मुलगा अरिहंत ( Nipun Dharmadhikari ) आणि मुलगी रावी (मृण्मयी गोडबोले) भेटतात, त्यांची गोष्ट. वर वर साधं- सोपं वाटलं तरी वास्तवात असतं तसं क्लिष्ट असं त्यांचं नातं. 'वन्स इन अ यर' ही 2013- 2018 या वर्षांत घडणारी गोष्ट ( टायटल सॉंग अप्रतिम आहे, ऐकायला आणि बघायलाही). वय वाढतं तसं नात्याची परिपक्वता वाढत जाते तसेच प्रॉब्लेम्सही.
निपुणचा अभिनय पहिल्यांदाच पाहिला. सहज आहे, ओढून-ताणून नाही, कॅज्युअल आहे. मृण्मयीचे कॅरेक्टरही छान. दोघेही एकदम पुणेरी.
यातली सिनेमॅटोग्राफी ही एक उल्लेखनीय बाब आहे. लोकेशन्स छान आहे.
MXPlayer वर आहे. बघा जरूर.
- ©रमा
Comments