एफ. स्कॉट फिट्झगेराल्ड लिखित शॉर्ट स्टोरीवर आधारित चित्रपट, ' क्युरिअस केस ऑफ बेंजमिन बटन '. अतिशय वेगळी अशी कथा आहे बेंजमिनची, आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या पात्रांची. असा बेंजामिन जो जन्माला येताच 80+ वर्षाच्या म्हाताऱ्यासारखा. जन्मदात्री आई मरून जाते तर त्याचे वडील मिस्टर बटन त्याचा त्याग करतात, एक आफ्रिकन अमेरिकन कुटुंब त्याला आपलं म्हणून सांभाळतात. वय जसं वाढतं तसं बेंजामिन मात्र अधिकाधिक तरुण होत जातो. आणि याच गोष्टीमुळे त्याचे सखे-सोयरे, प्रेयसी यांच्यासोबतच्या त्याच्या नात्यांवर कसा परिणाम होतो, जन्मानंतर पाळण्यातला बेंजामिन, मृत्यूपूर्वीही पाळण्यातले लहान बाळ होऊन जातो. याची ही विचित्र कहाणी. चित्रपटातील ब्रॅड पिट, केट ब्लाँचेट, ताराजी हॅन्सन यांचा अभिनय आउटस्टँडिंग आहेच पण डेव्हिड फिंशरचे दिग्दर्शनही छान आहे. कथा मांडणी सुंदरपणे केली आहे. प्रोस्थेटिक मेकअप, स्पेशल इफेक्ट्स, एडिटिंग याबाबतीत ही फिल्म अभ्यासली पाहिजे इतकी सरस आहे. चित्रपटाची कथा एका मरणासन्न वयस्क बाईच्या डायरीतून उलगडते आणि ती नंतर सुरू होणाऱ्या कॅटरिना हरिकेनइतकी गुंतागुंतीची आहे....
सुचेल ते, रुचेल ते, दुखेल ते, खुपेल ते.. Random Mindnotes..