आज बहुचर्चित 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' पाहिला. (सौजन्य-Netflix) एक हवाई मंजिल नामक पुरानी हवेली त्यातल्या 4 स्त्रियांची ही कहाणी. यांनी अपराध केला आहे. स्वप्नं पाहण्याचा. आपल्या मर्जीने आयुष्य जगण्याची स्वप्नं, स्वतःच्या शरीरावर प्रेम करण्याची स्वप्नं. कर्मठ कुटुंबाच्या कचाट्यापासून ते सेक्सिस्ट, दांभिक समाजाच्या so called मूल्यांशी झगडून स्वातंत्र्य मिळवण्याची स्वप्नं. त्यांना ती स्वप्नं पाहण्याचा अधिकार आहे तो एका उंबऱ्या आडूनच. लिपस्टिक च्या लाखो शेड्स सारखी रंगीत स्वप्नं असतील. पण ती लपवायची. त्यांना लपूनछपून रहायची परवनगी आहे. पण बुरख्याआड. भोपाळ सारख्या ठिकाणी असलेल्या या बायका. रेहाना ही कॉलेज कन्या. तिच्याघरीच बुरखा शिवण्याचा व्यवसाय आहे. पण रॉकस्टार बनावं, बेधुंद नाचावं, गावं, जीन्स सारखा पेहनावा करावा असं तिला वाटतं. सनातनी मुस्लिम कुटुंबातील बंधनांना झुगारुन, पारतंत्र्याच्या बुरखा फाडून तिला मोकळं व्हायचंय. दुसरी लीला. बळजबरीने लग्न लावले जाणारी एक तरुणी, प्रियकर आणि होणारा नवरा यांच्या कात्रीत सापडलेली, बिझनेस करावा, दिल्ली गाठावी अशी तिची ...
सुचेल ते, रुचेल ते, दुखेल ते, खुपेल ते.. Random Mindnotes..