Skip to main content

सेक्रेड गेम्स सीजन - १




सरताज सिंग ( सैफ अली खान ) या प्रामाणिक पोलिसाला अचानक माफिया जगतातील खूप मोठ्या गँगस्टर गणेश गायतोंडे( नवाजुद्दीन ) कडून टीप मिळते, की काहीच दिवसात मुंबई संपेल. आणि सुरू होतो एक खेळ माफिया, पोलीस जगत, राजकारण, सेक्सवर्कर्स, धर्म, यांचा खेळ. अश्वत्थामा, हलाहल, ययाती असे एपिसोडस्. (त्यांची नावे तशी का आहेत हे बघायला नीट पाहायला लागेल. दिवस फ्री असेल तर Bingworthy आहेच) 

नवाजुद्दीनने नेहमीप्रमाणे काम छान केलं आहे पण तो मराठी माणूस नाही वाटत. गायतोंडे नाही वाटत. बाकी त्याचं काम सुंदर. मराठी नसता तर अजून चांगला इफेक्ट आला असता. कुकू, बंटी अशी काही पात्रं महत्त्वाची आहेत. सैफ अली खानने त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी झेप इथे घेतली आहे. गिरीश कुलकर्णी, राधिका आपटे अशा मराठी लोकांसोबतच भाव खाऊन जातो तो जितेंद्र जोशीने साकारलेला (काटेकर). जीव ओतणारा प्राणी. आहा. अप्रतिम. 

शिव्यांनी ओतप्रोत भरलेला, सेक्स, हिंसेने भरलेला. सेक्रेड गेम्स.  बॉलिवूडमध्ये किंवा नव्या पिढीच्या वेब सिरीज जगतात क्रिमिनल वर्ल्ड हे अगदी रोजची उठण्याची - बसण्याची जागा अशी रंगवलेली आहे. एकदम डिट्टेल. पण तसा तो असणारच. या सिरीज चा जॉनर च क्राईम थ्रिलर आहे. शिव्या नको असतील तर नेटफलिक्सवर फॅमिली ड्रामा पाहावेत. 

माफिया जगतात "आपला पार्श्वभाग सांभाळा" अशा भाषेची अपेक्षा कशी करणार? संवाद आहेतही करारी, त्यांची फेकही करारी. काही काही वेळा अंगावर शहाराही येतो. पण अनुराग कश्यप टच आला की तो 'तोचतोचपणा' पाहून तो शहारा जातोही. 

वय +16 . फॅमिलीसोबत पाहण्यासारखी नाही.  न्यूडीटी वर हकनाक दंगा करणार्यांना सांगावं वाटतं, यार तुम्हाला शरीर नाही का? का कपडे घालून आलात जगात? सेक्स सीन्स जरा अति आहेत, आणि ते टाळता आले असते हे मात्र पटतंय. पण इथे कोणत्याशा कमेंटमध्ये समलैंगिकतेवर निगेटिव्ह लिहिलेलं नाही आवडलं. (I hope that was sarcastic)

अशा पठडीचे काही पाहण्याची तयारी असेल तर पाहा, नाहीतर मी 'सेक्रेड गेम्स', आणि 'गेम ऑफ थ्रोन्स', 'नार्कोज', 'ब्लॅक मिरर' नाही पाहिलं तर लोक मला वाळीत टाकतील की काय अशा जबरदस्तीने बघू नका.  सीजन-2 पाहिल्यावर त्यावर लिहीन. 

@रमा जाधव  #Netflix #SacredGames

Comments

Popular posts from this blog

शांतनू मॉइत्रा: बहती हवासा बावरा मन

प्रसिद्ध पार्श्वसंगीतकार, संगीतकार शांतनू मॉइत्राचा जन्म 22 जानेवारी 1968 मध्ये लखनौ इथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण (स्प्रिंगडेल स्कूल) येथे झाले. " इथे गाता गाता माझ्यातल्या संगीताला वाव मिळाला. आत्मविश्वास मिळाला " असे ते सांगतात. त्यांच्याच स्प्रिंगडेल स्कूलचे माजी विद्यार्थी सुश्मित बोस या अर्बन-लोकगीत गायककडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर ते एका ऍड एजन्सी मध्ये क्लायंट सर्व्हिस एक्सिक्यूटिव्ह म्हणून रुजू झाले, आणि संगीत केवळ छंद बनून राहिला होता.  एकदा अगदी लास्ट मिनिटाला जिंगल बनवायची आहे असे प्रदीप सरकार यांनी शांतनुना सांगितले. त्यांनी ते जिंगल बनवलं. ते होतं " बोले मेरे लिप्स, आय लव्ह अंकल चिप्स ". यानंतर त्यांनी अनेक कंपनींसाठी जिंगल्स बनवले. नंतर त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध अशा इंडी-पॉप अल्बम्स साठी संगीत दिले. शुभा मूदगल यांनी गायलेली " अब के सावन ऐसे बरसे " आणि '' सपना देखा है मैने "  ही त्यातली काही गाजलेली गीते. 2002 मध्ये मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर त्यांना सुधीर मिश्रांच्या ...

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

"न्यूड : नग्नतेतील मुक्त कलाविष्कार"

आत्ता 'न्यूड' पाहिला. एखाद्या कथेचं चित्रात रूपांतर व्हावं आणि प्रत्येक ब्रशस्ट्रोक सोबत तयार व्हावी एक एक अप्रतिम फ्रेम आणि त्यांची एक बनावी चित्रमालिका या साऱ्यांनी बनला आहे 'न्यूड'. गावातून मुंबईला आलेली यमुना 'न्यूड मॉडेल' बनते. का? कशी? त्याचे होणारे परिणाम, पात्रांची आणि शेवटी आपलीही बदलत जाणारी विचारसरणी याची गोष्ट आहे न्यूड मध्ये.  चित्रपटाची कथा नग्नतेवर बेतली असली तरी कुठेही भडक होत नाही. अश्लीलतेचा लवलेश नाही. मॉडेल म्हणून तयार होताना आधी यमुनेची होणारी तडफड, तगमग, अगतिकता आपल्याला अस्वस्थ करून सोडते.  चित्रपटात एक मोठा कलाकार (एम.एफ.हुसेन वर बेतलेला)  मलिक (नसिरुद्दीन शाह) नायिकेचं न्यूड काढता काढता तिच्याशी आणि आपल्याशीही गप्पा मारतो. "मी घोड्यांची चित्रं काढली तर कुणाला हरकत नाही, पारव्यांची चित्र काढली कुणी बोलत नाही, मग मी माणसांची चित्रं काढली तर इतका हंगामा कशासाठी?", कलाकार 'रुह' पाहत असतो. तीच चितारत असतो.  चित्रपटाची कथा नग्नतेवर भाष्य करत असली तरी कुठेही भडकपणा नाही. काही प्रसंग अंगावर येतात पण ते त्य...