Skip to main content

Posts

Showing posts from 2018

हम आज कही दिल खो बैठे....दिलीप साब आपको..

'स्टारडम' ही संकल्पना क्षणिक असणाऱ्या काळातही दिलीपकुमार हा एक दुर्मिळ अभिनेता आहे जो मनोरंजन क्षेत्रात 58 वर्षानंतरही तंबू ठोकून उभा राहिला. दिलीपकुमारने सहा दशकाच्या कारकिर्दीत केवळ 56 चित्रपट केले. पण प्रेक्षकांसोबत लगेच संवाद साधण्याचं अलौकिक वरदान त्याला लाभलेलं होतं, ज्याने त्याला हिंदी सिनेमात अनेक क्लासिक्स देता आले. पेशावरहून पळून आलेला , पुण्यातील एका मिलिटरी कँटीन मध्ये काम करत करत फळांच्या दुकानाचा मालक बनलेला युसूफ खान. त्याच्यातला अभिनेता जागा होऊन त्याची अभिव्यक्ती युसूफ खानला मुंबईला घेऊन आली.  बॉम्बे टॉकीजची महत्त्वाची नियंत्रक देविका राणी, अशोककुमार नंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी कोणा प्रतिभावंताच्या शोधात होती. युसुफच्या गुणवत्तेवर प्रसन्न होऊन त्याला 'ज्वार भाटा' मध्ये हिरो म्हणून ब्रेक मिळाला.  देविका राणीने अत्यंत कडक शिस्तीने आणि कठोर शासनाने स्टुडिओ वर पकड ठेवली होती.  अभ्यासण्यासाठी भरपूर सामान आणि सृजनशील वातावरणाने या गुणी कलाकाराला  पाया मजबूत करता आला, ज्याने त्याच्यातला उत्कृष्ट अभिनेता बाहेर आला जो आज एक लेजंड आहे. नवीन

वो जिंदगी का साथ निभाता चला गया....

3 डिसेंम्बर 2011, लंडनमधील उच्चवर्गीय भाग मेफेअर येथील वॉशिंग्टन हॉटेल मध्ये अचानक गोंधळ सुरू झाला. बाहेर दोन अँब्युलन्स आल्या. दोन पॅरामेडिक्स लगबगीने हॉटेल लॉबीत पोहोचले. रिसेप्शनिस्ट ओरडले "रूम 207". पॅरामेडिक त्यांची प्रथमोपचार साधने घेऊन लिफ्टकडे धावले. पण 207 मध्ये सारं काही संपलं होतं. सुप्रसिद्ध नायक देव आनंद यांचा हृदयविकाराचा मोठा झटका येऊन अंत झाला.  देव आनंद हा वर्तमानात जगणारा माणूस होता, पण त्याला भविष्याकडे पाहून काम करणं  चांगलंच ठाऊक होतं. . वयाची ऐंशी पार केल्यानंतरही, यश मिळो किंवा अपयश, टीका असो किंवा शेवटच्या काळात त्याची खिल्ली उडवलेली असो त्याचा वेळ, ऊर्जा आणि कल नवनवीन चित्रपट बनवण्यासाठी होता. या दुर्दम्य महत्वाकांक्षी व्यक्तिमत्त्वाला 'अशक्य' शब्दच जणू माहीत नव्हता. तो होता ख़ुशमिज़ाज, परिपूर्ण, देखणा.. देव आनंद!  देव आनंदच्या करिअरची विभागणी साधारणपणे अशी करता येईल- त्याचा 'कृष्णधवल काळ' जिथे त्याच्या बहुतेक दिग्दर्शकांनी (जास्त करून त्याचा भाऊ-विजय आनंद) त्याच्या अति टोकाला जायच्या प्रवृत्तीला काबूत ठेवलं होतं, आणि &

सलील चौधरी : एक श्रद्धांजली

बंगाल प्रांत हा मुळातच मुग्ध करणारा प्रदेश आहे. कलाप्रेमींवर तर बंगालची कायमच जादू राहिली आहे. के एल सेहगल पासून अनिल बिस्वास, एस डी, आर डी, हेमंतकुमार, किशोरकुमार, मन्ना डे ते लोकगीतं गाणारे कुणी अनामिक, इथलं संगीत अत्यंत मधुर, मोहक संगीत आहे. या सर्वांतच मला 'सलील चौधरी' या संगीतकाराने नेहमीच मोहवून टाकलं आहे. आज सलील चौधरी यांचा जन्मदिवस. सुरुवात झाली 'मधुमतीने'. एकूण 12 गाण्यांचं अप्रतिम प्रदर्शन. मुकेशची तरल "दिल तडप तडप" आणि "सुहाना सफर और ये मौसम हसीं", एकीकडे लताची आर्त हाक  "आजा रे परदेसी", खेळकर "घडी घडी मोरा दिल धडके" आणि "जुल्मी संग आँख लडी" तर दुसरीकडे मोहम्मद रफीची "टुटे हुए ख्वाबोंने" ते "जंगलमे मोर नाचा" अशी बहुरंगी गाणी. "दैय्या रे, दैय्या रे चढ गयो पापी बिछुआ" गाण्याप्रमाणे  लहानपणापासूनच सलीलदांनी मला झपाटून टाकलं. आणि फिल्मी गीतांच्या जादुई दुनियेत मी प्रवेश केला. मुकेशने सलीलदांच्या निर्देशनखाली ज्याप्रमाणे गायले आहे ते खरंच उल्लेखनीय आहे. अगदी 

आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर : एकदम कडक!!

व्यवसायाने प्रथितयश डेंटिस्ट पण, रक्तात अभिनयाची ओढ असलेला एक गोरा, घारा तरुण. केवळ एक प्रॉम्पटर म्हणून रंगभूमीशी नातं ते मराठी रंगभूमीचा पहिला-वहिला सुपरस्टार, मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतले मोठे स्थित्यंतर, एक टप्पा असा सगळा प्रवास असलेले डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यावरील बायोपिक. सुबोध भावे पुन्हा एकदा बायोपिकमध्ये म्हंटल्यावर मला आधी शंका होती. पण यावेळीही सुबोधने बाजी मारलीच आहे.  एका 'सुपरस्टार' चा उदय ते अंत त्याने खडतर प्रयत्नांनंतर लीलया साकारले आहे. सुबोध भावे मूलतः अतिशय अंतर्मुख माणूस आहे, त्याने साकारलेल्या भूमिकेच्या अगदी उलट. घाणेकरांच्या व्यक्तिमत्वाचा त्याने अंतर्बाह्य अभ्यास केलेला आहे हे अगदी जाणवतं. आमच्या पिढीला डॉक्टरांचे दर्शन फारसे घडले नाही (पाठलाग आणि गोमू संगतीने सोडून) पण सुबोध भावेनी ते घडवून आणले आहे. चित्रपटाच्या इतर कास्टिंगबद्दलही मला शंका होती पण सुलोचना दीदीं च्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी असो किंवा प्रसाद ओकचा प्रभाकर पणशीकर असो, त्यांनी चांगले बेअरिंग पकडले आहे.  एक स्वकेंद्री, बेदरकार, फटकळ, व्यसनी, विक्षिप्त, लफडेबाज, चाहत्यांच्

बधाई हो: मज्जेदार, लज्जतदार कॉमेडी

बधाई हो: मज्जेदार, लज्जतदार कॉमेडी कौशिक कुटुंब, मध्यमवयीन जोडपं, त्यांना एक तरुण मुलगा लग्नाला आलेला, तर दुसरा किशोरवयीन मुलगा, आणि आज्जी, हे दिल्लीतले एक सामान्य कटुंब. एखाद्या बाळाचं येणं एखाद्या कुटूंबासाठी किती आनंदाची गोष्ट असते. येणाऱ्या नव्या पाहुण्यासाठी सारे अगदी सज्ज असतात. पण कौशिक कुटुंबावर बॉम्ब पडतो जेव्हा 50शी उलटलेलं आलेलं जोडपं जितेंदर (गजराज राव) आणि प्रियंवदा (नीना गुप्ता) यांना नवीन बाळाची चाहूल लागते. या ' Good news' कडे घरातल्या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया, शेजारी, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या प्रतिक्रिया, प्रत्येकाचे वेगळे दृष्टिकोन या सगळ्या ची ही गोष्ट आहे. अमित शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.  नकुल (आयुषमान खुराना) हा कौशिकांचा मोठा मुलगा त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर, प्रेमजीवनावर याचा होणारा परिणाम हे जरी कथानक असले तरी ते सेकंडरी म्हणावे लागेल. खरी कथा आहे, तिसऱ्यांदा मूल होणाऱ्या, तेही 50शी उलटलेल्या, अशा जोडप्याची. गजराज आणि नीना यांचा अभिनय जबरदस्त आहे. गजराज राव यांना तर काही सीन्स मध्ये संवाद नसूनही केवळ हावभावांवरून

