Skip to main content

Posts

कहर

मी रोज उभी त्या ठरल्या जागेवरती तू रोजच द्यावा ना येण्याचा बहाणा मी अशी कशी रे रोजच ठरते वेडी तू साळसूद वर बनचुका शहाणा.. मी कलम चालवत कागदावर उतरावे दिवसाचे कुठलेही ना पहाता प्रहर तू द्यावी त्यावर दाद इतकी सुंदर मनी शब्दांचा निव्वळ माजावा कहर..

गप्पा ..

सोसायटीत गेटपाशी फुललेले दोन गुलमोहर.. काही पार्टीज मध्ये पाहतो ना आपण काही सुबक, नखरेल, छान नटून थटून, रंगरंगोटी केलेल्या, विशिष्ट हसू घेऊन वावरणार्या ललना , तशा भासणार्या अगदी.. गॉसिप करत.. "त्या रस्त्याच्या पलीकडचा आंबा नाही का तो, वास सुटला होता त्याचा" " छे गं, परवाच्या गारपीटीने चांगलच झोडपून काढलंन, एक आंबा राहील तर खैर..बरीच हळहळ ऐकली त्या माणसांकडून".. "अरेरे.. पण आपणही झोडपले जातो, ओरबाडले जातो, तरी चर्चा फक्त आपल्या बहराची.. हा उन्हाळा जीवघेणे वार करणार आणि आपण काय करायचे ,तर अजून फुलून यायचे..मग त्याचं कौतूक होणार.." शेजारची रातराणीची वेल म्हणते कशी,  " कुछ सितम तो ऊठाने पडते है, हर रात, मै यूंही तो नही खिल आती"... 

तुझा भास होतो

जरी जीवघेणी, फुले रातराणी तिला हुंगताना, तुझा भास होतो.. मनी कोरलेले तुझे शब्द ऐसे मला बोलताना, तुझा भास होतो.. कशाने नशा या पुऱ्या आसमंती उगा झिंगताना, तुझा भास होतो.. कुठे धून उठते, बिना ओळखीची मला डोलताना, तुझा भास होतो.. कथा माझी-त्याची ही नक्कीच आहे तिला सांगताना, तुझा भास होतो..

पिकलपोनी

एक होती पिकलपोनी..गोबरे गाल, नकटं नाक,अतिशय हट्टी..नाकावर राग..आई-बापूची एकदम लाडकी. एकदा तिने बापूजवळ धरला हट्ट, "मला बाहेर घेऊन जा, जा म्हणजे जा.. आत्ताच्या आत्ता.. " बापू पण लग्गेच तय्यार. म्हणाला, "चल, पटकन तयार हो, निघूया.. "  आई म्हणाली, "अहो, आता अंधारून आलय, आता कशाला जाताय ?.. अगं पिकलपोनी उशीर झालाय आता, आता उद्या जा हा" . आई असं म्हंटल्यावर बापू जरा डळमळला, "हो, हो, उद्या जायचं का मग आपण?" पिकलपोनीने गाल फुगवले, डोळे मोठ्ठे केले, ओठांचा चंबू केला (नेहमीप्रमाणे) एक हात कमरेवर आणि एक पाय तालावर आपटत आपलं पेटंट गाणं सुरु केलं..  "जा बाबा बापू, असच कर तू.. सगळे असच करतात.. माझे कुणीच लाड नाही करत. जा बाबा. . " शेवटी आई म्हणाली "जा बाई, जा. .  पण लग्गेच परत यायचं. . पाण्याची बाटली घेउन जा बरोबर, खबरदार बाहेरचं काही खाल्लं तर.  गप घरी वरण-भात खायचा. आणि दादाला पण न्या सोबत. अभ्यास केलाय त्याने दिवसभर. पिकलपोनी पटकन तयार झाली  आणि बापू, पिकलपोनी आणि  पिकल बंबू यांची स्व...

आता तरी डोळे उघडा..

गणपती उत्सव अवघ्या महिन्यावर येउन ठेपला आहे. त्या निमित्ताने त्याच्या सार्वजनिक स्वरूपावर थोर सत्यशोधक विचारवंत व सुधारक ना. कै. भास्करराव जाधव यांनी काही परखड मते व्यक्त केलेली आहेत. ती संक्षिप्त रूपाने इथे मांडत आहेत प्रस्तुत लेख हा १९२४ म्हणजे ९० वर्षांपूर्वीचा आहे. या वरून भास्कररावांची दूरदृष्टी आणि सामन्यांचा धर्मानुकरणाच्या नावाखाली अजूनही चाललेला वेडेपणा लक्षात येईल. यात सांगितलेले आर्थिक व्यवहाराचे स्वरूप पाहता त्याची या काळात तुलना केल्यास पैशाचाही किती जास्त अपव्यय आहे हे दिसून येईल.  गणपती उत्सवाचा नावाखाली दर साली होणारा धिंगाणा व त्याद्वारे होणारी धर्माची विटंबना थांबविण्याच्या इच्छेने भास्कररावांनी गणपती उत्सवाच्या मागची मूळ कल्पनाम सद्यस्थिती (तत्कालीन), झालेले दुष्परिणाम इ. चा थोडक्यात पण मार्मिक शब्दात या पत्रिकेत आढावा घेतला आहे. सत्यशोधक समाज, मुंबई पत्रक - गणपती उत्सव गणपती उत्सव या नावाने होणारा दर सालचा 'धिंगाणा' लवकरच सुरू होईल. वाडी-वाडीतून व मोहल्ल्यातून व चाळीचाळींतून मंडळे स्थापन होऊन वर्गण्याही  (बरेचवेळा सक्तीने) जमा केल्या जातील. उत्सवाचा...

तरीही...

कुणी कुणाचे नाही, हेही माहीत असते, जपत राहतो उगीच काही नाती तरीही... दिवस असे हे कंठीत जातो केविलवाणे जगू पाहतो उदास काही राती तरीही... उन्मळून पडताना पाहून या झाडांना डोलत राहती गवती काही पाती तरीही... जळणे किंवा विझणे हेची प्राक्तन आहे माहित असूनी जळती काही वाती तरीही... समानतेचा डंका पिटूनी तिन्ही त्रिकाळी जगात खितपत राहती काही जाती तरीही...

ते काय म्हणतात...

देव,संत अन थोर महात्मे कशास म्हणतील आम्हा पूजा? आपल्यामधला जिंका दानव, भक्तीभाव मग नसे दुजा बंधुत्व, प्रेम,निस्वार्थ बाणवा, नको हार वा मुकुट,भोग दंभ, क्रोध, वासनाच हरतील, अशा गुणांना सदा भजा मानवता हा धर्म असावा, कशास त्यावर दंगल वाद षड्रिपूच जर वसणार अंतरी, कशास करता आम्हा खुजा???