Skip to main content

Posts

Showing posts with the label Dear Jindagi

Pursuit of Happiness : आनंदाचा अथक शोध

परसूट ऑफ हॅपिनेस : आनंदाचा अथक शोध आयुष्यात आनंद कुणाला नको असतो? कुणाला भौतिक सुखात तर कुणाला आत्मिक समाधानात आनंद मिळतो. जो तो आनंदाच्या शोधात आहे, सगळ्यांचं एकच ध्येय आहे. Pursuit of Happiness.  या सिनेमाची कथाही एक खऱ्या चरित्रावर बेतलेली आहे. ख्रिस गार्डनर ( विल स्मिथ ), ख्रिस्तोफर ज्युनिअर ( जेडन स्मिथ ) हे खऱ्या जीवनातले बापलेकच यात दाखवले आहेत. एक बोन डेन्सीटी स्कॅनर मशीन, ज्याला फारशी मागणी नाही विकणारा सेल्समन ख्रिस व्यावसायिक पतनामुळे हैराण असतो. त्याची बायको मुलाला त्याच्यापाशी ठेवून निघून जाते, राहतं भाड्याचे घर जाते, शेअर बाजारात काम करण्यासाठी इंटर्न म्हणून विनापैसा ख्रिसला काम मिळते आणि मग सुरू होतो एक संघर्ष. आनंदाचा अथक शोध. घर नाही तर कधी पब्लिक टॉयलेटमध्ये तर कधी ट्रेन, बसमध्ये, स्वस्त डॉर्मिटरी मिळेल तिथे मुलाला घेऊन राहणे, खिशात, बँकेत पैशाचा खडखडाट असून सकारात्मक राहून गुजराण करण्यासाठी त्याची राहिलेली मशिन्स त्याला विकायची असतात. अनेक संकटांना सामोरं जाताना हा सिनेमा आपल्याला खूप काही शिकवतो. सकारात्मक दृष्टिकोन, हार न मानणे, स्वप्नांच्या पूर...

रिंगण! सुटता तुटेना माऊली..

रिंगण! आज घरातल्या देव्हाऱ्यात एकलाच उभा पांडुरंग बघून मकरंद माने दिग्दर्शित 'रिंगण' ची आठवण आली. अर्जुन मगर (शशांक शेंडे) आणि त्याचा मुलगा अभिमन्यू (साहील जोशी) या बापलेकाची कथा.  दुष्काळाने कर्जाच्या ओझ्यात पिचलेला शेतकरी, त्यात गहाण गेलेली जमीन. आत्महत्येचे सततचे विचार झटकून, पोरासोबत पंढरपूराला जातो. पोराची आई देवाच्या गावाला गेली असं सांगितल्यामुळे, इथे माझी आई सापडेल अशी आशा घेऊन आलेला 7-8 वर्षाचा त्याचा मुलगा. निराशेतून आत्मविश्वासाने, श्रद्धेने सकारात्मक मार्ग दाखवणारा 'रिंगण'.  बापलेकाचे नाजूक नाते, पापभिरू निष्पाप अर्जुन मगर आणि त्याचा निरागस मुलगा अभिमन्यू पंढरीच्या गावी तरी काही पदरी पडेल का अशी आशा करत आलेले असतात त्यांची कथा. पंढरपूरला वारीला रिंगण सोहळे असतात त्यामुळे तर हे नाव साजेसे आहेच पण आपण ज्याला चमत्काराच्या अपेक्षेने शोधत फिरतो, तो कुठे ना कुठं आपल्या सोबत निरनिराळ्या रूपात सकारात्मकता देऊन जातो. आपल्या मातीशी सुरू झालेला प्रवास पुन्हा आपल्या मातीशी नेऊन पोहोचवतो असे रिंगण. आपल्याजवळ जे नाही त्या पळत्याच्या पाठी धावता आपण हातचं स...

