Tv मालिकांना कंटाळून पुन्हा पाऊले चालती नेटफ्लिक्सची वाट करत आज मी नेटफ्लिक्स वरची नवीन वेब सीरिज 'घूल' पाहिली. ते काय आहे, मला हॉरर प्रकार आवडतो आणि नेटफ्लिक्सने दत्तक घेतलेली राधिका आपटेही.
अरबी लोककथेनुसार 'घूल' हे असे भूत असतात जे माणसांना खातात आणि मग त्यांचे रूप धारण करतात.
3 एपिसोडमध्ये याचा पहिला सीझन शूट केलेला आहे. साधारण हॉररपटांमध्ये होणारा धक्कातंत्राचा वापर इथे खूपच कमी आहे. त्यामुळे इथे घाबरण्यासाठी पाहणाऱ्या प्रेक्षकांना काही सस्पेन्स वगैरे मिळतच नाही.
काही ठिकाणी अक्षरशः बोर व्हायला झाले. ज्यांना इंग्रजी हॉररपट बघायची सवय आहे त्यांना फार काही वेगळा वाटणार नाही. पण राजकीय पार्श्वभूमी, गुप्त एजन्सी, मुस्लिमाना आतंकवादी लेबल लावून केलेले इंटेरोगेशन, देशभक्ती आणि धर्म अशा महत्त्वाच्या विषयातील काही clichés इथे आढळतील.
Sacred Games शी याची तुलना होऊच शकत नाही. त्यात छोट्याशा भूमिकेतही भाव खाऊन गेलेली राधिका आपटे यात निदाच्या भूमिकेत predictable वाटायला लागते.
पण तरीही it's worth a try. काळा, पांढरा, ग्रे शिवाय पुढच्या सीझनमध्ये काही वेगळा रंग दिसतो का पाहू.
3/5
Comments