Skip to main content

Posts

Showing posts from March, 2017

भांडण

"हॅलो दादू, कॉलेज नंतर डायरेक्ट घरी ये. ".. "असं आई म्हणतेय"..नाही नाही म्हणता म्हणता  पिकलपोनीने शेवटी दादूला फोन लावलाच.  दादुने पण टेचात विचारलं, "का? घरी पाहुणे येणारेत? मटन बनवलंय? का मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है?? नाही म्हणजे फक्त तेवढ्यासाठीच येत असतो ना मी घरी? असं काहीसं ऐकलं होतं मी.. " जरासं ओशाळून पिकलपोनी म्हणाली, "सॉरी ना रे दादू.. तू सारखा बाहेरच असतोस. पूर्वीसारखा आमच्या बरोबर घालवायला तुला वेळच नसतो.. रात्रंदिवस अभ्यास असतो. म्हणून चिडून तसलं काही तरी बोलले ना रे मी.. आता सॉरी की. प्लीज..प्लीज..प्लीज"...  दादा एकदम तोडून म्हणाला, "बरं.. बरं.. बघतो..जमलं तर चक्कर टाकतो दुपारी." फोन कट.  "हट, चक्कर टाकतो म्हणे. सरळ नाही येणार म्हणून सांग की" पिकलपोनी त्याची नक्कल करत स्वतःशीच चरफडली. "नाहीच येणार तो नक्की." त्याचं असं झालं होतं, पिकलपोनी आणो दादूचं कुठल्याशा फुसक्या कारणाने झालं होतं भांडण. भांडता भांडता भांडण एवढं वाढलं की दोघांना भांडणाचा मूळ मुद्दाच आठवेना. तरीही ओरडाओरडी झाल

स्मृतिगंध लिसनर्स क्लब- राग यमन आधारित गीते

स्मृतिगंध लिसनर्स क्लब च्या या महिन्याची थीम होती 'राग यमन' वर आधारित गीते. राग यमन,  अतिशय लोकप्रिय आणि अतिशय मोठा आवाका असणारा. शास्त्रीय संगीत शिकणार्यांना सर्वाना पहिल्यांदा शिकवला जाणारा राग. हा जरी प्रथम शिकवला जाणारा राग असला आणि वरवर सोपा वाटत असला तरी त्यात 'Deceptive simplicity' आहे. संध्याकाळ चा राग असला तरी तरी कुठल्याही वेळी सादर केला जाणारा राग. शांत राग असला, तरी ही गंभीरता नसलेला, आल्हददायी शांती रस असणारा असा यमन राग. कार्यक्रमाची सुरुवात झाली या रागातील अत्यंत लोकप्रिय पारंपरिक चीज ' ए री आली पिया बिन' ने.  नंतरचे गाणे होते 'चितचोर' चित्रपटातील 'जब दीप जले आना'. अमोल पालेकर, झरीना वहाब सारख्या  कलाकारांच्या करिअरला झळाळी देणारा असा हा एक मिडल रोड सिनेमा. येसूदास आणि हेमलता यांच्या आवाजात असलेले हे गाणे, संगीतकार रवींद्र जैन यांनी संगीतबद्ध केलेलं. रवींद्र जैन हे दृष्टीहीन होते. 'जब दीप जले आना' म्हणजे काय हे त्यांना कसे काय कळले असेल? येसूदास यांना केरळ मधून हिंदी चित्रपट सृष्टीत आणण्याचे काम ही त्यांनीच केल