मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे तर इतर किरवंतांकडूनही त्यांचे उपजीविकेचे साधन हिरावून घेणे वगैरे प्रकाराने त्यांचेही शोषण करतात.
हिंदू धर्मातील दशक्रिया विधींसह एकूणच प्रथा, परंपरेवर चित्रपटातून परखड भाष्य करण्यात आले आहे. ब्राह्मणी कर्मकांडावर, जातींच्या उतरंडीवर बोलणारा हा सिनेमा २५ वर्षांपूर्वी आलेल्या बाबा भांड यांच्या कादंबरीवर आधारीत आहे. त्यामुळे ब्राह्मण महासंघाचा यावरील आत्ताचा हल्ला निव्वळ हास्यास्पद आहे. सगळे किरवंत लूट करतात असे यात दाखवले आहे का? नाही! त्यांनाही गरिबी आणि कुचेष्टेला सामोरे जावे लागते असेच यात दाखवले आहे. यात कुठेही ब्राह्मणांचा व विशेष करून किरवंतांचा अपमान करण्याचा हेतू दिसून येत नाही. न्हावी त्याचे दुकान मांडून बसलेला आहे, माणूस मेल्यावर क्रियाकर्मासाठी जे साहित्य लागतं त्याचेही दुकान आहेच. मृत व्यक्तीच्या घरातील माणसे दुःखात बुडालेले असतात व विशिष्ट गोष्टी केल्याशिवाय मेलेलं माणूससुद्धा कर्मकांडांच्या कचाट्यातून सुटत नाही हेच यात दाखवले आहे .
किरवंतांचं दुःखही या सिनेमात दाखवले आहेच. दक्षिणा न मिळाल्याने गरीब, फाटका, उपाशी असा किरवंत मिलिंद फाटक यांनी त्यांची भूमिका उत्तम साकारली आहे. केशव भटजी हे एरवी मेलेल्यासही पिळून काढणारे किरवंत, पण गुढी पाडव्याच्या कार्यक्रमाला अपमान झाल्यावर त्याच्या डोळ्यातल्या संतापाबरोबरच, दुखावले जाऊन आलेले अश्रूही मनोज जोशीने तितक्याच कसोशीने दाखवले आहेत.
केवळ वास्तव आणि वास्तव दाखवलेने हिंदू धर्माला सतत चटके का बसतात कळत नाही. गम्मत जम्मत नावाच्या कार्यक्रमात अरुण नलावडेने एक चांगला किरवंत ब्राह्मण साकारला आहे. म्हणजे कलाकृती वेगवेगळा विषय घेऊन बनलेल्या असतात, तशी तशी पात्रं चांगली वाईट साकारलेली असतात. माणूस हा काही फक्त कृष्ण धवल असत नाही. त्यामुळे कुठलाही एक माणूस पूर्णपणे आदर्शाचा पुतळा किंवा पूर्णपणे वाईट असत नाही. चांगल्या वाईटपणाच्या कमी जास्त छटा असतात. समाज माणसांनी बनलेला असतो, त्यामुळे तर तो अनेकविध छटांचा असतो. चांगल्या-वाईटांनी बनलेला असतो. मग त्यातल्या एखाद्या छटेकडे लक्ष वेधलं तर याचा अर्थ असा नाही की दुसरे रंग अस्तित्वातच नाहीत.
कलाकृतीने धर्म बाटतो ही पाचकळ कल्पना ज्यांनी मांडली त्यांनी पहिल्यांदा ती कृती पाहावी, समजून घ्यावी आणि मग त्यावर बोलावे. चित्रपट माझ्यादृष्टीने एक चांगली कृती आहे. पहिला भाग जरासा संथ आहे, गाणीही गाळली असती (कीर्तन गीत सोडून) तर चित्रपटाला अजून वेग आला असता असं वाटतं. एका लहान मुलाची धर्मविधींकडे पाहण्याची दृष्टी, कुतूहल हे सगळं त्या मुलाने छान वठवले आहे. चित्रपटाचा अंत हा नवीन गोष्टींना, प्रश्नांना जन्म देणारा आहे.
आमच्या घरी कुणी गेले, की घाटावरून आले की बास. कसले दिवस नाहीत, कसले विधी नाहीत. देव असलाच तर त्याच्या आणि आपल्यामध्ये कोणीही मध्यस्त नको ही आमची विचारसरणी. सगळे मिळून गेलेल्या व्यक्तीचं स्मरण करून प्रार्थना करतो फक्त. तेही त्याचा अर्थ जाणून, सर्व प्राणिमात्र सुखी राहोत, आरोग्यदायी राहोत, चांगले पाहोत, कुणाला कसले दुःख नसावे. आपण सारे एकत्र येऊन, एकत्र या जगण्याचा आनंद घेऊ असे मागणे मागतो. त्यामुळे चित्रपट पाहून माझ्या पोटात खड्डाच पडला.. हे इतकं सारं? जिवंत असताना दिलखुलास जगायचं सोडून मेल्यानंतर कसली सुटका मागतो माणूस, असे वाटले. सत्यशोधक भास्करराव जाधव या माझ्या पणजोबांनी तसा पायंडा पाडला नसता तर आम्हीही कदाचित रूढींच्या चक्रात अडकलो असतो या विचाराने जास्त खड्डा पडला. माझ्या काकांनी अत्यंत दुःखद शारीर वेदना सहन करत, कॅन्सर सारख्या आजाराशी झुंजत असतानाही आपल्यानंतर सगळ्यांनी अडकून न पडता आपापल्या कर्मास लागावे हे सांगणारे मृत्यूपत्र केले होते. मला वाटतं कुणी तसे वागले तर दशक्रियाच काय, जन्म-मृत्यू शिकवणारा त्याहून मोठा विधी नसेल.
- रमा

Comments