सोसायटीत गेटपाशी फुललेले दोन गुलमोहर..
काही पार्टीज मध्ये पाहतो ना आपण काही सुबक, नखरेल, छान नटून थटून, रंगरंगोटी केलेल्या, विशिष्ट हसू घेऊन वावरणार्या ललना , तशा भासणार्या अगदी..
गॉसिप करत.. "त्या रस्त्याच्या पलीकडचा आंबा नाही का तो, वास सुटला होता त्याचा"
" छे गं, परवाच्या गारपीटीने चांगलच झोडपून काढलंन, एक आंबा राहील तर खैर..बरीच हळहळ ऐकली त्या माणसांकडून"..
"अरेरे.. पण आपणही झोडपले जातो, ओरबाडले जातो, तरी चर्चा फक्त आपल्या बहराची.. हा उन्हाळा जीवघेणे वार करणार आणि आपण काय करायचे ,तर अजून फुलून यायचे..मग त्याचं कौतूक होणार.."
शेजारची रातराणीची वेल म्हणते कशी,
" कुछ सितम तो ऊठाने पडते है,
हर रात, मै यूंही तो नही खिल आती"...
Comments