अंधाधून:- A Trilling Blind Game

अंधाधून:- हवीहवीशी अंदाधुंदी आत्ता अंधाधून बघून आले..  नाटकाचा एक साधा नियम आहे. पहिल्या अंकात जर भिंतीवर बंदूक दाखवली, तर तिसऱ्या अंकात तिचा बार उडलाच पाहिजे. नाहीतर ती दखवण्याचं प्रयोजन काय? (*Bertolt Brecht, Chekhov and others) एका लाईन मध्ये अंधाधूनची कथा सांगायची तर, एक तरुण प्रतिभावान 'अंध' पियानो आर्टिस्ट एक खून 'पाहतो'. आणि मग सुरू होते थरारक घटनांची मालिका. एक थ्रिलर असूनही दिग्दर्शक 'श्रीराम राघवन' यांनी बुफे सारखं, कुणाचा खून झाला, कुणी केला, कसा केला, का केला? सगळं वाढून ठेवलं आहे. काहीही प्रेक्षकांपासून लपलेलं नाही. आणि तरीही अत्यंत अनपेक्षित, वेगवान, उत्कंठावर्धक हे रहस्यपटाचे सारे गुण आपल्याला अनुभवायला मिळतात.  गुणी कलाकार आयुषमान खुराना याने त्याची versatility इथेही जपली आहे, राधिका आपटे तिच्या नेहमीच्या बिनधास्त अवतारात आहे. छाया कदम( सैराट, न्यूड फेम), अश्विनी काळसेकर, मानव वीजे, अनिल धवन लहान लहान भूमिकांत भाव खाऊन जातात. एकदम नैसर्गिक.  आणि तब्बू.. एक नंबर..Cold blooded, जहरी, दुटप्पी आणि चित्रपटात एक पात्र म्हणतं त्याप्र

होम स्वीट होम - नात्यांचं रूटीन चेकप

साठी पार जोडप्यातल्या सौ.श्यामलला (रिमा लागू),आहे तो फ्लॅट विकून टॉवरमध्ये राहायला जायचे आहे, तर श्री. विद्याधरांसाठी(मोहन जोशी)आपल्या घर म्हणजे नुसत्या भिंती नाहीत. आठवणींचा साठा आहे, आयुष्याचा असा भाग आहे की, उर्वरित आयुष्यही इथेच घालवावं अशा मताचे. त्यातून त्यांना नवं घर मिळवून, आपल्या घरासाठी स्वप्न पाहणारा देणारा एजंट (हृषीकेश जोशी) यांची ही कथा. त्यापायी होणारे रुसवे फुगवे, भौतिकाशी आपलं जडलेलं अतूट नातं, एकीकडे नव्याची आस आणि दुसरीकडे न सुटणारी जुन्याची कास आहे. या मुख्य पात्रांसोबतच विभावरी देशपांडे, स्पृहा, सुमित राघवन त्यांच्या त्यांच्या लहानशा भूमिकेत चांगले वाटतात.  राहत्या घराचा कंटाळा येऊन दुसरं घर पाहायला गेलेले महाजन जोडपं घरी येऊन स्पृहाच्या मित्रमंडळींचा पार्टीनामक पसारा पाहतं, तेव्हा "माझ्या घरात मलाअसली थेरं चालणार नाहीत" म्हणणारी श्यामल आपल्या घराबद्दल भावुक होते.. आणि शेवटी फ्लॅट असो की टॉवर शेवटी त्यात राहणाऱ्या माणसांनी घर बनतं. म्हणजे एकीकडे तिला दुसरं चांगलं घरही हवं आहे, तर दुसरीकडे जुन्या घराची ओढही कमी होत नाही आहे. 'इच्छा आणि आवश्यकता&

सविता दामोदर परांजपे - एक रंगलेले गूढ

लग्नाच्या 8 वर्षानंतरही वरून सुखवस्तू जोडपे शरद व कुसुम अभ्यंकर(सुबोध भावे, तृप्ती तोरडमल) सुखी नाही. कुसुम एका विचित्र शारीरिक, मानसिक स्थितीतून जाऊ लागते ज्याचे वैद्यकशास्त्रात उत्तर नाही. याचा तिच्या वैवाहिक आयुष्यावर होणारा परिणाम, भूतकाळात डोकावून बघताना उलगडलेले एक सत्य, एक स्त्री. 'सविता दामोदर परांजपे'. कोण आहे ही सविता? तिचं आणि शरदचं नातं काय?  या साऱ्याची ही कथा. 80 च्या दशकातल्या याच नावाच्या मूळ नाटकावर बेतलेला हा सिनेमा आहे. नाटकात कै. रीमा लागू यांनी केलेली कुसुमची भूमिका तृप्ती तोरडमल हिने साकारली आहे. तिचे हे यशस्वी पदार्पण म्हणावे लागेल. सुबोध भावेने ही शरदची भूमिका उत्तम वठवली आहे. बाकी भूमिकांमध्ये राकेश बापट, पल्लवी पाटील यांनीही त्यांच्या भूमिकांना न्याय दिला आहे.  चित्रपटातील गाणी आणि बॅकग्राऊंड साऊंड खूप मस्त. 'वेल्हाळा' आणि 'जादूनगरी' ही गाणी खूपच श्रवणीय. संवादही सुंदर. मराठी भयापटांचा इतिहास पाहता, एक थरार निर्माण करून तो शेवटपर्यंत राखून ठेवण्याचे काम यात चांगल्या रीतीने केले आहे. काहीशी हिंदी चित्रपट 'भूलभुलैय्या' ची झा

