिवूडमध्ये किंवा नव्या पिढीच्या वेब सिरीज जगतात क्रिमिनल वर्ल्ड हे अगदी रोजची उठण्याची - बसण्याची जागा अशी रंगवलेली आहे. एकदम...