सरताज सिंग ( सैफ अली खान ) या प्रामाणिक पोलिसाला अचानक माफिया जगतातील खूप मोठ्या गँगस्टर गणेश गायतोंडे( नवाजुद्दीन ) कडून टीप मिळते, की काहीच दिवसात मुंबई संपेल. आणि सुरू होतो एक खेळ माफिया, पोलीस जगत, राजकारण, सेक्सवर्कर्स, धर्म, यांचा खेळ. अश्वत्थामा, हलाहल, ययाती असे एपिसोडस्. (त्यांची नावे तशी का आहेत हे बघायला नीट पाहायला लागेल. दिवस फ्री असेल तर Bingworthy आहेच) नवाजुद्दीनने नेहमीप्रमाणे काम छान केलं आहे पण तो मराठी माणूस नाही वाटत. गायतोंडे नाही वाटत. बाकी त्याचं काम सुंदर. मराठी नसता तर अजून चांगला इफेक्ट आला असता. कुकू, बंटी अशी काही पात्रं महत्त्वाची आहेत. सैफ अली खानने त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी झेप इथे घेतली आहे. गिरीश कुलकर्णी, राधिका आपटे अशा मराठी लोकांसोबतच भाव खाऊन जातो तो जितेंद्र जोशीने साकारलेला (काटेकर). जीव ओतणारा प्राणी. आहा. अप्रतिम. शिव्यांनी ओतप्रोत भरलेला, सेक्स, हिंसेने भरलेला. सेक्रेड गेम्स. बॉलिवूडमध्ये किंवा नव्या पिढीच्या वेब सिरीज जगतात क्रिमिनल वर्ल्ड हे अगदी रोजची उठण्याची - बसण्याची जागा अशी रंगवलेली आहे. एकदम...
सुचेल ते, रुचेल ते, दुखेल ते, खुपेल ते.. Random Mindnotes..