Skip to main content

Posts

Showing posts from September, 2019

Once in a year..

मुलगा अरिहंत ( Nipun Dharmadhikari )   आणि मुलगी रावी (मृण्मयी गोडबोले) भेटतात, त्यांची गोष्ट. वर वर साधं- सोपं वाटलं तरी वास्तवात असतं तसं क्लिष्ट असं त्यांचं नातं. 'वन्स इन अ यर' ही 2013- 2018 या वर्षांत घडणारी गोष्ट ( टायटल सॉंग अप्रतिम आहे, ऐकायला आणि बघायलाही). वय वाढतं तसं नात्याची परिपक्वता वाढत जाते तसेच प्रॉब्लेम्सही.  निपुणचा अभिनय पहिल्यांदाच पाहिला. सहज आहे, ओढून-ताणून नाही, कॅज्युअल आहे. मृण्मयीचे कॅरेक्टरही छान. दोघेही एकदम पुणेरी.  यातली सिनेमॅटोग्राफी ही एक उल्लेखनीय बाब आहे. लोकेशन्स छान आहे.  MXPlayer वर आहे. बघा जरूर.   - ©रमा

बदल

रात्री पिक्चर बघत बसले होते , ' गुडबाय ख्रिस्तोफर रॉबिन ' आणि मी शर्यंत लागल्यासारखी धावत   फेसबुकवर लिहून टाकणार तोपर्यंत पिकलपोनीचा फोन . आवाजात सर्दी , खोकला , " हॅलो , मी पिकलपोनी बोलतेय." तोपर्यंत दादू तिच्याकडून फोन घेत म्हणाला   "अगं रमाताई तू जरा ये घरी."     मी म्हणाले , " का रे अचानक ? खरंतर मला यायचं असतं , पण राहून जातं.." , दादू म्हणाला , " हे बघ , आम्ही ४ मंडळी सायकलवर मावणार नाही गं , गाडी घेऊन ये.".   मला काही कळेना. " चौघांना जायचंय कुठं खरं ?". पण मग " डॉक्टरांकडे जायचंय." एवढं ऐकताच मी पटकन निघाले. पोहोचते तर बघते काय ? सगळे बाहेर. दादू , पिकू मरगळून उभे. ” डॉक्टर आत्त्यांकडे गेल्यावर त्यांना तपासून , काही फिल्म्सची यादी , खेळ , पत्रलेखन वगैरे औषधं लिहून त्यांना बाहेर बसायला सांगून डॉक्टर आत्यांनी मला थांबायला सांगितलं. मला बसवून बोलायला लागल्या, " रमा , तू लिहून यांचं जग , पिकलवर्ल्ड   बाहेर , आपल्या जगात आणलंस. पण त्यांना कायमचं इथे वास्तवात आणायची ही कसली धडपड ? राहू दे की त्यांना पिकलवर

हलाल - बलिदान

मुस्लिम धर्मात 'हलाल' चा अर्थ आहे, वैध किंवा धर्मानुसार योग्य बलिदान. त्याप्रमाणेच हलाल चा अर्थ एखाद्या जीवाला हाल-हाल करून मारणे. हलाल ची वैवाहिक रूढी अशी की एखाद्या माणसाने जर आपल्या बायकोला त़लाक दिला आणि तिच्याशीच परत लग्न करायचे झाले तर आधी तिचे दुसरे लग्न लावायचे त्या व्यक्तीने जर आपणहून तिला (तीन महिने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेऊन बिऊन) त़लाक दिला तर ती प्रथम पतीशी लग्न करू शकते. पुरुषाने उठसूट काडीमोड घेऊ नये यासाठी त्याला शिक्षा म्हणून असला विपरीत कायदा कुराण-ए-पाक मध्ये समाविष्ट होता. धर्मातील कायदे न समजून घेता तोडून -मरोडून लोकांपर्यंत येतात आणि मग 'ख़ुदा के लिए' ते त्याचे पालन करतात त्याने धर्माचा आंधळेपणा, समाजाचा दुटप्पीपणा आणि परिणामी लोकांचे हलालरूपी शोषण होते. तिहेरी त़लाक विरोधी अशी 'हलाल' ची कथा राजन खान यांच्या कादंबरी वरून घेतलेली आहे.  हलीम आणि खुर्दुस हे एक विवाहित जोडपे आहे, पण रागाच्या भरात खुर्दुस हलीमला तोंडी तिहेरी त़लाक देतो. 2 वर्षा साठी हलीमला माहेरी पाठवतो आणि आई वारल्यावर पुन्हा न्यायला येतो. पण वडील सरपंच आणि मौलाना प