ब्रिजमोहन अमर रहे: बलमा ये करमा

एक साधारण माणूस ब्रिजमोहन (अर्जून माथूर) कर्जाच्या बोझ्याने परेशान आणि जीव मुठीत घेऊन असताना हतबल होऊन स्वतःच्याच मृत्यूचा देखावा रचतो, पण स्वतःच्याच खुनाबद्दल त्याला शिक्षा ठोठावल्या जाण्यापर्यंत गोष्टी हाताबाहेर जायला लागतात. आणि तो एका संकटातून बाहेर पडतो न पडतो तो अजून वेगळ्या संकटात फसायला लागतो. अशी एकंदर 'ब्रिजमोहन अमर रहे' ची मनोरंजक  संकल्पना आहे. कलाकारही चांगले आहेत. अधूनमधून रटाळ व्हायला लागतंय असं वाटतं तोच परत पेस वाढते.  शिव्या, अनैतिक संबंध आणि सेक्स शिवाय नेटफ्लिक्स ओरिजिनल येतच नाहीत जणू. छान ब्लॅक कॉमेडी चालू असताना अचानक  कसलातरी विनाकारण अश्लील छपरीपणा सगळं फिस्कटून टाकतो.  "मनुष्याला शेवटी आपल्या कर्माची फळं भोगावीच लागतात" हा संदेश यात दिला आहे. नेटफ्लिक्स फिल्मसची जमेची बाजू म्हणजे गोष्ट कोणत्याही कॅरेक्टरला ग्लोरिफाय केलेलं नसतं. पण या सिनेमात प्रत्येक पात्राची ब्लॅक साईड हायलाईट केलेली आहे. आणि त्याची आपल्याला सवय नाही.  जबरदस्त पंची डायलॉग्ज, जुन्या गाण्यांचा चपखल ठिकाणी वापर याने काही ठिकाणी मजा येते. या कल्पनेवर अजून छा

एक ही भूल..स्लो स्लो घूल

Tv मालिकांना कंटाळून पुन्हा पाऊले चालती नेटफ्लिक्सची वाट करत आज मी नेटफ्लिक्स वरची नवीन वेब सीरिज 'घूल' पाहिली. ते काय आहे, मला हॉरर प्रकार आवडतो आणि नेटफ्लिक्सने दत्तक घेतलेली राधिका आपटेही. अरबी लोककथेनुसार 'घूल' हे असे भूत असतात जे माणसांना खातात आणि मग त्यांचे रूप धारण करतात.  3 एपिसोडमध्ये याचा पहिला सीझन शूट केलेला आहे. साधारण हॉररपटांमध्ये होणारा धक्कातंत्राचा वापर इथे खूपच कमी आहे. त्यामुळे इथे घाबरण्यासाठी पाहणाऱ्या प्रेक्षकांना काही सस्पेन्स वगैरे मिळतच नाही.   काही ठिकाणी अक्षरशः बोर व्हायला झाले. ज्यांना इंग्रजी हॉररपट बघायची सवय आहे त्यांना फार काही वेगळा वाटणार नाही. पण राजकीय पार्श्वभूमी, गुप्त एजन्सी, मुस्लिमाना आतंकवादी लेबल लावून केलेले इंटेरोगेशन, देशभक्ती आणि धर्म अशा महत्त्वाच्या विषयातील काही clichés इथे आढळतील.  Sacred Games शी याची तुलना होऊच शकत नाही. त्यात छोट्याशा भूमिकेतही भाव खाऊन गेलेली राधिका आपटे यात निदाच्या भूमिकेत predictable वाटायला लागते.  पण तरीही it's worth a try. काळा, पांढरा, ग्रे शिवाय पुढच्या सीझनम

