त्या तिथे कोपर्यात रुसून बसली ताई
सगळं फक्त बाळाला, मला काई नाई??
टपोर्या डोळ्यातून येतं टपटप पाणी
ऐकव तू फक्त त्यालाच ती गाणी
येऊच दे बाबाला मी सांगते त्याला नाव,
आमचा सुद्धा आहे म्हंटलं वेगळासा गाव..
सुचेल ते, रुचेल ते, दुखेल ते, खुपेल ते.. Random Mindnotes..
Comments