कुठे हरवले अवखळ मीपण..
रिते जाहले कुठे बालपण..
सूर कुठेसा दिसतो तरीही..
शब्दांनाही आता मुकेपण..
अनोळखी अन तूही आताशा..
सुटलेली ही कशी गुंतवण..
परिचितसे भास सभोवती..
उभे ठाकती करून रिंगण..
सुचेल ते, रुचेल ते, दुखेल ते, खुपेल ते.. Random Mindnotes..
Comments