लिपस्टिक अंडर माय बुरखा : फिस्कटलेली रंगीत स्वप्ने

आज बहुचर्चित 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' पाहिला. (सौजन्य-Netflix) एक हवाई मंजिल नामक पुरानी हवेली त्यातल्या 4 स्त्रियांची ही कहाणी. यांनी अपराध केला आहे. स्वप्नं पाहण्याचा. आपल्या मर्जीने आयुष्य जगण्याची स्वप्नं, स्वतःच्या शरीरावर प्रेम करण्याची स्वप्नं. कर्मठ कुटुंबाच्या कचाट्यापासून ते सेक्सिस्ट, दांभिक समाजाच्या so called मूल्यांशी झगडून स्वातंत्र्य मिळवण्याची स्वप्नं. त्यांना ती स्वप्नं पाहण्याचा अधिकार आहे तो एका उंबऱ्या आडूनच. लिपस्टिक च्या लाखो शेड्स सारखी रंगीत स्वप्नं असतील. पण ती लपवायची. त्यांना लपूनछपून रहायची परवनगी आहे. पण बुरख्याआड. भोपाळ सारख्या ठिकाणी असलेल्या या बायका. रेहाना ही कॉलेज कन्या. तिच्याघरीच बुरखा शिवण्याचा व्यवसाय आहे. पण रॉकस्टार बनावं, बेधुंद नाचावं, गावं, जीन्स सारखा पेहनावा करावा असं तिला वाटतं. सनातनी मुस्लिम कुटुंबातील बंधनांना झुगारुन, पारतंत्र्याच्या बुरखा फाडून तिला मोकळं व्हायचंय.  दुसरी लीला. बळजबरीने लग्न लावले जाणारी एक तरुणी, प्रियकर आणि होणारा नवरा यांच्या कात्रीत सापडलेली, बिझनेस करावा, दिल्ली गाठावी अशी तिची

लस्ट स्टोरीज: कथा चार, अनंत विचार

'बॉम्बे टॉकीज' या अँथॉलॉजि फिल्म नंतर त्याच दिग्दर्शकांनी पुन्हा एकदा एका थीम वर आधारित चार गोष्टींची मालिका आणण्याचा प्रयोग 'लस्ट स्टोरीज' च्या चार कथांमध्ये केला आहे. ज्यांना ज्यांना सांगितलं "पाहा जरूर", almost सगळ्यांच्या akward reactions आल्या. ( की बाई, तुला काही भीड, मुरवत आहे की नाही, हळू सांग की, या विषयावर अशी बोंबलतेस काय?) आणि काय सांगू, हीच थीम आहे. 'लस्ट स्टोरीज' केवळ 'शारीरिक वासना' इतकाच विषय नाही हाताळत. सेक्स, गरज, सामाजिक दृष्टिकोन आणि taboos, व्यक्तिस्वातंत्र्य आणि स्त्री..  एकंदर या सगळ्यावर आधारित आहेत लस्ट स्टोरीज.  पहिली कथा अनुराग कश्यपची. राधिका आपटेने खाऊन टाकली आहे. लग्न झालेल्या बाईचे कलीग सोबत विद्यार्थ्यांसोबत fling. त्यातून होणारी सेक्स, रिलेशनशिप, प्रेम , गिल्ट, जेलसी यांची सरमिसळ सगळं सगळं ती आपल्यासोबत शेअर करते. नेहमीप्रमाणे प्रामाणिक अभिनय, कसलाही भपका नाही. 'Bold & Beautiful yet Confused' कालिंदी तिने मस्त रंगवलीये. आकाश ठोसर ला चांगली संधी मिळाली आहे, पण त्याने त्याच्या बोलण्यावर अजून क

मस्का- घ्या लज्जत

 आजवर लेखक, अभिनेता म्हणून परिचित प्रियदर्शन जाधव याचा 'मस्का' पाहिला.  लोकांना भावनांच्या जाळ्यात ओढून लुटणाऱ्या भामट्यांची ही ट्विस्टस आणि टर्नस नी भरलेली अनपेक्षित कथा. 'Suspense Comedy' असा काहीसा वेगळाच genre म्हणता येईल. सगळ्याच कलाकारांनी उत्तम काम केलं आहे. अगदी नैसर्गिक. 'बनचूका यादव' (शशांक शेंडे),  'नवशिका चिकू' (प्रणव रावराणे), 'गोंधळलेला करोडपती हर्ष' (अनिकेत विश्वासराव), रहस्याची किल्ली (चिन्मय मांडलेकर) आणि हुकुमाची राणी, Leading Lady (प्रार्थना बेहरे) यांच्या अभिनयाने प्रत्येक प्रसंग खुमासदार झालेला आहे. त्याच त्याच प्रकारच्या भूमिकांमधून बाहेर पडून नवीन काहीतरी करण्याचं स्वातंत्र्य त्यांना मस्कामध्ये मिळालं आहे.  नाटक, TV आणि चित्रपट तिन्ही माध्यमात का म करणाऱ्या प्रियदर्शन जाधवने 'मस्का'तून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. आणि ते यशस्वीही झाले आहे. एका अर्थाने डार्क कॉमेडी म्हणता येईल अशी कथेवर काम करणं खरंच खूप challenging आहे. चित्रपटात कोण कुणाला फसवतंय हे माहीत असूनही प्रेक्षक 'कसे' हे जाणून

