खरंतर मला सैराट वर लिहायचा अत्यंत कंटाळा आला होता, खरंतर पाहायला जायचाही कंटाळा आला होता. 'ईशकजादे' असेल असंही मी पिक्चर न बघताच समज करून घेतला होता ( काही लोकेशन्स ते ट्रेनचं, शेतांचं वगैरे बॅकग्राऊंड) .. पण एका मेसेज वर रिप्लाय करता करता हे ओकलं.
मेसेज साधारण असा होता की बाबांनो सैराट जास्त सिरियसली घेऊ नका, नाहीतर जन्मभर डोशांच्या गाडीवर कांदे कापावे लागतील, अभ्यास करा, जेव्हा व्हायचं तेव्हा प्रेम , लग्न- बिग्न होईल, वगैरे कोण्या एका पालकाची व्यथा मांडली होती.
मी फार समर्थन करत नाही पळून जाऊन लग्न करण्याचं, पण 0 तुन संसार उभा करण्याची ताकद कमावलीच ना आर्चि , परशानं ? आज कित्येक IT वाले नोकरी नाही म्हणून घरी बसून आहेत, फॅक्टरीत काम करून, डोश्याच्या गाडीवर कांदे कापून का होईना स्वतःचं घर येण्याइतपत हिम्मत किती जण दाखवतील? कुठलंही काम इमाने इतबारे केलं तर ते कमी दर्जाचं नाही.
मी म्हणेन सैराट बघा एका वेगळ्या अँगलनं, आणि ऑनर किलिंगचा निषेध करा. ( ई, असं सांगणं म्हणजे खरंतर 'त्या पाक सपोर्टर खानड्यांचे पिक्चर बघू' नका टाएप चं आहे),
मी पण आधी अज्जिबात बघणार नव्हते . फुकट तिकिटे मिळाली म्हणून का कोण जाणे गेले. खरंतर शोकांतिका मला नकोशा वाटतात. वास्तवाशी कोसो दूर असलेले किंवा मग हलके फुलके असे सिनेमे मी नेहमी प्रेफेर करते. असो.... पण मी सैराट पाहिला, आवडला. काही अनावश्यक पार्ट सोडला तर मध्यंरापर्यंत स्वप्नाळू असलेला सैराट , नंतर एक जीवनाचं वास्तव दाखवतं, प्रत्येकाला त्याला सामोरं जावं लागतं हे दाखवतं. पण झगडणं दाखवतं आणि तरीही इतकी क्रूरता माणसात आहे, फुका अभिमान कसा भयंकर हिंसेत परावर्तित होतं हे दाखवलं आहे. मध्यांतरपर्यंत झिंगाट वर थिरकणारी पावलं , थिएटरमधून निघताना थरथरत, सुन्न मनाने निघतात.
या सिनेमाला गरजेपेक्षा जरा जास्तच डोक्यावर घेतलंय असंही वाटतं खरंतर, पण तरीही लोकहो, सगळ्यांनीच नोकऱ्या केल्या तर डोसे कुठे खायचे ना म्हणून सैराट बघा...
- रमा
Comments