लस्ट स्टोरीज: कथा चार, अनंत विचार

'बॉम्बे टॉकीज' या अँथॉलॉजि फिल्म नंतर त्याच दिग्दर्शकांनी पुन्हा एकदा एका थीम वर आधारित चार गोष्टींची मालिका आणण्याचा प्रयोग 'लस्ट स्टोरीज' च्या चार कथांमध्ये केला आहे. ज्यांना ज्यांना सांगितलं "पाहा जरूर", almost सगळ्यांच्या akward reactions आल्या. ( की बाई, तुला काही भीड, मुरवत आहे की नाही, हळू सांग की, या विषयावर अशी बोंबलतेस काय?) आणि काय सांगू, हीच थीम आहे. 'लस्ट स्टोरीज' केवळ 'शारीरिक वासना' इतकाच विषय नाही हाताळत. सेक्स, गरज, सामाजिक दृष्टिकोन आणि taboos, व्यक्तिस्वातंत्र्य आणि स्त्री..  एकंदर या सगळ्यावर आधारित आहेत लस्ट स्टोरीज.  पहिली कथा अनुराग कश्यपची. राधिका आपटेने खाऊन टाकली आहे. लग्न झालेल्या बाईचे कलीग सोबत विद्यार्थ्यांसोबत fling. त्यातून होणारी सेक्स, रिलेशनशिप, प्रेम , गिल्ट, जेलसी यांची सरमिसळ सगळं सगळं ती आपल्यासोबत शेअर करते. नेहमीप्रमाणे प्रामाणिक अभिनय, कसलाही भपका नाही. 'Bold & Beautiful yet Confused' कालिंदी तिने मस्त रंगवलीये. आकाश ठोसर ला चांगली संधी मिळाली आहे, पण त्याने त्याच्या बोलण्यावर अजून क...

भरधाव 'सायकल'

या सिनेमाच्या कथेत कोकणातलं लहानसं गाव, त्यातला ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असणारा प्रसिद्ध केशव आणि त्याच्या आजोबांनी त्याला दिलेली प्रसिद्ध सायकल आहे. गज्या - मंग्या हो चोरांची जोडगोळी गावागावांत, घराघरातून हात मारत असताना ही सायकल चोरतात, त्याची ही गोष्ट! केशव, हुशार आहे, सज्जन आहे, म्हणूनच गावातल्या लोकांत त्याला मान आहे. बाकी तो लोकांना मदत करण्यासाठी कासेची लंगोटी काढून देईल, पण त्याची एक कमजोरी आहे. त्याचा जीव अडकला आहे सायकलमध्ये! आजोबांनी वडिलांना डावलून ती आपल्याला दिली, आणि म्हणूनच त्यांची ज्योतिषविद्याही तिच्याद्वारे आपल्याला बहाल केली असा त्याचा वेडा समज आहे. एरवी वस्तूत अडकून पडायचं नाही हे पाळणारा, इतरांना सांगणारा केशव 'सायकल' विषयी मात्र फक्त हळवाच नाही, हट्टी आहे. प्रत्येकाचा एक weak point असतो. त्याला धक्का लागला की तो माणूस कोलमडतो, तुटून पडतो, शक्ती गमावून बसतो. तसंच केशवचं होतं. इतकं की "केशवमुळे सायकल की सायकलीमुळे केशव"असा प्रश्न पडावा. चोरांच्या (प्रियदर्शन जाधव, भाऊ कदम) आयुष्यात सायकल काय येते आणि प्रेम, आपुलकी, माणुसकी या तत्त्वांचं बळ त्...

एक 'गुलाबजाम' मुरलेला

भारतातले अनेक पुरुष शेफ जगभरात विख्यात असले तरी, भारतात विशेषतः महाराष्ट्रात स्वयंपाक म्हणजे बाईचं काम हे समीकरण अजूनही घट्ट आहे. पण 'गुलाबजाम' चित्रपटाचा नायक आदित्य (सिद्धार्थ चांदेकर) हा आपला लंडन मधली भरभक्कम पगाराची नोकरी सोडून भारतात परत येतो, पुण्यात खास मराठी पद्धतीचा स्वंयपाक शिकायला. लंडन मध्ये खास मराठी पदार्थांचं रेस्टॉरंट काढणं हे त्याचं स्वप्न आहे, ध्यास आहे. त्याला पुण्यातील एका डबे देणारी बाई राधा आगरकरचा (सोनाली कुलकर्णी) शोध लागतो आणि आता या राधाकडूनच आपल्याला स्वयंपाक शिकायचा आहे अशी खूणगाठ बांधतो, आणि तर्हेवाईक, खडूस, थंड  राधा जी स्वयंपाक मात्र चविष्ट बनवते तिला आपली गुरू मानून शिकवण्यासाठी तयार करतो, आणि आयुष्यच बदलून जातं! इतकीच कथा. कथा म्हंटलं तर इथेच संपली, पण खरं तर इथे सुरू होते सचिन कुंडलकर, तेजस मोडक यांची ही कथा मांडते मानवी जीवनाचे अनेक कंगोरे. भुकेसारखी सुंदर आणि वाईट ही,  कॉम्प्लेक्स गोष्ट नाही या जगात. तिच्या पूर्तीसाठी आपण जगतो. तिच्यामुळे आपण जगतो. ही कथा स्वयंपाकाची आहे, आयुष्यातल्या वेगवेगळ्या घटकांची, वेगवेगळ्या परिमाणात घेऊन त्याल...

