Skip to main content

Posts

Showing posts from 2019

क्युरिअस केस ऑफ बेंजमिन बटन : अंतापासून आदिकडे

एफ. स्कॉट फिट्झगेराल्ड लिखित शॉर्ट स्टोरीवर आधारित चित्रपट, ' क्युरिअस केस ऑफ बेंजमिन बटन '. अतिशय वेगळी अशी कथा आहे बेंजमिनची, आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या पात्रांची. असा बेंजामिन जो जन्माला येताच 80+ वर्षाच्या म्हाताऱ्यासारखा. जन्मदात्री आई मरून जाते तर त्याचे वडील मिस्टर बटन त्याचा त्याग करतात, एक आफ्रिकन अमेरिकन कुटुंब त्याला आपलं म्हणून सांभाळतात. वय जसं वाढतं तसं बेंजामिन मात्र अधिकाधिक तरुण होत जातो. आणि याच गोष्टीमुळे त्याचे सखे-सोयरे, प्रेयसी यांच्यासोबतच्या त्याच्या नात्यांवर कसा परिणाम होतो, जन्मानंतर पाळण्यातला बेंजामिन, मृत्यूपूर्वीही पाळण्यातले लहान बाळ होऊन जातो. याची ही विचित्र कहाणी.  चित्रपटातील ब्रॅड पिट, केट ब्लाँचेट, ताराजी हॅन्सन यांचा अभिनय आउटस्टँडिंग आहेच पण डेव्हिड फिंशरचे दिग्दर्शनही छान आहे. कथा मांडणी सुंदरपणे केली आहे. प्रोस्थेटिक मेकअप, स्पेशल इफेक्ट्स, एडिटिंग याबाबतीत ही फिल्म अभ्यासली पाहिजे इतकी सरस आहे.  चित्रपटाची कथा एका मरणासन्न वयस्क बाईच्या डायरीतून उलगडते आणि ती नंतर सुरू होणाऱ्या कॅटरिना हरिकेनइतकी गुंतागुंतीची आहे. 

Pursuit of Happiness : आनंदाचा अथक शोध

परसूट ऑफ हॅपिनेस : आनंदाचा अथक शोध आयुष्यात आनंद कुणाला नको असतो? कुणाला भौतिक सुखात तर कुणाला आत्मिक समाधानात आनंद मिळतो. जो तो आनंदाच्या शोधात आहे, सगळ्यांचं एकच ध्येय आहे. Pursuit of Happiness.  या सिनेमाची कथाही एक खऱ्या चरित्रावर बेतलेली आहे. ख्रिस गार्डनर ( विल स्मिथ ), ख्रिस्तोफर ज्युनिअर ( जेडन स्मिथ ) हे खऱ्या जीवनातले बापलेकच यात दाखवले आहेत. एक बोन डेन्सीटी स्कॅनर मशीन, ज्याला फारशी मागणी नाही विकणारा सेल्समन ख्रिस व्यावसायिक पतनामुळे हैराण असतो. त्याची बायको मुलाला त्याच्यापाशी ठेवून निघून जाते, राहतं भाड्याचे घर जाते, शेअर बाजारात काम करण्यासाठी इंटर्न म्हणून विनापैसा ख्रिसला काम मिळते आणि मग सुरू होतो एक संघर्ष. आनंदाचा अथक शोध. घर नाही तर कधी पब्लिक टॉयलेटमध्ये तर कधी ट्रेन, बसमध्ये, स्वस्त डॉर्मिटरी मिळेल तिथे मुलाला घेऊन राहणे, खिशात, बँकेत पैशाचा खडखडाट असून सकारात्मक राहून गुजराण करण्यासाठी त्याची राहिलेली मशिन्स त्याला विकायची असतात. अनेक संकटांना सामोरं जाताना हा सिनेमा आपल्याला खूप काही शिकवतो. सकारात्मक दृष्टिकोन, हार न मानणे, स्वप्नांच्या पूर्तीस

Once in a year..