राझी : सत्यकथा सेहमतची

'कॉलिंग सेहमत' पुस्तकावर आधारित आलिया भट स्टारर 'राझी' पाहिला. सत्यकथा असलेल्या या फिल्म मध्ये आलिया भटने मुख्य भूमिका 'सेहमत' साकारली आहे. तुम्ही लष्करात एखाद्या हुद्यावर काम करत असाल तर तुमचे नाव अभिमानाने मिरवले जाते. पण अनेक गुप्तहेर असतात जे हेरगिरीचे प्रशिक्षण घेऊन शत्रूपक्षाकडून माहिती काढून पुरवण्याचे काम करतात. देशासाठी गुप्तपणे, काम करणारे हे हेर शेवटपर्यंत गुप्तच राहतात. त्यांचं काम, बलिदान देशासमोर कधीच येत नाही. पकडले गेले तर देश त्यांच्या संरक्षणाला धावून येत नाही. त्यांचा त्यांनाच निभाव करावा लागतो.  1971 च्या भारत-पाक युद्धाचे शक्यता लागून आहे, अशा वेळी एक 20 वर्षीय तरुणी, जिचे वडील, आजोबा जे भारताचे स्वातंत्र्यसेनानी होते, तिचे लग्न पाकिस्तानातील आर्मीतील मोठ्या हुद्यावर काम करत असणाऱ्या उच्चभ्रू घरात केले गेले आणि तिने हेर म्हणून अत्यंत महत्त्वाची माहिती गुप्तपणे भारतात पाठवण्याचे काम केले त्या सेहमतची ही कथा आहे.  आलियाने 'उडता पंजाब', 'हायवे' सारख्या फिल्म्समध्ये मध्ये आपलं अभिनय कौशल्य वेळोवेळी दाखवलं

भरधाव 'सायकल'

या सिनेमाच्या कथेत कोकणातलं लहानसं गाव, त्यातला ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असणारा प्रसिद्ध केशव आणि त्याच्या आजोबांनी त्याला दिलेली प्रसिद्ध सायकल आहे. गज्या - मंग्या हो चोरांची जोडगोळी गावागावांत, घराघरातून हात मारत असताना ही सायकल चोरतात, त्याची ही गोष्ट! केशव, हुशार आहे, सज्जन आहे, म्हणूनच गावातल्या लोकांत त्याला मान आहे. बाकी तो लोकांना मदत करण्यासाठी कासेची लंगोटी काढून देईल, पण त्याची एक कमजोरी आहे. त्याचा जीव अडकला आहे सायकलमध्ये! आजोबांनी वडिलांना डावलून ती आपल्याला दिली, आणि म्हणूनच त्यांची ज्योतिषविद्याही तिच्याद्वारे आपल्याला बहाल केली असा त्याचा वेडा समज आहे. एरवी वस्तूत अडकून पडायचं नाही हे पाळणारा, इतरांना सांगणारा केशव 'सायकल' विषयी मात्र फक्त हळवाच नाही, हट्टी आहे. प्रत्येकाचा एक weak point असतो. त्याला धक्का लागला की तो माणूस कोलमडतो, तुटून पडतो, शक्ती गमावून बसतो. तसंच केशवचं होतं. इतकं की "केशवमुळे सायकल की सायकलीमुळे केशव"असा प्रश्न पडावा. चोरांच्या (प्रियदर्शन जाधव, भाऊ कदम) आयुष्यात सायकल काय येते आणि प्रेम, आपुलकी, माणुसकी या तत्त्वांचं बळ त्

"न्यूड : नग्नतेतील मुक्त कलाविष्कार"

आत्ता 'न्यूड' पाहिला. एखाद्या कथेचं चित्रात रूपांतर व्हावं आणि प्रत्येक ब्रशस्ट्रोक सोबत तयार व्हावी एक एक अप्रतिम फ्रेम आणि त्यांची एक बनावी चित्रमालिका या साऱ्यांनी बनला आहे 'न्यूड'. गावातून मुंबईला आलेली यमुना 'न्यूड मॉडेल' बनते. का? कशी? त्याचे होणारे परिणाम, पात्रांची आणि शेवटी आपलीही बदलत जाणारी विचारसरणी याची गोष्ट आहे न्यूड मध्ये.  चित्रपटाची कथा नग्नतेवर बेतली असली तरी कुठेही भडक होत नाही. अश्लीलतेचा लवलेश नाही. मॉडेल म्हणून तयार होताना आधी यमुनेची होणारी तडफड, तगमग, अगतिकता आपल्याला अस्वस्थ करून सोडते.  चित्रपटात एक मोठा कलाकार (एम.एफ.हुसेन वर बेतलेला)  मलिक (नसिरुद्दीन शाह) नायिकेचं न्यूड काढता काढता तिच्याशी आणि आपल्याशीही गप्पा मारतो. "मी घोड्यांची चित्रं काढली तर कुणाला हरकत नाही, पारव्यांची चित्र काढली कुणी बोलत नाही, मग मी माणसांची चित्रं काढली तर इतका हंगामा कशासाठी?", कलाकार 'रुह' पाहत असतो. तीच चितारत असतो.  चित्रपटाची कथा नग्नतेवर भाष्य करत असली तरी कुठेही भडकपणा नाही. काही प्रसंग अंगावर येतात पण ते त्य

