दाटून भोवताली, अंधार सावल्या ह्या
त्या दूरच्या दिव्यांचा, नुसताच भास आहे ..
लवलेश ना असावा, कुठल्याच वेदनेचा
ही व्यर्थ मृगजळाची, अतृप्त आस आहे ..
जो-तो दिसे स्वत:चा, सेवा असे स्वत:ची
कळले कधी न त्याला त्याचाच दास आहे ..
फिरले जगात साऱ्या, देवास भेटण्याला
बघता मनात कळले, माझ्यात वास आहे..
Comments