आपण याच यंत्रयुगात इतके अवलंबून आहोत यंत्रांवर, obsessed आहोत की नजीकच्या भविष्यात जर आपण त्यांच्या प्रेमात पडलो तर नवल नाही. ही गोष्ट फक्त थिएडोर (Joaquin Phoenix) आणि एक ऑपरेटिंग सिस्टीम समँथा (आवाज- Scarlett Johansson) यांच्यातल्या नातेसंबंधाची नाही.
एकलकोंडा, बायकोपासून विलग अशा थिएडोरला एकटेपणा घालवायला कुणीतरी हवं आहे. मग ते एखादी ऑपरेटिंग सिस्टीम का असेना तो तयार आहे. समँथा आणि थिओ यांच्यात एक नातं तयार होतं जे मैत्रीपलीकडे आहे. एकटेपणा, नैराश्य, शारीरिक गरज भागवण्याइतपत तो समँथाच्या केवळ आवाजावर अवलंबून आहे की अजून काही जास्त भावना आहेत? ती सतत म्हणते तसं तिला भावना आणि शरीर प्राप्त होतं का? थिओडोरप्रति तिच्या वागण्याला भावना म्हणायचं का? त्या दोघांच्या नात्याला प्रेम म्हणायचं का? डिवोर्स पेपर्सवर सही घेण्यासाठी तो बायकोकडे जातो तेव्हा बायको तो यंत्रासोबत रिलेशनमध्ये आहे हे कळल्यावर त्याला नात्यांपासून दूर पळणारा, स्वप्नात रमणारा, सत्य झटकणारा, परिस्थिती नाकारणारा म्हणते. समँथा सोबततरी नाते स्थिर राहणार का? या साऱ्यांची प्रश्नोत्तरे म्हणजे लेखक, दिग्दर्शक Spike Jonze चा 'हर'
माणसाने यंत्र बनवली, पण पुढे त्याप्रति त्याची काही जबाबदारी राहणार का? ती (हर) हे केवळ एक प्रतीक आहे भविष्यात संभवणारे.
सर्वांचेच परफॉर्मन्स बँग ऑन आहेत. स्कारलेटचा फक्त आवाज आहे फिल्ममध्ये. चित्रपटामधल्यासारखीच तिला खरी बॉडी नाही, पडद्यावर दिसत नाही तरी तिचा वावर जाणवतो. फिनिक्सबद्दल तर बोलणेच नको. त्याची पत्रे, बॉडी लँग्वेजमधून त्याचे व्यक्तिमत्व प्रकट होते.
ही एक sci-fi नसून त्यापलीकडे खूप काही आहे. प्राईमवर आहे. पाहा जरूर.
4/5
- रमा
#ramawrites
#Her
Comments