मंत्र : एक विचारमंथन

आत्ता 'मंत्र' पाहून आले. चित्रपटाचा नायक निरंजन (सौरभ गोगटे) याच्या घरी पिढीजात पौरोहित्य हा व्यवसाय आहे. वडील, काका, थोरला भाऊ देखील हेच काम करतात. याला जर्मनीत देवळात पुरोहित म्हणून जाण्याची संधी मिळते, तो वडिलांकडून धर्मविधींचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊ लागतो. दुसरीकडे नायिका अंतरा (दीप्ती देवी) ही नास्तिक आहे. तिचा कर्मकांड, रुढींवर राग आहे. तिचे धर्मविषयक विचार, निरंजनचे मित्र, त्यांचे विचार, धर्माचा राजकारणात चाललेला चुकीचा वापर या सगळ्यात निरंजन गुरफटलेला आहे. घुसमटतो आहे. प्रयत्न करूनही त्याला व्यक्त होता येत नाही आहे.आस्तिक-नास्तिक भेद, धर्मविधी यांवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे.  कथा, पटकथा, दिग्दर्शन हर्षवर्धन यांचे असून पहिल्याच प्रयत्नात त्याने असा मोठा संवेदनशील विषय हाताळणे बऱ्याच अंशी साध्य केले आहे असे म्हणता येईल.  मनोज जोशीने एक संयत, विद्वान पुरोहित पंत साकारले आहेत. निरंजनला (आणि आपल्यालाही) पडलेल्या प्रश्नांना ते उत्तरे देतात. देव या संकल्पनेवर प्रकाश पाडतात, हे त्यानी छान साकारले आहे. सौरभ, दीप्ती प्रमाणेच पुष्कराज चिरपुटकर, शुभंकर एकबोटे यांचाही स

उडता पंजाब : दबलेला आतंक

पंजाबमधील ड्रग्जच्या विळख्यात सापडलेल्या तरुण मंडळी, अमली पदार्थांची तस्करी, सध्याच्या पिढीलाच पोखरणारं नार्को पॉलिटिक्स या सगळ्यांचं चित्रण 'उडता पंजाब' सिनेमात पाहायला मिळतं. आपल्या गाण्यांतून नशा, हिंसा ग्लोरिफाय करणारा, स्वतःही ड्रग्जच्या आहारी गेलेला तरुण रॉकस्टार टॉमी सिंग (शाहिद कपूर) , ड्रग्ज माफियांच्या जाळ्यात अडकलेली एक बिहारी तरुणी कुमारी पिंकी (आलिया भट), अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या रुग्णांवर उपचार करणारी डॉक्टर प्रीत (करीना कपूर), आणि पोलीस अधिकारी सरताज (दिलजीत) ही उडता पंजाब ची प्रमुख पात्रं योगायोगाने, वेगवेगळ्या संदर्भाने एकत्र येतात. एकीकडे सरताज आणि प्रीत ड्रॅग रॅकेट व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी एकत्र आले आहेत हा एक ट्रॅक तर एकीकडे ऐन तरुणाईत ड्रग्जमुळे स्वतःची स्वप्ने पिचलेले टॉमी आणि पिंकी, यांचीबस्वतःची स्वतःशी लढाई हा एक ट्रॅक आहे. मधेच भ्रष्टाचारी सरकारी यंत्रणा आणि झिंगून भोगणारी तरुणाई असे ट्रॅक या सिनेमात येतात. चित्रपटातील अतिशिवराळ भाषेमुळे, काही बाबी अश्लील (म्हणजे नेमकं काय काय?🤔) भासल्यामुळे सेन्सॉर बोर्डाच्या अनेक 'कटकटिंग'

"आम्ही दोघी - एक धागा विणलेला"

