यावेळचे पहिले गाणे होते राज कपूर च्या श्री ४२० मधले, 'रमैय्या वस्तावैय्या'. या गाण्याची कथा अशी की गीतकार शैलेंद्र एकदा एका अर्धवट बांधलेल्या इमारतीजवळून जात असताना तिथले आंध्र कामगार 'रमैया वस्तावैय्या' या बोलांचे तेलगू लोकगीत गात होते. शैलेंद्र च्या मनात हे शब्द पक्के बसले आणि ते त्यांनी आपल्या गाण्यात बसवायचे ठरवले. या किश्श्यासोबतच अजून एक योगायोग म्हणता येईल असा किस्सा की संगीतकार शंकर, यांनी बऱ्याच चाली आगाऊ च बांधलेल्या होत्या, कारण आर.के सोबत काम करताना एका थीम सॉंग च्या किमान ५ चाली ऐकवाव्या लागत आणि त्यातली एखादी निवडली जाई. शंकर यांनी ते हैदराबाद मध्ये काम करताना या गाण्याची चाल आधीच बनवून ठेवली होती. तीची प्रेरणाही आंध्र लोकगीतच होतं. शंकर, शैलेंद्र, राज कपूर तिघांनाही माहित नव्हते, की पुढे जाऊन हे गाणं एकत्र बांधलं जाणार आहे. या अनोख्या बोलांचा अर्थ आहे "Ramaiyya, will you come back ?"
दुसरे गाणे होते 'भाई-भाई' चित्रपटातले. यात अशोककुमार, किशोरकुमार या वास्तवातल्या भावांच्या जोडीने काम केले आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे मदनमोहन यांनी एकाच चित्रपटात एकाच रागात २-२ गाणी बांधली आहेत. यातले अनोखे बोल असलेले गीत जे सादर झाले ते होते. 'मेरा नाम अब्दूल रेहमान', किशोरकुमार आणि निम्मी या जोडीवर चित्रित झालेले हे गीत गायले आहे किशोरकुमार आणि लता मंगेशकर यांनी. मी घरी येताच या गाण्याचा व्हिडीओ पाहिला आणि किशोरकुमार ने या अनोख्या बोलांवर त्याच्या नेहमीच्या अंदाजाने त्याला साजेसा एफर्टलेस दंगाही पाहिला. म्हणजे ही उछलकूद करण्यासाठीच जणू हे गाणे रचले होते.
यानंतरचे गाणे एक प्रसिद्ध 'Circumstantial Tragedy' , 'जादू' या चित्रपटातले. अनोखे बोल 'लारा लू, लारा लू', नलिनी जयवंत वर चित्रित हे गाणं, यातला तिचा डान्स अतिशय सुंदर आहे, नौशादने संगीतबद्ध केलेलं हे गाणं काहीसं स्पॅनिश म्युजिक ची आठवण करून देतं. यात त्यांनी चायनीज ब्लॉक्स या वाद्याचा इतका छान वापर केला आहे, आणि आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे गाण्याच्या शेवटाला चायनीज ब्लॉक्स असे वाजलेत की बस्स!! निव्वळ कम्माल!!
फूटपाथ सिनेमातील 'आरारारारम.. सुहाना है ये मौसम, सलोना मोरा बालम ' हे आशा भोसले च्या आवाजातले, खैय्याम ने संगीतबद्ध केलेले, मजरुह सुलतानपुरी लिखित गाणं, त्यातल्या तरल अकॉर्डीअन च्या वापरामुळे चांगलेच लक्षात राहिलं. यानंतर 'लाजवाब' पिक्चर मधले 'डिंगु, नाचे रे गोरी डिंगु' हे लता मंगेशकर, बिनापनी मुखर्जी यांच्या अवजातलं हे गीत. अनिल बिश्वास यांचाही यात बॅकग्राऊंडला आवाज आहे. अनिल बिश्वास यांनी लता मंगेशकर याना Voice modulation व श्वासोच्छ्वासाचं तंत्र शिकवलं, हे लता मंगेशकर आवर्जून सांगतात. जलद लयीच्या या गाण्यातही लताबाई कधी श्वास घेतात आज्जीबात कळून येत नाही..
नंतर नागीन सिनेमातील 'ओ, जिंदगी देनेवाले' हे गाणे ऐकवले, हेमंतकुमार गायक आणि संगीतकार दोन्ही रूपात आपल्याला चकित करतात. यातले अनोखे बोल, इतके अनोखे आहेत की ते लिहिता येणंही अवघड आहे. लोकगीतातले इतके अस्सल शब्द आहेत ते, त्या गाण्याला वेगळीच उभारी देतात. यातला कोरस जो आहे, तो बॅकड्रॉपला शेवटपर्यंत तसाच राहतो, ही अजून एक खासियत. सूर अविनाशी, निर्गुण आहे, पण जसे अमर्त्य, निराकार आत्म्याला कार्य करण्यासाठी मर्त्य शरीराची गरज असते, तसेच स्वर हा 'स्वयं राजयति स: स्वर:' असा असूनही त्याला शारीर व्यंजनाची कशी गरज असते ते या गाण्याच्या दाखल्याने समजावून दिले. एक वेगळीच 'झिंग' या नागिन मधील गीताने दिली.
