'स्मृतिगंध लिसनर्स क्लब' म्हंटल्यावर दर्दी संगीत प्रेमींसाठी पर्वणीच असते. या महिन्याच्या कार्यक्रमाची थीम ही अगदी अनोखी होती. 'अनोखे बोल'!! काही गाण्यातले काही शब्द खूप वेगळेच असतात, बऱ्याचदा त्यांचे अर्थ, प्रयोजनही आपल्याला ठाऊक नसते, तर कधी कधी त्यांना अर्थ असतंच नाही. पण तरीही ते गाण्याला मजा आणत असतात. तर असे 'अनोखे बोल' असणारे रेकॉर्डस यावेळी वाजवण्यात आल्या. या आयोजकांचा संग्रह आणि अभ्यास आपल्याला पुन्हा-पुन्हा थक्क करून सोडतो. कुठून कुठून या रेकॉर्डस् मिळवल्या आणि त्याचा इतका डिटेल अभ्यास या मंडळींनी केला आहे, आश्चर्यचकित करून सोडतो. यावेळचे पहिले गाणे होते राज कपूर च्या श्री ४२० मधले, 'रमैय्या वस्तावैय्या'. या गाण्याची कथा अशी की गीतकार शैलेंद्र एकदा एका अर्धवट बांधलेल्या इमारतीजवळून जात असताना तिथले आंध्र कामगार 'रमैया वस्तावैय्या' या बोलांचे तेलगू लोकगीत गात होते. शैलेंद्र च्या मनात हे शब्द पक्के बसले आणि ते त्यांनी आपल्या गाण्यात बसवायचे ठरवले. या किश्श्यासोबतच अजून एक योगायोग म्हणता येईल असा किस्सा की संगीतकार शंकर...
सुचेल ते, रुचेल ते, दुखेल ते, खुपेल ते.. Random Mindnotes..