मुलगा अरिहंत ( Nipun Dharmadhikari )   आणि मुलगी रावी (मृण्मयी गोडबोले) भेटतात, त्यांची गोष्ट. वर वर साधं- सोपं वाटलं तरी वास्तवात असतं तसं क्लिष्ट असं त्यांचं नातं. 'वन्स इन अ यर' ही 2013- 2018 या वर्षांत घडणारी गोष्ट ( टायटल सॉंग अप्रतिम आहे, ऐकायला आणि बघायलाही). वय वाढतं तसं नात्याची परिपक्वता वाढत जाते तसेच प्रॉब्लेम्सही.  निपुणचा अभिनय पहिल्यांदाच पाहिला. सहज आहे, ओढून-ताणून नाही, कॅज्युअल आहे. मृण्मयीचे कॅरेक्टरही छान. दोघेही एकदम पुणेरी.  यातली सिनेमॅटोग्राफी ही एक उल्लेखनीय बाब आहे. लोकेशन्स छान आहे.  MXPlayer वर आहे. बघा जरूर.   - ©रमा

बदल

रात्री पिक्चर बघत बसले होते , ' गुडबाय ख्रिस्तोफर रॉबिन ' आणि मी शर्यंत लागल्यासारखी धावत   फेसबुकवर लिहून टाकणार तोपर्यंत पिकलपोनीचा फोन . आवाजात सर्दी , खोकला , " हॅलो , मी पिकलपोनी बोलतेय." तोपर्यंत दादू तिच्याकडून फोन घेत म्हणाला   "अगं रमाताई तू जरा ये घरी."     मी म्हणाले , " का रे अचानक ? खरंतर मला यायचं असतं , पण राहून जातं.." , दादू म्हणाला , " हे बघ , आम्ही ४ मंडळी सायकलवर मावणार नाही गं , गाडी घेऊन ये.".   मला काही कळेना. " चौघांना जायचंय कुठं खरं ?". पण मग " डॉक्टरांकडे जायचंय." एवढं ऐकताच मी पटकन निघाले. पोहोचते तर बघते काय ? सगळे बाहेर. दादू , पिकू मरगळून उभे. ” डॉक्टर आत्त्यांकडे गेल्यावर त्यांना तपासून , काही फिल्म्सची यादी , खेळ , पत्रलेखन वगैरे औषधं लिहून त्यांना बाहेर बसायला सांगून डॉक्टर आत्यांनी मला थांबायला सांगितलं. मला बसवून बोलायला लागल्या, " रमा , तू लिहून यांचं जग , पिकलवर्ल्ड   बाहेर , आपल्या जगात आणलंस. पण त्यांना कायमचं इथे वास्तवात आणायची ही कसली धडपड ? राहू दे की त्यांना पिकलवर

हलाल - बलिदान

मुस्लिम धर्मात 'हलाल' चा अर्थ आहे, वैध किंवा धर्मानुसार योग्य बलिदान. त्याप्रमाणेच हलाल चा अर्थ एखाद्या जीवाला हाल-हाल करून मारणे. हलाल ची वैवाहिक रूढी अशी की एखाद्या माणसाने जर आपल्या बायकोला त़लाक दिला आणि तिच्याशीच परत लग्न करायचे झाले तर आधी तिचे दुसरे लग्न लावायचे त्या व्यक्तीने जर आपणहून तिला (तीन महिने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेऊन बिऊन) त़लाक दिला तर ती प्रथम पतीशी लग्न करू शकते. पुरुषाने उठसूट काडीमोड घेऊ नये यासाठी त्याला शिक्षा म्हणून असला विपरीत कायदा कुराण-ए-पाक मध्ये समाविष्ट होता. धर्मातील कायदे न समजून घेता तोडून -मरोडून लोकांपर्यंत येतात आणि मग 'ख़ुदा के लिए' ते त्याचे पालन करतात त्याने धर्माचा आंधळेपणा, समाजाचा दुटप्पीपणा आणि परिणामी लोकांचे हलालरूपी शोषण होते. तिहेरी त़लाक विरोधी अशी 'हलाल' ची कथा राजन खान यांच्या कादंबरी वरून घेतलेली आहे.  हलीम आणि खुर्दुस हे एक विवाहित जोडपे आहे, पण रागाच्या भरात खुर्दुस हलीमला तोंडी तिहेरी त़लाक देतो. 2 वर्षा साठी हलीमला माहेरी पाठवतो आणि आई वारल्यावर पुन्हा न्यायला येतो. पण वडील सरपंच आणि मौलाना प

