काल ' Life of Pi' पाहीला. खूप दिवसांनी इतका विलक्षण अनुभव घेतला . इतकी गुंतागुंतीची तरीही हळू हळू उलगडत जाणारी अशी पटकथा मनावर पहिल्यापासून शेवटपर्यंत पकड ठेवून राहते. हा नुसता चित्रपट नाही तर अनुभव आहे असाच म्हणावा लगेल.
याची कथा नमूद करणं खरं तर अवघड आहे . पण याचे दिग्दर्शन आणि cinematography ही केवळ अवर्णनीय आहे. केवळ एक Computer Animated फिल्म नाही तर एक सुंदर द्रुश्यमाला पाहून कुठेही कृत्रिमतेचा भास होत नाही . Yaan Martel च्या कादंबरीवर बेतलेला ही सिनेमा Ang Lee नी दिग्दर्शित करून आपल्या कारकिर्दीत ३ रा Academy Award पटकावला आहे .
एका जहाजाच्या अपघातात आपला कुटुंब गमावलेला १६ वर्षाचा Pi एका लहानशा बोटीवर Pacific महासागरात जीव वाचवतो . या साऱ्या गोष्टीत स्वतः Pi , त्याचे आईवडील , भाऊ , जहाजावरचा कूक , खलाशी आणि त्याच्या वडिलांच्या झू मधले जे छोट्याशा बोटीत भेटतात ते झेब्रा, तरस, ओरांगोतन माकड यांचे समांतर संबंध हे फार विचारपूर्वक सांधलेले अहेत.
तर असा हा अनुभव. वाचून नाही, पहावा असाच अनुभव. माझा recommendation 'Must watch'..
Comments