Skip to main content

Posts

Showing posts from September, 2013

सांग ना....

ओढ ही तूझीच, प्रीत जागवी रे काय जादू झाली, आठवू कशी मी खेळणे तुझे हे, असे जीवघेणे, बंध काळजाचे सोडवू कशी मी चांदण राती, ईशारे, बहाणे तुझे ते पहाणे, थांबवू कशी मी काहूर मनीचे, डोळियाचे पाणी स्पंदने उराची लपवू कशी मी कहाणी अधूरी, अधूरी ही सरगम शब्द आणि सूर आळवू कशी मी... सांग ना....

भोग..

प्रेम हे मजला मिळाले भरभरूनी, द्यावया कोणास ते उरणार नाही हुंदके जरी दाटले माझ्या उराशी, नयन परी अश्रूंनी भरणार नाही सोसण्याचा छंद ना मजला तरी, भोग हा भाग्यातला सरणार नाही आहेत माझीही गिर्‍हाणे सांगावयाला, मांडावयाचा खेळ मी करणार नाही....

प्रीत सावळ्याची..

ना बासूरी ना श्याम तरीही समजूनी आले मला, अलगूज सावळ्याच्या मनीचे उमजूनी आले मला.. रंग उधळीता नभीचे, सरितेवरी प्रतिबिंब रंगे का बुडाल्या श्यामरंगी गोपिका कळले मला.. हा रेशमी नात्यांचा गोफ विणते राधिका, श्वासात त्याच्या गुंतली का, ते परी कळले मला.. 

Life of Pi

काल ' Life of Pi' पाहीला.  खूप दिवसांनी इतका विलक्षण अनुभव घेतला . इतकी  गुंतागुंतीची तरीही हळू हळू उलगडत जाणारी अशी पटकथा मनावर पहिल्यापासून शेवटपर्यंत पकड ठेवून राहते. हा नुसता चित्रपट नाही तर अनुभव आहे असाच म्हणावा लगेल. याची कथा नमूद करणं  खरं  तर अवघड आहे . पण याचे दिग्दर्शन आणि cinematography ही केवळ अवर्णनीय आहे. केवळ एक Computer Animated फिल्म नाही तर एक सुंदर द्रुश्यमाला  पाहून कुठेही कृत्रिमतेचा भास होत नाही . Yaan Martel च्या कादंबरीवर बेतलेला ही सिनेमा Ang Lee नी दिग्दर्शित करून आपल्या कारकिर्दीत ३ रा Academy Award पटकावला आहे . एका जहाजाच्या अपघातात आपला कुटुंब गमावलेला १६ वर्षाचा Pi एका लहानशा बोटीवर Pacific महासागरात जीव वाचवतो . या साऱ्या गोष्टीत  स्वतः Pi  , त्याचे आईवडील , भाऊ , जहाजावरचा कूक , खलाशी  आणि त्याच्या वडिलांच्या झू मधले जे  छोट्याशा बोटीत भेटतात ते झेब्रा, तरस, ओरांगोतन माकड यांचे समांतर संबंध हे फार विचारपूर्वक सांधलेले अहेत. तर असा हा अनुभव. वाचून नाही, पहावा अस...