ऑक्टोबर : नात्याला या नकोच नाव

सगळ्याच नात्यांना नाव नसतं. सगळ्याच भावनांत आर्तता नसते. सगळ्याच कथा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वाटतीलच असं नाही. पण ‘ ऑक्टोबर ’ मला स्वतःचा वाटला. डॅन आणि शिवली. हॉटेल मॅनेजमेंट इंटर्न्स , एकमेकांशी अगदी मोजका संवाद असलेले , सहकारी इतकेच काय ते त्यांचे नाते. डॅन बेफिकीर , अस्ताव्यस्त , कामात लक्ष नसलेला , बेधडक आणि कधी कधी दुखेल असे बोलणे तरी थोडा निष्पाप तर शिवली शांत , कामात सिन्सिअर. ‘ दोन ध्रुवावर दोघे आपण ’ असे त्यांचे अत्यंत विरुद्ध स्वभाव. एका अपघातामुळे शिवली कोमा आणि नंतर त्यासदृश परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये बेडला खिळलेल्या अवस्थेत आहे आणि नंतर डॅन मध्ये या घटनेने जे बदल घडत जातात आणि त्यांचे एक अतूट बंधन निर्माण होते त्याची ही सुगंधी कथा. डॅन अधिकाधिक शिवलीची काळजी करू लागतो , त्याच्या रोजच्या भेटींमुळे त्याच्या इतर सहकाऱ्यांना त्याचे वागणे विचित्र वाटते. असे काही होऊ शकेल आणि तेही डॅनकडून असे कुणालाही विचित्रच वाटेल. पण त्याचे शिवलीकडे वारंवार जाणे , याने त्याचा स्वभाव बदलतो. एरवी बालिश वाटणारा डॅन शिवलीच्या प्रत्येक बाबतीत सीरियस वागू लागतो. चित्रपटातील डॅन - शि

सेक्रेड गेम्स- सीजन 2

प्रभू रामचंद्राच्या वनवासानंतर अयोध्या नगरीने ज्या आतुरतेने त्यांची वाट पाहिली असावी तशी नेटफ्लिक्सवासीयांनी GOT, Narcos नंतर 'सेक्रेड गेम्स' च्या पुढच्या सीजन ची वाट पाहिली आणि पदरी दर दोन शिव्यानंतर अजून शिव्या असं काहीसं आलं.  झालं काय की ते, 'कुकू का जादू बादू' यात काही नव्हतं. यात सत्य होतं. आयुष्यातले सगळे दरवाजे बंद झाले की हतबल मनुष्य जितकी धडपड करता येईल तितकी करतो, मारतो, उडवतो, ओरडतो,  गुरु-पंथाच्या नादी लागतो, गंडे- दोरे बांधतो. ज्यावर विश्वास नाही ते सारेही करून पाहतो. गायतोंडेचा(नवाजुद्दीन) तिसरा बाप 'गुरुजी' हाही एक प्रकारचा झिंग देणारा धार्मिक कल्ट चालवत असतो जो मुंबई खतम करण्यासाठी गायतोंडेचा वापर करत असतो.  मागील सीजन गायतोंडेचा होता, त्याने कमाल केली. दुसरा सीजन सरताजसिंग (सैफ) चा आहे. तो शोधात आहे. जे काही सापडत आहे तो चकित आहे , शोधण्यासाठीची धडपड गायतोंडेचा इतिहास आणि संपणारी मुंबई, धर्माचे राजकारण आणि राजकारणातील भ्रष्ट्राचार हे सगळं इथं दाखवायचा प्रयत्न आहे. सीजन 1 पाहिला नसेल तर यातील 1-1 मूव्हचं संदर्भासहित स्पष्टीकरण कराव

