दाटून भोवताली, अंधार सावल्या ह्या त्या दूरच्या दिव्यांचा, नुसताच भास आहे .. लवलेश ना असावा, कुठल्याच वेदनेचा ही व्यर्थ मृगजळाची, अतृप्त आस आहे .. जो-तो दिसे स्वत:चा, सेवा असे स्वत:ची कळले कधी न त्याला त्याचाच दास आहे .. फिरले जगात साऱ्या, देवास भेटण्याला बघता मनात कळले, माझ्यात वास आहे..
सुचेल ते, रुचेल ते, दुखेल ते, खुपेल ते.. Random Mindnotes..