Skip to main content

Posts

Showing posts from July, 2014

आता तरी डोळे उघडा..

गणपती उत्सव अवघ्या महिन्यावर येउन ठेपला आहे. त्या निमित्ताने त्याच्या सार्वजनिक स्वरूपावर थोर सत्यशोधक विचारवंत व सुधारक ना. कै. भास्करराव जाधव यांनी काही परखड मते व्यक्त केलेली आहेत. ती संक्षिप्त रूपाने इथे मांडत आहेत प्रस्तुत लेख हा १९२४ म्हणजे ९० वर्षांपूर्वीचा आहे. या वरून भास्कररावांची दूरदृष्टी आणि सामन्यांचा धर्मानुकरणाच्या नावाखाली अजूनही चाललेला वेडेपणा लक्षात येईल. यात सांगितलेले आर्थिक व्यवहाराचे स्वरूप पाहता त्याची या काळात तुलना केल्यास पैशाचाही किती जास्त अपव्यय आहे हे दिसून येईल.  गणपती उत्सवाचा नावाखाली दर साली होणारा धिंगाणा व त्याद्वारे होणारी धर्माची विटंबना थांबविण्याच्या इच्छेने भास्कररावांनी गणपती उत्सवाच्या मागची मूळ कल्पनाम सद्यस्थिती (तत्कालीन), झालेले दुष्परिणाम इ. चा थोडक्यात पण मार्मिक शब्दात या पत्रिकेत आढावा घेतला आहे. सत्यशोधक समाज, मुंबई पत्रक - गणपती उत्सव गणपती उत्सव या नावाने होणारा दर सालचा 'धिंगाणा' लवकरच सुरू होईल. वाडी-वाडीतून व मोहल्ल्यातून व चाळीचाळींतून मंडळे स्थापन होऊन वर्गण्याही  (बरेचवेळा सक्तीने) जमा केल्या जातील. उत्सवाचा...

तरीही...

कुणी कुणाचे नाही, हेही माहीत असते, जपत राहतो उगीच काही नाती तरीही... दिवस असे हे कंठीत जातो केविलवाणे जगू पाहतो उदास काही राती तरीही... उन्मळून पडताना पाहून या झाडांना डोलत राहती गवती काही पाती तरीही... जळणे किंवा विझणे हेची प्राक्तन आहे माहित असूनी जळती काही वाती तरीही... समानतेचा डंका पिटूनी तिन्ही त्रिकाळी जगात खितपत राहती काही जाती तरीही...

ते काय म्हणतात...

देव,संत अन थोर महात्मे कशास म्हणतील आम्हा पूजा? आपल्यामधला जिंका दानव, भक्तीभाव मग नसे दुजा बंधुत्व, प्रेम,निस्वार्थ बाणवा, नको हार वा मुकुट,भोग दंभ, क्रोध, वासनाच हरतील, अशा गुणांना सदा भजा मानवता हा धर्म असावा, कशास त्यावर दंगल वाद षड्रिपूच जर वसणार अंतरी, कशास करता आम्हा खुजा???