कुणी कुणाचे नाही, हेही माहीत असते,
जपत राहतो उगीच काही नाती तरीही...
दिवस असे हे कंठीत जातो केविलवाणे
जगू पाहतो उदास काही राती तरीही...
उन्मळून पडताना पाहून या झाडांना
डोलत राहती गवती काही पाती तरीही...
जळणे किंवा विझणे हेची प्राक्तन आहे
माहित असूनी जळती काही वाती तरीही...
समानतेचा डंका पिटूनी तिन्ही त्रिकाळी
जगात खितपत राहती काही जाती तरीही...
जपत राहतो उगीच काही नाती तरीही...
दिवस असे हे कंठीत जातो केविलवाणे
जगू पाहतो उदास काही राती तरीही...
उन्मळून पडताना पाहून या झाडांना
डोलत राहती गवती काही पाती तरीही...
जळणे किंवा विझणे हेची प्राक्तन आहे
माहित असूनी जळती काही वाती तरीही...
समानतेचा डंका पिटूनी तिन्ही त्रिकाळी
जगात खितपत राहती काही जाती तरीही...
Comments