सेक्रेड गेम्स सीजन - १

सरताज सिंग ( सैफ अली खान ) या प्रामाणिक पोलिसाला अचानक माफिया जगतातील खूप मोठ्या गँगस्टर गणेश गायतोंडे( नवाजुद्दीन ) कडून टीप मिळते, की काहीच दिवसात मुंबई संपेल. आणि सुरू होतो एक खेळ माफिया, पोलीस जगत, राजकारण, सेक्सवर्कर्स, धर्म, यांचा खेळ. अश्वत्थामा, हलाहल, ययाती असे एपिसोडस्. (त्यांची नावे तशी का आहेत हे बघायला नीट पाहायला लागेल. दिवस फ्री असेल तर Bingworthy आहेच)  नवाजुद्दीनने नेहमीप्रमाणे काम छान केलं आहे पण तो मराठी माणूस नाही वाटत. गायतोंडे नाही वाटत. बाकी त्याचं काम सुंदर. मराठी नसता तर अजून चांगला इफेक्ट आला असता. कुकू, बंटी अशी काही पात्रं महत्त्वाची आहेत. सैफ अली खानने त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी झेप इथे घेतली आहे. गिरीश कुलकर्णी, राधिका आपटे अशा मराठी लोकांसोबतच भाव खाऊन जातो तो जितेंद्र जोशीने साकारलेला (काटेकर). जीव ओतणारा प्राणी. आहा. अप्रतिम.  शिव्यांनी ओतप्रोत भरलेला, सेक्स, हिंसेने भरलेला. सेक्रेड गेम्स.  बॉलिवूडमध्ये किंवा नव्या पिढीच्या वेब सिरीज जगतात क्रिमिनल वर्ल्ड हे अगदी रोजची उठण्याची - बसण्याची जागा अशी रंगवलेली आहे. एकदम डिट्टेल. पण त
कोल्हापूरचा महापूर नको नको ते राहून गेले हवे हवे ते, वाहून गेले पूरात उरल्या सुरलेल्यांना सैतानच मग पाहून गेले ढग फुटले नि कोसळला रात्रंदिवस धो धो ढळला किंकाळ्या मूक प्रेतांच्या ऐकून, पाहून तळमळला गुरे-ढोरे, जमिनी घरकुल आणि फुटके-तुटकेसे पूल जीव वाचूनही सारे गेले जसे एखादे कुस्करले फूल म्हणे 'कलयुग' आले कोणी कुणी सांगी भविष्य वाणी मला फक्त दिसत राहते भयाण पावसाचे पाणी आले उठून हात मदतीचे दिवस-रात देण्या साथीचे कोण-कुणाचे नाही तरीही 'आपला' या एका नात्याचे एकमेकांपासून होते दूर जोडी त्यांना हा  महापूर मदतीला जे पुढे धावते ते कोल्हापूर, ते कोल्हापूर  - ©रमा PC-The Hindu

मेरी यादमें तुम ना आंसू बहाना...

25 जून 1924 ला मदन मोहन कोहली यांचा जन्म इराणी कुर्दीस्तान येथे झाला. त्यांचे वडील बहादूर चुनीलाल तिथे अकाऊंट जनरल म्हणून काम करत. लहान वयातही मदनमोहन यांना गाण्याचा भलता शौक होता. आणि वडिलांच्या रेकॉर्ड कलेक्शन मधील कुठलेही गाणे स्वतः काढून ऐकण्याचा छंद ते अति लहानपणी सुद्धा कधीही पुरा करू शकत होते. त्यांना लाहोर ला त्यांच्या आजोबा हकीम योगराज यांच्याजवळ ठेवून त्यांचे कुटुंब मुंबईला स्थायिक झाले. लाहोर ला शालेय शिक्षणासोबतच त्यांनी थोडे शास्त्रीय संगीत शिक्षण स्थानिक शिक्षकांकडे घेतले. भारतात आल्यावर वडिलांच्या इच्छेखातर 1943 मध्ये मदन मोहन आर्मीत रुजू झाले. पण त्यांचे पहिले प्रेम संगीत. त्यामुळे त्यांनी वडीलांच्या अनिच्छेने देखील आर्मी सोडली आणि 1947 मध्ये ऑल इंडिया रेडिओ, लखनौ येथे प्रोग्रॅम असिस्टंट म्हणून काम पाहू लागले. काही कार्यक्रमांच्या प्रसारणाचे संगीतही त्यांनी दिले. संगीतातील दिग्गज कलाकारांचा, कार्यक्रम आणि प्रसारण यासाठी त्यांना प्रदीर्घ सहवास वेळोवेळी मिळाला. त्यांचे खरे शास्त्रीय संगीत शिक्षण सुरू झाले ते इथेच. तराण्यांची राणी जद्दन बाई (भारतातील मोजक्या महिला

रिंगण! सुटता तुटेना माऊली..

रिंगण! आज घरातल्या देव्हाऱ्यात एकलाच उभा पांडुरंग बघून मकरंद माने दिग्दर्शित 'रिंगण' ची आठवण आली. अर्जुन मगर (शशांक शेंडे) आणि त्याचा मुलगा अभिमन्यू (साहील जोशी) या बापलेकाची कथा.  दुष्काळाने कर्जाच्या ओझ्यात पिचलेला शेतकरी, त्यात गहाण गेलेली जमीन. आत्महत्येचे सततचे विचार झटकून, पोरासोबत पंढरपूराला जातो. पोराची आई देवाच्या गावाला गेली असं सांगितल्यामुळे, इथे माझी आई सापडेल अशी आशा घेऊन आलेला 7-8 वर्षाचा त्याचा मुलगा. निराशेतून आत्मविश्वासाने, श्रद्धेने सकारात्मक मार्ग दाखवणारा 'रिंगण'.  बापलेकाचे नाजूक नाते, पापभिरू निष्पाप अर्जुन मगर आणि त्याचा निरागस मुलगा अभिमन्यू पंढरीच्या गावी तरी काही पदरी पडेल का अशी आशा करत आलेले असतात त्यांची कथा. पंढरपूरला वारीला रिंगण सोहळे असतात त्यामुळे तर हे नाव साजेसे आहेच पण आपण ज्याला चमत्काराच्या अपेक्षेने शोधत फिरतो, तो कुठे ना कुठं आपल्या सोबत निरनिराळ्या रूपात सकारात्मकता देऊन जातो. आपल्या मातीशी सुरू झालेला प्रवास पुन्हा आपल्या मातीशी नेऊन पोहोचवतो असे रिंगण. आपल्याजवळ जे नाही त्या पळत्याच्या पाठी धावता आपण हातचं स

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां

'भाई : व्यक्ती की वल्ली' - आकाश व्यापणारी असामी

पुलंचं बायोपिक म्हणजे अक्षरशः अशक्य वाटलं होतं. पण  टीजर आवडला आणि काहीही झालं तरी बघायला जायचं हे ठरवलंच होतं.  घरी पु.लविषयक काहीही म्हणजे 'घरचं कार्य', त्यामुळे खोकला, कणकण,  निर्माता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हे सगळे प्रॉब्लेम असूनही फर्स्ट डे फर्स्ट शो ला गेलेच. आणि सोबतीला मंडळीही तगडी. सगळ्यांनी भाई, भाईकाका जवळून पाहिलेले, अनुभवलेले अशी माणसं सोबत घेऊन सिनेमा पाहिला. एखादा माणूस आवडता कलाकार किंवा पब्लिक फिगर म्हणूनच नाही तर जिव्हाळ्याचा विषय म्हणून त्याच्यावरील चित्रपट पाहण्यासाठी आले खरंतर. चित्रपटाचं कास्टिंग चांगलं झालं आहे. सागर देशमुखचा खरेखुरे पु.ल साकारण्याचा प्रयत्न अगदीच कौतुकास्पद आहे. अगदीच कमाल. तसेच इरावती हर्षेनी तरुणपणीच्या सुनीताबाईंच्या भूमिकेत अप्रतिम काम केले आहे. पुलंचं बालपण ते तरुणपण या चित्रपटात उलगडून दाखवण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. त्यांची वैविध्यपूर्ण शैली, भाषेवरचं प्रभुत्व, निकोप, मार्मिक विनोद याचा प्रत्यय पावलोपावली येतो. यातले सगळे प्रसंग आधी लिखित, ऐकीव स्वरूपात असूनही कंटाळा असा कुठे येत नाहीत. पुलंचे विनोद, किस्से क