Skip to main content

सलील चौधरी : एक श्रद्धांजली


बंगाल प्रांत हा मुळातच मुग्ध करणारा प्रदेश आहे. कलाप्रेमींवर तर बंगालची कायमच जादू राहिली आहे. के एल सेहगल पासून अनिल बिस्वास, एस डी, आर डी, हेमंतकुमार,
किशोरकुमार, मन्ना डे ते लोकगीतं गाणारे कुणी अनामिक, इथलं संगीत अत्यंत मधुर, मोहक संगीत आहे. या सर्वांतच मला 'सलील चौधरी' या संगीतकाराने नेहमीच मोहवून टाकलं आहे. आज सलील चौधरी यांचा जन्मदिवस.


सुरुवात झाली 'मधुमतीने'. एकूण 12 गाण्यांचं अप्रतिम प्रदर्शन. मुकेशची तरल "दिल तडप तडप" आणि "सुहाना सफर और ये मौसम हसीं", एकीकडे लताची आर्त हाक 
"आजा रे परदेसी", खेळकर "घडी घडी मोरा दिल धडके" आणि "जुल्मी संग आँख लडी" तर दुसरीकडे मोहम्मद रफीची "टुटे हुए ख्वाबोंने" ते "जंगलमे मोर नाचा" अशी बहुरंगी गाणी. "दैय्या रे, दैय्या रे चढ गयो पापी बिछुआ" गाण्याप्रमाणे  लहानपणापासूनच सलीलदांनी मला झपाटून टाकलं. आणि फिल्मी गीतांच्या जादुई दुनियेत मी प्रवेश केला.

मुकेशने सलीलदांच्या निर्देशनखाली ज्याप्रमाणे गायले आहे ते खरंच उल्लेखनीय आहे. अगदी 'मधुमती' च्या काळापासून ते 'आनंद' ची क्लासिक्स "मैने तेरे लिए ही", "कहीं दूर जब दिन ढल जाए" ते अगदी शेवटी शेवटी 'रजनीगंधा' मधलं "कई बार यूं ही देखा है" असेल, मुकेशने आपल्या हृदयीचे श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. 

मन्ना डे असे एक गायक होते ज्यांची सर्वोत्तम गाणी सलीलदांकडील होती. "दैय्या रे दैय्या रे' (मधुमती), "मौसम बिता जाय" ( दो बिघा जमीन), 'काबुलीवला' मधील यादगार
गीत "ए मेरे प्यारे वतन"..ऐकताना डोळ्यात पाणी येतं, मन भरून येतं. आणि 'आनंद' मधील "जिंदगी कैसी ये पहेली" यातले नितांत सुंदर स्वरमाधुर्य मन्ना डेनाच सादर करता आलं.

सलीलदांनी लता मंगेशकरांकडूनही अशी काही भावगाणी गाऊन घेतली की तोड नाही. "जागो मोहन प्यारे" (जागते रहो), "ओ सजना, बरखा बहार आयी" (परख), "ना, जिया
लागे ना" (आनंद), "न जाने क्यू, होता है यूं जिंदगी के साथ" (छोटीसी बात) ही सारी गाणी ऐकली की लता मंगेशकरांचे वेगळेच गायिकी ढंग समोर येतात. फक्त सलीलदाच असे संगीतकार असतील ज्यांनी कोरस मध्ये लता मंगेशकरना घ्यायचा प्रयोग केला असेल. द्विजेन मुखर्जी च्या 'माया' मधील गीत "ए दिल, कहाँ तेरी मंजिल" गाण्यात त्यांनी हा ऑपेरा कोरस यशस्वीपणे केला.

सलील चौधरींच्या संगीतात लोकगीत आणि शास्त्रीय संगीतातून स्फुरलेले संगीत यांचा सुगम संगम आढळून येतो. तलत-लता यांचे "इतना ना तू मुझसे प्यार बढा", मोझार्टच्या सिंफनीचा प्रभाव दिसतो. तसा अतिशय बेमालूम उपयोग त्यांनी अनेक गीतात केला. 

किशोरकुमारचा हट्टी, आवेगी, अनिश्चित असा स्वभाव सलीलदांनी नेहमी प्रभावीपणे हाताळला. 'हाफ टिकेट' च्या "चील चील चिल्लाके" त्यांनी किशोरकुमारला त्याच्या मर्जीप्रमाणे गाऊ दिले. पण 'मेरे अपने' तील "कोई होता, जिसको अपना" हे किशोरदांच्या सर्वात गाजलेल्या गाण्यांपैकी एक, हे गाणे सलीलदांनी ज्याप्रकारे गाऊन घेतले, खुद्द किशोरदांनाही नवल वाटलं.

सलील चौधरी 20 वर्षांपूर्वी जगातून निघून गेले, पण त्यांचे संगीत चिरंतन आहे. 

- रमा (अनुवादित) 
मूळ- Vikram Appasaheb Jadhav,
Kolhapur 19/11/2018

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ...

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां...