सुमित्रा भावे गेल्या. माझी आवडत्या दिग्दर्शक जोडगोळीची अपरिमित हानी झाली. या बाईंनी मला काय काय दिलं त्यांच्या चित्रपटातून. दहावी फ, दोघी, देवराई, अस्तु, वास्तुपुरुष, कासव. नुसतं भरभरून देणं, देणं आणि देणं. मला त्यांची शैली अफाट आवडायची. एक प्रयोगशील आणि दर्जेदार कलावंत हरपला. नेमकं काय आणि कसं बोलावं कळत नाही. सुन्न व्हायला होतं आहे. वयाच्या 78व्या वर्षी ही व्यक्ती चुटपुट लावून जाते. अर्थात सगळ्यांच्या मरणाने असाच त्रास होतो, पण मला राग येतो आहे. असं कोणी जातं का? निसर्गाने असं कसं करावं असं काहीसं त्यांच्या विचारांच्या विसंगत मनात येत आहे. विविध सामाजिक प्रश्न, त्यांचा नात्यांवर होणारा परिणाम, बंधने, जीवाची होणारी घुसमट याने पिचणारी स्थिती त्यांनी अनेकदा पडद्यावर चितारली. उपायही सुचवले. प्रेक्षक थोड्या थोडक्या का प्रमाणात त्या प्रश्नाबाबत डोळस आणि सकारात्मक दृष्टिकोन घेऊन बाहेर पडायचे. 10 राष्ट्रीय पुरस्कार मिळवणं येऱ्यागबाळयाचं काम नाही. सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटासाठी दिल्या जाणाऱ्या सुवर्णकमळासह इतर अनेक पुरस्कारप्राप्त 'कासव'. असुरक्षित वाटलं की कासव...
सुचेल ते, रुचेल ते, दुखेल ते, खुपेल ते.. Random Mindnotes..