बॉलीवूडमध्ये इतके हुशारीने बनवलेली 'ड्रॅमॅटिक सटायर' फारच कमी. डार्क कॉमेडीचा इतका सुंदर वापर 'जाने भी दो यारो' इतका नसला तरी तरी वेगळ्या खुबीने केला आहे. जुही चतुर्वेदी लिखित आणि शुजित सरकार दिग्दर्शित हा 'गुलाबो सिताबो' हा तो चित्रपट.लखनौ शहराची पार्श्वभूमी, मोडकळीस आलेली 'फातिमा महल' नामक खास लखनौवी हवेली, त्याची मालकिण बेग़म (फ़ारुख़ जाफ़र) हिचा नवरा एक हावरट, कंजूस ' सतत आयजीच्या जीवावर' असलेला ८० ला येऊनही ही हवेली कधीतरी आपल्या मालकीची होईल या भ्रमातला म्हातारा मिर्झा , आणि ढेर सारे भाडेकरू. अगदी ३०रु ते ७० रु इतक्याशा भाड्यावर राहणारे. आयुषमान खुरानाने साकारलेला 'बांके' हा 'मै गरीब हू' म्हणत आपल्या बहिणींना सांभाळणारा भाडेकरु सतत भाडे देण्यास कुचराई करण्यात पटाईत. यांच्या आयुष्यात पुरातत्व खात्याचे लोक आणि बिल्डर मंडळी यांची एन्ट्री होते आणि एरवी एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त मिर्झा (अमिताभ बच्चन) आणि बांके (आयुषमान) यांची अवस्था सुरुवातीला आणि शेवटाला दाखवलेल्या गुलाबो आणि सिताबो या कठपुतळ्यांसारखी होते. अमिताभ बच्चनचे ...
सुचेल ते, रुचेल ते, दुखेल ते, खुपेल ते.. Random Mindnotes..