काल 'आम्ही दोघी' पाहिला. गौरी देशपांडें च्या 'पाऊस आला मोठा' या कथेवर बेतलेला हा सिनेमा. दिग्दर्शिक प्रतिमा जोशी यांनी कथेवर सुंदर काम करून चित्रपट बनवला आहे. संवाद जास्त करून कथेतलेच असल्यामुळे भाग्यश्री जाधवला फारसे काही करावे लागलेच नाही असं म्हणणं गैर ठरेल. मूळ कथेत नसलेली पात्रे राम, नेहा व तिचा नवरा या कथेत अगदी सहज सामावून गेलेली आहेत. त्यांचे किंवा अम्मीचे शेवटचे संवाद कॅची, थोडके आणि तरीही हृदयस्पर्शी.  कोल्हापुरातील एक नामांकित वकील (किरण करमरकर) यांची मुलगी सावित्री सरदेसाई (प्रिया बापट). तिची आई लहानपणीच गेल्यामुळे, अप्पा (वडील) आणि घरातील नोकरचाकर यांच्या देखरेखी झालीच वाढलेली.  लहनपणापासून घरात "We are not emotional fools. We are practical." हे तिच्या वडिलांचं तत्व तिनेही जपलेलं. त्यामुळे काहीशी फटकळ, तुसडी किंवा चांगल्या शब्दात म्हणायचं तर 'अतिस्पष्ट'. इतर मुलींपेक्षा वेगळी सावित्री.  10वीत असताना अचानक एके दिवशी तिचे वडील तिच्यातून 7-8 वर्षांहून मोठ्या अमलाला (मुक्ता बर्वे) लग्न करून घरी घेऊन येतात. वरवर "मला काय कराय

थ्री बिलबोर्डस आउटसाईड एबिंग, मिसोरी

मी सहसा मनाला अस्वस्थ करणारे चित्रपट पाहत नाही, पण काही दिवसांपूर्वी फिल्म सोसायटीने निवडलेला हा नावाजलेला सिनेमा पाहिला. कथा आहे मिल्डरेड या मध्यमवयीन स्त्रीची. तिच्या मुलीचा बलात्कार आणि खून होऊन अनेक महिने उलटूनही पोलीस तपासात काहीच निष्पन्न होत नाही. गुन्हेगार काही सापडत नाही. लोकही ही घटना विसरून जातात. याने पेटून उठून मिल्डरेड तिच्या गावातल्या एका रस्त्यावरचे 3 बिल्डबोर्डस भाड्याने घेते आणि प्रत्येकावर 'Raped while dying', इतके दिवस होऊन ही गुन्हेगार कसा सापडत नाही, असे पोलिसांचा नाकर्तेपणा समोर आणणारे अस्वस्थ प्रश्न एकामागोमाग एक लिहिलेले असतात. मिल्डरेड चा यामागे एकमेव हेतू असतो, आपल्या मुलीच्या गुन्हेगार सापडावा आणि त्याला शिक्षा व्हावी. साधारण सगळेजण एकमेकांना ओळखत असतात अशा लहानशा गावात काहीच लोक मिल्डरेडच्या बाजूने असतात पण बहुतेक जण नसतात, आणि त्यातही मीडिया आणि पोलीस यांना तीची ही न्याय मागण्याची पद्धत चुकीची आहे असं वाटत असतं. या सगळ्यांना तोंड देणारी एक शोकमग्न आई 'फ्रान्सिस मॅकडोरमंड' ने अप्रतिम साकारली आहे. तिच्या थंड चेहऱ्यामागे आहे एक धुम

एक 'गुलाबजाम' मुरलेला

भारतातले अनेक पुरुष शेफ जगभरात विख्यात असले तरी, भारतात विशेषतः महाराष्ट्रात स्वयंपाक म्हणजे बाईचं काम हे समीकरण अजूनही घट्ट आहे. पण 'गुलाबजाम' चित्रपटाचा नायक आदित्य (सिद्धार्थ चांदेकर) हा आपला लंडन मधली भरभक्कम पगाराची नोकरी सोडून भारतात परत येतो, पुण्यात खास मराठी पद्धतीचा स्वंयपाक शिकायला. लंडन मध्ये खास मराठी पदार्थांचं रेस्टॉरंट काढणं हे त्याचं स्वप्न आहे, ध्यास आहे. त्याला पुण्यातील एका डबे देणारी बाई राधा आगरकरचा (सोनाली कुलकर्णी) शोध लागतो आणि आता या राधाकडूनच आपल्याला स्वयंपाक शिकायचा आहे अशी खूणगाठ बांधतो, आणि तर्हेवाईक, खडूस, थंड  राधा जी स्वयंपाक मात्र चविष्ट बनवते तिला आपली गुरू मानून शिकवण्यासाठी तयार करतो, आणि आयुष्यच बदलून जातं! इतकीच कथा. कथा म्हंटलं तर इथेच संपली, पण खरं तर इथे सुरू होते सचिन कुंडलकर, तेजस मोडक यांची ही कथा मांडते मानवी जीवनाचे अनेक कंगोरे. भुकेसारखी सुंदर आणि वाईट ही,  कॉम्प्लेक्स गोष्ट नाही या जगात. तिच्या पूर्तीसाठी आपण जगतो. तिच्यामुळे आपण जगतो. ही कथा स्वयंपाकाची आहे, आयुष्यातल्या वेगवेगळ्या घटकांची, वेगवेगळ्या परिमाणात घेऊन त्याला