"प्रेमाचे रे कसले दिवस घालता??", पंतोजी डाफरत होते..
कुण्णी कुण्णी म्हणून त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते..बिल्डिंगमध्ये वॅलेंटाईन्स डे मोठ्या उत्साहाने साजरा होत होता.
दिवसभर पंतोजीनी जीव तोडून निषेध व्यक्त केला, पण बधतो कोण??
संध्याकाळी नेहमीप्रमाणे फिरून येताना त्यांनी कोपर्यावरच्या फुलवाल्याकडून सोनचाफा घेतला.
घरी येऊन तो उशाशी ठेवून एकटेच हुंगण्यापेक्षा त्यांनी का कोण जाणे, का़कुंच्या केसात माळला.
काय दिसलं त्यांच्या डोळ्यात काय माहित, पण सोनचाफा जरा जास्तच सुंदर दिसला हे नक्की..
"हे काय भलतच आज?" काकुंनी आश्चर्याने विचारले..
"हॅपी वॅलेंटाईन्स डे", पंतोजी लाजून म्हणाले..
Comments