एक होती पिकलपोनी..गोबरे गाल, नकटं नाक,अतिशय हट्टी..नाकावर राग..आई-बापूची एकदम लाडकी. एकदा तिने बापूजवळ धरला हट्ट, "मला बाहेर घेऊन जा, जा म्हणजे जा.. आत्ताच्या आत्ता.. " बापू पण लग्गेच तय्यार. म्हणाला, "चल, पटकन तयार हो, निघूया.. " आई म्हणाली, "अहो, आता अंधारून आलय, आता कशाला जाताय ?.. अगं पिकलपोनी उशीर झालाय आता, आता उद्या जा हा" . आई असं म्हंटल्यावर बापू जरा डळमळला, "हो, हो, उद्या जायचं का मग आपण?" पिकलपोनीने गाल फुगवले, डोळे मोठ्ठे केले, ओठांचा चंबू केला (नेहमीप्रमाणे) एक हात कमरेवर आणि एक पाय तालावर आपटत आपलं पेटंट गाणं सुरु केलं.. "जा बाबा बापू, असच कर तू.. सगळे असच करतात.. माझे कुणीच लाड नाही करत. जा बाबा. . " शेवटी आई म्हणाली "जा बाई, जा. . पण लग्गेच परत यायचं. . पाण्याची बाटली घेउन जा बरोबर, खबरदार बाहेरचं काही खाल्लं तर. गप घरी वरण-भात खायचा. आणि दादाला पण न्या सोबत. अभ्यास केलाय त्याने दिवसभर. पिकलपोनी पटकन तयार झाली आणि बापू, पिकलपोनी आणि पिकल बंबू यांची स्व...
सुचेल ते, रुचेल ते, दुखेल ते, खुपेल ते.. Random Mindnotes..