Skip to main content

Posts

Showing posts from February, 2018

"आम्ही दोघी - एक धागा विणलेला"

काल 'आम्ही दोघी' पाहिला. गौरी देशपांडें च्या 'पाऊस आला मोठा' या कथेवर बेतलेला हा सिनेमा. दिग्दर्शिक प्रतिमा जोशी यांनी कथेवर सुंदर काम करून चित्रपट बनवला आहे. संवाद जास्त करून कथेतलेच असल्यामुळे भाग्यश्री जाधवला फारसे काही करावे लागलेच नाही असं म्हणणं गैर ठरेल. मूळ कथेत नसलेली पात्रे राम, नेहा व तिचा नवरा या कथेत अगदी सहज सामावून गेलेली आहेत. त्यांचे किंवा अम्मीचे शेवटचे संवाद कॅची, थोडके आणि तरीही हृदयस्पर्शी.  कोल्हापुरातील एक नामांकित वकील (किरण करमरकर) यांची मुलगी सावित्री सरदेसाई (प्रिया बापट). तिची आई लहानपणीच गेल्यामुळे, अप्पा (वडील) आणि घरातील नोकरचाकर यांच्या देखरेखी झालीच वाढलेली.  लहनपणापासून घरात "We are not emotional fools. We are practical." हे तिच्या वडिलांचं तत्व तिनेही जपलेलं. त्यामुळे काहीशी फटकळ, तुसडी किंवा चांगल्या शब्दात म्हणायचं तर 'अतिस्पष्ट'. इतर मुलींपेक्षा वेगळी सावित्री.  10वीत असताना अचानक एके दिवशी तिचे वडील तिच्यातून 7-8 वर्षांहून मोठ्या अमलाला (मुक्ता बर्वे) लग्न करून घरी घेऊन येतात. वरवर "मला काय कराय...

थ्री बिलबोर्डस आउटसाईड एबिंग, मिसोरी

मी सहसा मनाला अस्वस्थ करणारे चित्रपट पाहत नाही, पण काही दिवसांपूर्वी फिल्म सोसायटीने निवडलेला हा नावाजलेला सिनेमा पाहिला. कथा आहे मिल्डरेड या मध्यमवयीन स्त्रीची. तिच्या मुलीचा बलात्कार आणि खून होऊन अनेक महिने उलटूनही पोलीस तपासात काहीच निष्पन्न होत नाही. गुन्हेगार काही सापडत नाही. लोकही ही घटना विसरून जातात. याने पेटून उठून मिल्डरेड तिच्या गावातल्या एका रस्त्यावरचे 3 बिल्डबोर्डस भाड्याने घेते आणि प्रत्येकावर 'Raped while dying', इतके दिवस होऊन ही गुन्हेगार कसा सापडत नाही, असे पोलिसांचा नाकर्तेपणा समोर आणणारे अस्वस्थ प्रश्न एकामागोमाग एक लिहिलेले असतात. मिल्डरेड चा यामागे एकमेव हेतू असतो, आपल्या मुलीच्या गुन्हेगार सापडावा आणि त्याला शिक्षा व्हावी. साधारण सगळेजण एकमेकांना ओळखत असतात अशा लहानशा गावात काहीच लोक मिल्डरेडच्या बाजूने असतात पण बहुतेक जण नसतात, आणि त्यातही मीडिया आणि पोलीस यांना तीची ही न्याय मागण्याची पद्धत चुकीची आहे असं वाटत असतं. या सगळ्यांना तोंड देणारी एक शोकमग्न आई 'फ्रान्सिस मॅकडोरमंड' ने अप्रतिम साकारली आहे. तिच्या थंड चेहऱ्यामागे आहे एक धुम...

एक 'गुलाबजाम' मुरलेला

भारतातले अनेक पुरुष शेफ जगभरात विख्यात असले तरी, भारतात विशेषतः महाराष्ट्रात स्वयंपाक म्हणजे बाईचं काम हे समीकरण अजूनही घट्ट आहे. पण 'गुलाबजाम' चित्रपटाचा नायक आदित्य (सिद्धार्थ चांदेकर) हा आपला लंडन मधली भरभक्कम पगाराची नोकरी सोडून भारतात परत येतो, पुण्यात खास मराठी पद्धतीचा स्वंयपाक शिकायला. लंडन मध्ये खास मराठी पदार्थांचं रेस्टॉरंट काढणं हे त्याचं स्वप्न आहे, ध्यास आहे. त्याला पुण्यातील एका डबे देणारी बाई राधा आगरकरचा (सोनाली कुलकर्णी) शोध लागतो आणि आता या राधाकडूनच आपल्याला स्वयंपाक शिकायचा आहे अशी खूणगाठ बांधतो, आणि तर्हेवाईक, खडूस, थंड  राधा जी स्वयंपाक मात्र चविष्ट बनवते तिला आपली गुरू मानून शिकवण्यासाठी तयार करतो, आणि आयुष्यच बदलून जातं! इतकीच कथा. कथा म्हंटलं तर इथेच संपली, पण खरं तर इथे सुरू होते सचिन कुंडलकर, तेजस मोडक यांची ही कथा मांडते मानवी जीवनाचे अनेक कंगोरे. भुकेसारखी सुंदर आणि वाईट ही,  कॉम्प्लेक्स गोष्ट नाही या जगात. तिच्या पूर्तीसाठी आपण जगतो. तिच्यामुळे आपण जगतो. ही कथा स्वयंपाकाची आहे, आयुष्यातल्या वेगवेगळ्या घटकांची, वेगवेगळ्या परिमाणात घेऊन त्याल...