अपूर्व प्रकाशवाटा

आज एका अलौकिक, कल्पनातीत कलाकृतीचा आस्वाद घ्यायला मिळाला. महाकवी, कविकुलगुरू कालिदास यांची महान कलाकृती 'मेघदूत' आजवर अनेकांनी बसवलेली आहे, पण आजचा प्रयोग नावाप्रमाणेच 'अपूर्व मेघदूत' होता. एक अद्भुत नाट्यप्रयोग. द्रुष्टीक्षीणतेपासून, दृष्टिहीनतेपर्यंत अंधत्त्वाचे भिन्न प्रकार असलेले १९ प्रतिभाशाली अंध कलाकारांनी सादर केलेला नाट्यप्रयोग. गणेश दिघे यांचे लेखन असलेले हे दोन अंकी नाटक बसवले होते स्वागत थोरात यांनी. त्यांच्या बद्दल वेगळ्यानेच लिहायला हवे. पण कोल्हापुरात  'रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, मिड टाऊन' आणि 'सावी फाउंडेशन' यांनी हा प्रयोग घडवून आणला होता. प्रत्येक माणसाला व्यक्त व्हायचं असतं, त्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळी अभिव्यक्ती साधने निवडतो. तशीच ही अंध मंडळी. यांना नाटकाद्वारे आपली कला सादर करायची होती. महाराष्ट्राच्या विविध भागातून शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी पुण्यात असलेल्या अशा या मुलांना एकत्र घेऊन हे नाटक बसवलं गेलं आहे. आपापली कामे, शिक्षण सांभाळत ही मुले नाटक करत आहेत. आणि नाटक करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडून आले आहेत असे ते ...

कासव- माझ्या नजरेतून

सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटासाठी दिल्या जाणार्‍या सुवर्णकमळासह अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांत पारितोषिक पटकावणारा 'कासव' मी आज पाहून आले. माझे आवडते दिग्दर्शकद्वयी सुमित्रा भावे, सुनील सुकथनकार यांची अजून एक अप्रतिम कलाकृती. गेले काही दिवस मी पाहत असलेले चित्रपट हे खास 'माझ्यासाठी' बनवलेले आहेत, असं मला वाटतंय. त्यातला आशय, विषय, रचना, घटना हे माझ्याशी संबंधित असल्यासारखंच वाटतंय. (काही दिवसांपूर्वी 'बापजन्म' आणि आज 'कासव'), इतके की काही घटना आणि संवाद माझे आणि माझ्या आसपासचे असावेत असं वाटतंय. केवळ माझ्या मनात हा पाहून काय आलं, तेवढं लिहितेय नेहमीसारखं. 'नैराश्य' ही एकच थीम नाही या चित्रपटाची. माणूस हा समाजशील प्राणी आहे. आणि तरीही त्याला कधी कधी एकटेपणा हवासा वाटायला लागतो आणि या दोन परस्पर विरोधी प्रकृतीचा समतोल साधणं, हेच त्याचं जीवन आहे. कासवांसारखं तो कवचात जाऊन जगापासून स्वतःला फार काळ वेगळं ठेऊ शकत नाही. पण दुःख आत ओढून घेऊन बाह्य जगाला सामना करणं मात्र तो शिकतो.या समुद्री कासवांचं जीवनचक्र अगदी नवल वाटावं असं.. ...

'Untagged New year'

I watched the series ' Untag' on Voot just now. And I just unserstood, yes! This is what I need to do! Untag myself. It doesn't matter, how people look at me, judge me or tag me.. Be it 'Bechari', 'Fat', 'Poor thing', 'patient' or blah.. first I need to free myself from these tags! I have loving parents, caring relatives, harami friends who are never there when you need them.. of course they all love me. They'll always do. But I realize now that I in the first place need to love myself! I used to think life has taken away blooming years of my life but then I realized life doesn't give you anything but chances.. You have to give something to life. You owe a lot to life! The best of you. New year resolution, enjoy life, come what may.. So dear Jindagi, here I come babyy - Rama.. 

'व्हेंटिलेटर आणि मी'