नंतर नागीन सिनेमातील 'ओ, जिंदगी देनेवाले' हे गाणे ऐकवले, हेमंतकुमार गायक आणि संगीतकार दोन्ही रूपात आपल्याला चकित करतात. यातले अनोखे बोल, इतके अनोखे आहेत की ते लिहिता येणंही अवघड आहे. लोकगीतातले इतके अस्सल शब्द आहेत ते, त्या गाण्याला वेगळीच उभारी देतात. यातला कोरस जो आहे, तो बॅकड्रॉपला शेवटपर्यंत तसाच राहतो, ही अजून एक खासियत. सूर अविनाशी, निर्गुण आहे, पण जसे अमर्त्य, निराकार आत्म्याला कार्य करण्यासाठी मर्त्य शरीराची गरज असते, तसेच स्वर हा 'स्वयं राजयति स: स्वर:' असा असूनही त्याला शारीर व्यंजनाची कशी गरज असते ते या गाण्याच्या दाखल्याने समजावून दिले. एक वेगळीच 'झिंग' या नागिन मधील गीताने दिली.
यानंतर 'सजा' या फिल्म मधल्या 'गुचूप, गुपचूप प्यार करे' हे गाणे, निम्मी' आणि देव आनंद यांच्यावर चित्रित, संध्या मुखर्जी आणि हेमंतकुमार यांच्या आवाजातले गाणे. यातल्या कोरस चेही बोल 'आदिवासी भाषेतले' अनोखे असे काहीसे होते. संध्या मुखर्जी चा आवाज 'Voice of Suchitra Sen' म्हणून का लोकप्रिय झाला असावा याची प्रचिती येते. पण खरंच त्यापेक्षाही खूप मोठ्या रेंज चा असा हा आवाज आहे. खूपच सुंदर.आणि हेमंतकुमारांविषयी वेगळे काय सांगावे? गाण्याला संगीत आहे एस.डी. बर्मन यांचे.
गीतकार, संगीतकार, कथा, पटकथाकार असे बहुआयामी प्रतिभावान सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेले, बिमल रॉय यांच्या क्लासिक 'दो बिघा जमीन' मधले 'हरियाल सावन ढोल बजाता' हे मन्नाडे यांच्या आवाजातले गाणे ऐकवले . 'तगतग तगतग तगीनतागीन रे' असे अनोखे बोल या गाण्यात आहेत. आसामी, बिहू, बंगाली लोकसंगीताला पाश्चात्य सिम्फनीची जोड द्यायची कल्पना सलीलदांनाच सुचू शकली.
दास्तान चित्रपटातले 'तरारी अरारी अरारी' या अनोख्या बोलातले गाणे मोहम्मद रफी आणि सुरेय्याच्या सुरेल आवाजातले. नौशादने हिंदी चित्रपट संगीतात पाश्चात्य वाद्यांचा अनोखा मेळ साधलेला आहे तो या गाण्यात सुरेख आढळतो.
पुढचे गाणे होते 'एक थी लाडकी' मधले 'लारा लप्पा, लारा लप्पा लाई रखदा', पंजाबी ढंगातले हे एक उडत्या चालीचे मोहम्मद रफी, लता यांच्या आवाजत अतिशय प्रसिद्ध असे हे गाणे. मीना शौरी वर चित्रित.
यापुढे आले 'काली घटा' चित्रपटातले 'ई ला बेली ला आरे, दिन है प्यारे प्यारे' हे गाणे. शैलेंद्र आणि हसरत जयपुरी यांनी लिहिलेले हे गाणं, शंकर जयकिशन यांनी संगीत दिलेलं.
तर कार्यक्रमाची सांगता झाली 'बाबूल' सिनेमातील 'नदी किनारे, साथ हमारे' हे गाणं, नौशाद यांचं संगीत, कोळीगीतात हे गाणं गुंफलं आहे. शमशाद बेगम, तलत आणि रफी यांच्या आवाजातलं असं हे गाणं आहे. 'झिंगोडा, झिंगोडा, झिंग हो, नदियामें उठा है सोर' असे अनोखे बोल असलेले हे गीत.
याच गाण्यात पुढे ओळी आहेत त्याप्रमाणेच,
"धरती पर आकाश है जबतक,
दिल का नगर आबाद रहेगा
ढलता सूरज, धूप सुनहरी
आजका मौसम याद रहेगा"
अगदी तस्साच हा स्मृतिगंध लिसनर्स क्लब चा 'अनोखे बोल' थीम वाला कार्यक्रम नक्कीच रसिकांना 'याद रहेगा'
२६ फेब्रुवारी २०१७
स्मृतिगंध लिसनर्स क्लब- Episode 2
२६ फेब्रुवारी २०१७
स्मृतिगंध लिसनर्स क्लब- Episode 2
Comments