प्रेम हे मजला मिळाले भरभरूनी,
द्यावया कोणास ते उरणार नाही
द्यावया कोणास ते उरणार नाही
हुंदके जरी दाटले माझ्या उराशी,
नयन परी अश्रूंनी भरणार नाही
नयन परी अश्रूंनी भरणार नाही
सोसण्याचा छंद ना मजला तरी,
भोग हा भाग्यातला सरणार नाही
भोग हा भाग्यातला सरणार नाही
आहेत माझीही गिर्हाणे सांगावयाला,
मांडावयाचा खेळ मी करणार नाही....
मांडावयाचा खेळ मी करणार नाही....
Comments