Skip to main content

Posts

Showing posts from September, 2020

हर

आपण याच यंत्रयुगात इतके अवलंबून आहोत यंत्रांवर, obsessed आहोत की नजीकच्या भविष्यात जर आपण त्यांच्या प्रेमात पडलो तर नवल नाही. ही गोष्ट फक्त थिएडोर (Joaquin Phoenix) आणि एक ऑपरेटिंग सिस्टीम समँथा (आवाज- Scarlett Johansson) यांच्यातल्या नातेसंबंधाची नाही.  एकलकोंडा, बायकोपासून विलग अशा थिएडोरला एकटेपणा घालवायला कुणीतरी हवं आहे. मग ते एखादी ऑपरेटिंग सिस्टीम का असेना तो तयार आहे. समँथा आणि थिओ यांच्यात एक नातं तयार होतं जे मैत्रीपलीकडे आहे. एकटेपणा, नैराश्य, शारीरिक गरज भागवण्याइतपत तो समँथाच्या केवळ आवाजावर  अवलंबून आहे की अजून काही जास्त भावना आहेत? ती सतत म्हणते तसं तिला भावना आणि शरीर प्राप्त होतं का? थिओडोरप्रति तिच्या वागण्याला भावना म्हणायचं का? त्या दोघांच्या नात्याला प्रेम म्हणायचं का? डिवोर्स पेपर्सवर सही घेण्यासाठी तो बायकोकडे जातो तेव्हा बायको तो यंत्रासोबत रिलेशनमध्ये आहे हे कळल्यावर त्याला नात्यांपासून दूर पळणारा, स्वप्नात रमणारा, सत्य झटकणारा, परिस्थिती नाकारणारा म्हणते. समँथा सोबततरी नाते स्थिर राहणार का? या साऱ्यांची प्रश्नोत्तरे म्हणजे लेखक, दिग्दर्शक Spike Jonze चा '

शरदचंद्र चटोपाध्याय

शरदचंद्र चटोपाध्याय हे एक मोठे बंगाली साहित्यिक होते. उपेक्षितांचे अंतर्बाह्य चित्रण करणारे,  परंपरेच्या जोखडात अडकलेला समाज, खास करून स्त्री वर्ग यांच्या व्यथांचं कथन बंगाली साहित्यात 'शरद साहित्य' म्हणून एक मानदंड ठरलं. आजही आहे. भारतीय साहित्यात त्यांचे योगदान दूरगामी व परिणामकारक आहे.  त्यांचा जन्म 15 सप्टेंबर 1876 रोजी झाला.  कॉलेजात असताना त्यांनी 'भागलपूर साहित्यसभेची' स्थापना करून 'छाया' हे हस्तलिखित सुरू केले. रवींद्रनाथांसारखं अभिजात साहित्य जन्माला घालायचं त्यांचं स्वप्न होतं. गरिबीमुळे त्यांना शिक्षण ही अर्धवट सोडून द्यावं लागलं. पण त्यांचं साहित्यावरील प्रेम कधीच कमी झालं नाही. पैशाच्या चणचणीमुळे त्यांनी नोकरी धरली, त्यांचे संवेदनशील मन समाजातील तळागाळातून सुख-दुःखाचे निरीक्षण करत होते त्यावेळी त्यांची 'बडदीदी' ही अप्रकाशित कादंबरी कोलकात्यात 'भारती' मासिकात क्रमशः छापून आणली गेली आणि बंगाली साहित्यात 'शरदचंद्र' उदयाला आला. शोषित, मूक, दबलेल्या समाजाचा आरसा म्हणजे त्यांचं साहित्य. कल्पनारम्यतेऐवजी वास्तवतेकडे झुकणारा असा त्या