Skip to main content

Posts

Showing posts from April, 2015

कहर

मी रोज उभी त्या ठरल्या जागेवरती तू रोजच द्यावा ना येण्याचा बहाणा मी अशी कशी रे रोजच ठरते वेडी तू साळसूद वर बनचुका शहाणा.. मी कलम चालवत कागदावर उतरावे दिवसाचे कुठलेही ना पहाता प्रहर तू द्यावी त्यावर दाद इतकी सुंदर मनी शब्दांचा निव्वळ माजावा कहर..

गप्पा ..

सोसायटीत गेटपाशी फुललेले दोन गुलमोहर.. काही पार्टीज मध्ये पाहतो ना आपण काही सुबक, नखरेल, छान नटून थटून, रंगरंगोटी केलेल्या, विशिष्ट हसू घेऊन वावरणार्या ललना , तशा भासणार्या अगदी.. गॉसिप करत.. "त्या रस्त्याच्या पलीकडचा आंबा नाही का तो, वास सुटला होता त्याचा" " छे गं, परवाच्या गारपीटीने चांगलच झोडपून काढलंन, एक आंबा राहील तर खैर..बरीच हळहळ ऐकली त्या माणसांकडून".. "अरेरे.. पण आपणही झोडपले जातो, ओरबाडले जातो, तरी चर्चा फक्त आपल्या बहराची.. हा उन्हाळा जीवघेणे वार करणार आणि आपण काय करायचे ,तर अजून फुलून यायचे..मग त्याचं कौतूक होणार.." शेजारची रातराणीची वेल म्हणते कशी,  " कुछ सितम तो ऊठाने पडते है, हर रात, मै यूंही तो नही खिल आती"...