Skip to main content

Posts

Showing posts from November, 2018

सलील चौधरी : एक श्रद्धांजली

बंगाल प्रांत हा मुळातच मुग्ध करणारा प्रदेश आहे. कलाप्रेमींवर तर बंगालची कायमच जादू राहिली आहे. के एल सेहगल पासून अनिल बिस्वास, एस डी, आर डी, हेमंतकुमार, किशोरकुमार, मन्ना डे ते लोकगीतं गाणारे कुणी अनामिक, इथलं संगीत अत्यंत मधुर, मोहक संगीत आहे. या सर्वांतच मला 'सलील चौधरी' या संगीतकाराने नेहमीच मोहवून टाकलं आहे. आज सलील चौधरी यांचा जन्मदिवस. सुरुवात झाली 'मधुमतीने'. एकूण 12 गाण्यांचं अप्रतिम प्रदर्शन. मुकेशची तरल "दिल तडप तडप" आणि "सुहाना सफर और ये मौसम हसीं", एकीकडे लताची आर्त हाक  "आजा रे परदेसी", खेळकर "घडी घडी मोरा दिल धडके" आणि "जुल्मी संग आँख लडी" तर दुसरीकडे मोहम्मद रफीची "टुटे हुए ख्वाबोंने" ते "जंगलमे मोर नाचा" अशी बहुरंगी गाणी. "दैय्या रे, दैय्या रे चढ गयो पापी बिछुआ" गाण्याप्रमाणे  लहानपणापासूनच सलीलदांनी मला झपाटून टाकलं. आणि फिल्मी गीतांच्या जादुई दुनियेत मी प्रवेश केला. मुकेशने सलीलदांच्या निर्देशनखाली ज्याप्रमाणे गायले आहे ते खरंच उल्लेखनीय आहे. अगदी 

आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर : एकदम कडक!!

व्यवसायाने प्रथितयश डेंटिस्ट पण, रक्तात अभिनयाची ओढ असलेला एक गोरा, घारा तरुण. केवळ एक प्रॉम्पटर म्हणून रंगभूमीशी नातं ते मराठी रंगभूमीचा पहिला-वहिला सुपरस्टार, मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतले मोठे स्थित्यंतर, एक टप्पा असा सगळा प्रवास असलेले डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यावरील बायोपिक. सुबोध भावे पुन्हा एकदा बायोपिकमध्ये म्हंटल्यावर मला आधी शंका होती. पण यावेळीही सुबोधने बाजी मारलीच आहे.  एका 'सुपरस्टार' चा उदय ते अंत त्याने खडतर प्रयत्नांनंतर लीलया साकारले आहे. सुबोध भावे मूलतः अतिशय अंतर्मुख माणूस आहे, त्याने साकारलेल्या भूमिकेच्या अगदी उलट. घाणेकरांच्या व्यक्तिमत्वाचा त्याने अंतर्बाह्य अभ्यास केलेला आहे हे अगदी जाणवतं. आमच्या पिढीला डॉक्टरांचे दर्शन फारसे घडले नाही (पाठलाग आणि गोमू संगतीने सोडून) पण सुबोध भावेनी ते घडवून आणले आहे. चित्रपटाच्या इतर कास्टिंगबद्दलही मला शंका होती पण सुलोचना दीदीं च्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी असो किंवा प्रसाद ओकचा प्रभाकर पणशीकर असो, त्यांनी चांगले बेअरिंग पकडले आहे.  एक स्वकेंद्री, बेदरकार, फटकळ, व्यसनी, विक्षिप्त, लफडेबाज, चाहत्यांच्

बधाई हो: मज्जेदार, लज्जतदार कॉमेडी

बधाई हो: मज्जेदार, लज्जतदार कॉमेडी कौशिक कुटुंब, मध्यमवयीन जोडपं, त्यांना एक तरुण मुलगा लग्नाला आलेला, तर दुसरा किशोरवयीन मुलगा, आणि आज्जी, हे दिल्लीतले एक सामान्य कटुंब. एखाद्या बाळाचं येणं एखाद्या कुटूंबासाठी किती आनंदाची गोष्ट असते. येणाऱ्या नव्या पाहुण्यासाठी सारे अगदी सज्ज असतात. पण कौशिक कुटुंबावर बॉम्ब पडतो जेव्हा 50शी उलटलेलं आलेलं जोडपं जितेंदर (गजराज राव) आणि प्रियंवदा (नीना गुप्ता) यांना नवीन बाळाची चाहूल लागते. या ' Good news' कडे घरातल्या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया, शेजारी, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या प्रतिक्रिया, प्रत्येकाचे वेगळे दृष्टिकोन या सगळ्या ची ही गोष्ट आहे. अमित शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.  नकुल (आयुषमान खुराना) हा कौशिकांचा मोठा मुलगा त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर, प्रेमजीवनावर याचा होणारा परिणाम हे जरी कथानक असले तरी ते सेकंडरी म्हणावे लागेल. खरी कथा आहे, तिसऱ्यांदा मूल होणाऱ्या, तेही 50शी उलटलेल्या, अशा जोडप्याची. गजराज आणि नीना यांचा अभिनय जबरदस्त आहे. गजराज राव यांना तर काही सीन्स मध्ये संवाद नसूनही केवळ हावभावांवरून