'व्हेंटिलेटर'...ICU किंवा IICU च्या बाहेर  चिंताक्रांत, जीवाचं रान, डोळ्यात प्राण आणून, जाणून घ्यायला आतुर, पेशन्ट कसा आहे?? किती तरी जण नातेवाईक, मित्रमंडळी..अगदी सोमेे-गोमे सुद्धा.. पेशन्ट च्या प्रत्येक श्वासाबरोबर वर-खाली होणारा त्यांचा श्वास..कुणाचे बदलणारे भाव, कुणाच्या नवीन श्रद्धा/अंधश्रद्धा.. कुणाचे अजब सल्ले..हॉस्पिटल सारख्या जागी वागणारी माणसे, डॉक्टर्स..सिस्टर्स, ब्रदर्स.. काय करावं?? काय करावं?? 'अब इन्हे दवोंकी नही, दुवाओंकी जरूरत है' टाईप काहीसं सांगितल्यावर जवळच्यांनी मोठ्याने किंवा मनोमन फोडलेला टाहो.. काचेच्या आत असलेला आपला सगा, डॉक्टरी भाषेत केवळ पेशन्ट असतो..अशा शेकडो केसेस त्यांनी हाताळल्या असतात की त्यांची मनं खूप तय्यार असतात 'पेशन्टच्या हर तऱ्हेच्या रिस्पॉन्स साठी'..  मला कल्पना आहे या सगळ्या अग्निदिव्यातून आपले नातलग, मित्रपरिवार जात असतात, कुठं तरी अंधुक आशा असते, व्हेंटिलेटरवर आहे म्हणजे सगळं संपलं असं नाही..अजून चान्स आहे..2012 मध्ये काही लोकांनी तो चान्स घेतला आणि आज ती व्हेंटिलेटर वर ठेवलेली मुलगी 'व्हेंटिलेटर' सिनेमा ...

मला देव भेटला होता..

डोळे उघडत होते हळू-हळू..वेगळाच प्रकाश दिसत होता लांबून..खूप सुंदर अनुभव घेतला होता मी..मला देव भेटला होता.  I.C.U. बाहेरचा तो लांबच लांब कॉरीडोर..भकास..शांत..दोन-तिन बाकडी टाकलेली त्या तिथे..एका स्ट्रेचरवर मी झोपलेली वाट बघत..समोर स्पेशल रूम नं. १ दिसतेय. इतका अविस्मरणिय अनुभव घेऊन मी कधी एकदा आईला भेटेन असं झालेलं मला आणि मला इथेच का ठेवलय? इतकं काय खास झालं होतं?? मला देव भेटला होता. I.C.U. मधून काढून रूम मध्ये न्यायला इतका का वेळ? माझी चिडचिड व्हायला लागलेली..स्ट्रेचरवर पडल्या-पडल्या मी इकडे-तिकडे बघतेय..शेजारच्या त्या बाकावर एक बाई बसलेली.. कमालीचा ओळखीचा वाटतो नाही का चेहरा हिचा? अगदी शांत, सौम्य वगैरे..वात्सल्याला मूर्त रूप दिलं तर अगदी अशीच दिसेल. मी उगीचच बघतेय का हिच्याकडे केव्हाची? का ही टक लाऊन बसलीआहे माझ्याकडे? बोलावं का काही? हिचं कोणी अ‍ॅडमिट असेल का इथे? नक्कीच बरं झालेलं असेल. इतकी शांत, समाधानी दिसती आहे..की डॉक्टर असेल? पण कपडे तर डॉक्टरचे वाटत नाहीत.. अचानक तिच बोलायला लागते, "बरं वाटंतय का आता?" किती शांत आणि आपुलकीचा आवाज आहे हिचा.. मी - ...

Happy New Year

2012 कधी आले, गेले कळलेही नाही. मात्र एक सल खुपतो आहे तो आहेच. किती बदलले आहे सारे. कुठले सत्य आणि कुठले स्वप्न काहीच कळेनासे झाले आहे. किती माणसे गोठल्यासारखी झाली आहेत.  माझ्या अवतीभवती आई- बाबा-विठू  सगळ्यांचच  schedule बदललं आहे. पण आज प्रार्थना पूर्वक संकल्प करते. माझी तब्येत fine वरून best वर जाण्यासाठी मी प्रयत्न करेन. शक्यतो कुणालाही चुकुनही दुखावणार नाही. जिभेवर जी सरस्वती नाच करते तिला कागदावर उतरवेन . कारण कागदावरचे शब्द खोडता येतात तोंडातून गेलेले शब्द पुसून टाकता येत नाहीत, की मागे घेत येत नाहीत. मी 'नितळ' चित्रपटातलं एक गीतच संकल्प म्हणवून घेते. पानीसा निर्मल हो मेरा मन, धरतॆस अविचल हो मेरा मन , सुरजसा  तेजस हो मेरा मन, चंदासा शीतल हो मेरा मन, धुंदलाई  आंखे, भारमाया चित्त हैं  समझे ना मन को सत्य या असत्य हैं , चंचलता, मोग से दूर रहे , अपनेही द्रोहसे दूर रहे , करुणामय, निर्भय हो मेरा मन ... २०२३ अधिक सुंदर असावं . आरोग्यसम्पन्न असावं. माझ्याकडून चांगला लेखन घडावं . असणार .सगळं   काही चांगल...