काल खूप दिवस ज्याची वाट पाहणं सुरू होतं त्या ' शांतीत क्रांती ' या वेब सिरीजचं binge watch केलं. सारंग साठ्ये, पॉला मॅक्ग्लिन दिग्दर्शित या बहुचर्चित सिरीज मध्ये 3 मित्रांची कथा आहे. प्रसन्न ( ललित प्रभाकर ), श्रेयस ( अभय महाजन ) आणि दिनार (आलोक राजवाडे ) यांची ही आजच्या तरुणाईला रिलेट होईल अशी गोष्ट. तीन मित्र, अगदी लंगोटी यार. अगदी 'हम दोस्त थे, दोस्त है और हमेशा रहेंगे' कॅटेगरी. तिघे गोवा रोड ट्रिप प्लॅन करतात पण श्रेयस त्या दोघांना 'शांतीवन' या ठिकाणी आणतो. एका ध्यान आश्रमासारखी ही जागा. या मित्रांच्या वरवरच्या हसत्या-खेळत्या आयुष्यात आत वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, जे ते शेअर करत नाहीत.तिघेही वरून आनंदी दिसले तरी आतून पार गोंधळलेले, विस्कळीत मनस्थितीतले. आपल्याला बऱ्याचदा डिनायलमध्ये जगण्याची सवय असते, बऱ्याचदा आपला स्वतःचा स्वतंत्र विचार, मत न मांडता, लोक काय म्हणतील याचाच विचार करून, 'मी कोण आहे, मला नेमकं काय हवंय?' हे प्रश्न आपण स्वतःलाही विचारत नाही. त्यामुळे काही केल्या वास्तवाचा आपण स्वीकार करत नाही. आपण जसे आहोत त्या आपल्यातल्या मूळ व्यक्ती...
सुचेल ते, रुचेल ते, दुखेल ते, खुपेल ते.. Random Mindnotes..