Skip to main content

प्रीत सावळ्याची..

ना बासूरी ना श्याम तरीही
समजूनी आले मला,
अलगूज सावळ्याच्या मनीचे
उमजूनी आले मला..
रंग उधळीता नभीचे,
सरितेवरी प्रतिबिंब रंगे
का बुडाल्या श्यामरंगी
गोपिका कळले मला..
हा रेशमी नात्यांचा
गोफ विणते राधिका,
श्वासात त्याच्या गुंतली
का, ते परी कळले मला.. 

Comments