ऑक्टोबर : नात्याला या नकोच नाव

सगळ्याच नात्यांना नाव नसतं. सगळ्याच भावनांत आर्तता नसते. सगळ्याच कथा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वाटतीलच असं नाही. पण ‘ ऑक्टोबर ’ मला स्वतःचा वाटला. डॅन आणि शिवली. हॉटेल मॅनेजमेंट इंटर्न्स , एकमेकांशी अगदी मोजका संवाद असलेले , सहकारी इतकेच काय ते त्यांचे नाते. डॅन बेफिकीर , अस्ताव्यस्त , कामात लक्ष नसलेला , बेधडक आणि कधी कधी दुखेल असे बोलणे तरी थोडा निष्पाप तर शिवली शांत , कामात सिन्सिअर. ‘ दोन ध्रुवावर दोघे आपण ’ असे त्यांचे अत्यंत विरुद्ध स्वभाव. एका अपघातामुळे शिवली कोमा आणि नंतर त्यासदृश परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये बेडला खिळलेल्या अवस्थेत आहे आणि नंतर डॅन मध्ये या घटनेने जे बदल घडत जातात आणि त्यांचे एक अतूट बंधन निर्माण होते त्याची ही सुगंधी कथा. डॅन अधिकाधिक शिवलीची काळजी करू लागतो , त्याच्या रोजच्या भेटींमुळे त्याच्या इतर सहकाऱ्यांना त्याचे वागणे विचित्र वाटते. असे काही होऊ शकेल आणि तेही डॅनकडून असे कुणालाही विचित्रच वाटेल. पण त्याचे शिवलीकडे वारंवार जाणे , याने त्याचा स्वभाव बदलतो. एरवी बालिश वाटणारा डॅन शिवलीच्या प्रत्येक बाबतीत सीरियस वागू लागतो. चित्रपटातील डॅन - शि

सेक्रेड गेम्स- सीजन 2

प्रभू रामचंद्राच्या वनवासानंतर अयोध्या नगरीने ज्या आतुरतेने त्यांची वाट पाहिली असावी तशी नेटफ्लिक्सवासीयांनी GOT, Narcos नंतर 'सेक्रेड गेम्स' च्या पुढच्या सीजन ची वाट पाहिली आणि पदरी दर दोन शिव्यानंतर अजून शिव्या असं काहीसं आलं.  झालं काय की ते, 'कुकू का जादू बादू' यात काही नव्हतं. यात सत्य होतं. आयुष्यातले सगळे दरवाजे बंद झाले की हतबल मनुष्य जितकी धडपड करता येईल तितकी करतो, मारतो, उडवतो, ओरडतो,  गुरु-पंथाच्या नादी लागतो, गंडे- दोरे बांधतो. ज्यावर विश्वास नाही ते सारेही करून पाहतो. गायतोंडेचा(नवाजुद्दीन) तिसरा बाप 'गुरुजी' हाही एक प्रकारचा झिंग देणारा धार्मिक कल्ट चालवत असतो जो मुंबई खतम करण्यासाठी गायतोंडेचा वापर करत असतो.  मागील सीजन गायतोंडेचा होता, त्याने कमाल केली. दुसरा सीजन सरताजसिंग (सैफ) चा आहे. तो शोधात आहे. जे काही सापडत आहे तो चकित आहे , शोधण्यासाठीची धडपड गायतोंडेचा इतिहास आणि संपणारी मुंबई, धर्माचे राजकारण आणि राजकारणातील भ्रष्ट्राचार हे सगळं इथं दाखवायचा प्रयत्न आहे. सीजन 1 पाहिला नसेल तर यातील 1-1 मूव्हचं संदर्भासहित स्पष्टीकरण कराव