Skip to main content

Posts

Showing posts with the label साहित्य
कोल्हापूरचा महापूर नको नको ते राहून गेले हवे हवे ते, वाहून गेले पूरात उरल्या सुरलेल्यांना सैतानच मग पाहून गेले ढग फुटले नि कोसळला रात्रंदिवस धो धो ढळला किंकाळ्या मूक प्रेतांच्या ऐकून, पाहून तळमळला गुरे-ढोरे, जमिनी घरकुल आणि फुटके-तुटकेसे पूल जीव वाचूनही सारे गेले जसे एखादे कुस्करले फूल म्हणे 'कलयुग' आले कोणी कुणी सांगी भविष्य वाणी मला फक्त दिसत राहते भयाण पावसाचे पाणी आले उठून हात मदतीचे दिवस-रात देण्या साथीचे कोण-कुणाचे नाही तरीही 'आपला' या एका नात्याचे एकमेकांपासून होते दूर जोडी त्यांना हा  महापूर मदतीला जे पुढे धावते ते कोल्हापूर, ते कोल्हापूर  - ©रमा PC-The Hindu

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां...

योगायोग..

मंगेश पाडगांवकर आणि कुसुमाग्रज दोघेही माझे आवडते.. पाडगांवकर अगदी प्रांजळपणे कबूल करतात की सुरुवातीच्या काळातील त्यांच्या कवितांवर कुसुमाग्रजांची छाप आहे. १६ व्या वर्षी जेव्हा पाडगांवकरांच्या कवितेला नुकतेच धुमारे फुटत होते, कुसुमाग्रजांचा 'विशाखा' काव्यसंग्रह त्यांना तोंडपाठ होता. तसा तो पार सत्तरीनंतरही होता. कुसुमाग्रज 'धनुर्धारी' मासिकाचे संपादक असताना, पाडगांवकरांनी त्यांच्या ऑफिसात घुसून त्यांना आपल्या कविता वाचायला दिल्या.तिच्यावर कुसुमाग्रजांची छाप दिसत होतीच. असे2-3 वेळा झाले, कुसुमाग्रज प्रत्येकवेळी हसत..'लिहित रहा' म्हणत . धनुर्धारीच्या एका दिवाळी अंकात कुसुमाग्रजांची 'महाकालीस' ही क्रांतीचे आवाहन करणारी कविता छापून येणार होती, ती वाचल्यावर पडगावकरांनी त्यावर उत्तर म्हणून एक कविता लिहिली आणि कुसुमाग्रजांना दाखविली. कुसुमाग्रज नुसते हसले. आणि त्या वर्षीच्या दिवाळी अंकात दोघांच्याही कविता छापून आल्या.. पाडगावकरांच्या कवितेला मिळालेला तो एक विलक्षण सन्मान होता. ७० वर्षांचे असताना त्यांना पुन्हा एकदा कुसुमाग्रजांना भेटायचा योग आला. 68 ...

'सलाम'

आज मंगेश पाडगावकरांचा वाढदिवस. ऊफ्फ ते गेले नाही का.....जयंती..त्यांची जयंती! ते 2-3 वेळा घरी येऊन गेले असतील,पण त्या माणसानं मला वेड लावलं. तसं वेड अनेकांनी लावलं, पण भेटता आलं फक्त यांनाच. आपली कविता सादर कशी करावी, 'कोई इनसे सिखें'.. त्या जाड काचेच्या चष्म्यातून डोळ्यातलं भावदर्पण प्रेक्षकां ना अर्पण कसं करावं..आणि आपल्या वाचकांच्या 'वाह वा' ला ही आपणच दाद कशी द्यावी, यांच्याकडूनच शिकावं.. ना विषयाचं, ना वयोमानाचं, कसलंच बंधन नसे या माणसाला. सुखं-दुःख, अनुभव, कल्पना साऱ्या साऱ्या पलीकडल्याही वास्तवाचं दर्शन घडवणारं हे निराळाचं रसायन. ' रस्ता चुकलेलं त्यांचं वेडं कोकरू जेव्हा आईच्या कुशीत शिरतं, आपल्या जीवात जीव येतो, आईची उब जाणवते . कधी संध्याकाळी मनात काहूर माजतं, ते म्हणतात, 'डोळ्यात सांजवेळी, आणू नकोस पाणी'... मीडियाचा मुजोरपणा आणि आतंकवाद, वाढती असहिष्णुता याने आपलं मन हतबल झालं की ते म्हणतात,  ' कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी..गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी' हिडीस गाण्यावर थिरकणारी तरुणाई पाहून मला आठवते त्यांचे, ...

गप्पा ..

सोसायटीत गेटपाशी फुललेले दोन गुलमोहर.. काही पार्टीज मध्ये पाहतो ना आपण काही सुबक, नखरेल, छान नटून थटून, रंगरंगोटी केलेल्या, विशिष्ट हसू घेऊन वावरणार्या ललना , तशा भासणार्या अगदी.. गॉसिप करत.. "त्या रस्त्याच्या पलीकडचा आंबा नाही का तो, वास सुटला होता त्याचा" " छे गं, परवाच्या गारपीटीने चांगलच झोडपून काढलंन, एक आंबा राहील तर खैर..बरीच हळहळ ऐकली त्या माणसांकडून".. "अरेरे.. पण आपणही झोडपले जातो, ओरबाडले जातो, तरी चर्चा फक्त आपल्या बहराची.. हा उन्हाळा जीवघेणे वार करणार आणि आपण काय करायचे ,तर अजून फुलून यायचे..मग त्याचं कौतूक होणार.." शेजारची रातराणीची वेल म्हणते कशी,  " कुछ सितम तो ऊठाने पडते है, हर रात, मै यूंही तो नही खिल आती"... 

प्रेमाचा दिवस..

"प्रेमाचे रे कसले दिवस घालता??", पंतोजी डाफरत होते.. कुण्णी कुण्णी म्हणून त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते..बिल्डिंगमध्ये वॅलेंटाईन्स डे मोठ्या उत्साहाने साजरा होत होता. दिवसभर पंतोजीनी जीव तोडून निषेध व्यक्त केला, पण बधतो कोण?? संध्याकाळी नेहमीप्रमाणे फिरून येताना त्यांनी कोपर्‍यावरच्या फुलवाल्याकडून सोनचाफा घेतला. घरी येऊन तो उशाशी ठेवून एकटेच हुंगण्यापेक्षा त्यांनी का कोण जाणे, का़कुंच्या केसात माळला. काय दिसलं त्यांच्या डोळ्यात काय माहित, पण सोनचाफा जरा जास्तच सुंदर दिसला हे नक्की.. "हे काय भलतच आज?" काकुंनी आश्चर्‍याने विचारले.. "हॅपी वॅलेंटाईन्स डे", पंतोजी लाजून म्हणाले..