Skip to main content

सोबत..

थोडे झेलले चांदणे
थोडी उन्हाची ही वाट
घाटाघाटांतून कधी,
कधी चाललो सरळ

कधी मौनाचे अंतर
तुझ्या-माझ्या प्रवासात
चिंब चिंब झालो ओले
कधी कोण्या श्रावणात

कधी टपोरं चांदणं
कधी ग्रासले ग्रहण
मन वेडं गाव सदा
जाई तुजला शरण

बघ नवा ऋतु आला
आज पुन्हा अंगणात
गेली काळोखाची रात
दारी नवी ही प्रभात..

                                   

Comments

Anonymous said…
love your words Rama...simply love them...kudos