Skip to main content

लस्ट स्टोरीज: कथा चार, अनंत विचार

'बॉम्बे टॉकीज' या अँथॉलॉजि फिल्म नंतर त्याच दिग्दर्शकांनी पुन्हा एकदा एका थीम वर आधारित चार गोष्टींची मालिका आणण्याचा प्रयोग 'लस्ट स्टोरीज' च्या चार कथांमध्ये केला आहे. ज्यांना ज्यांना सांगितलं "पाहा जरूर", almost सगळ्यांच्या akward reactions आल्या. ( की बाई, तुला काही भीड, मुरवत आहे की नाही, हळू सांग की, या विषयावर अशी बोंबलतेस काय?) आणि काय सांगू, हीच थीम आहे. 'लस्ट स्टोरीज' केवळ 'शारीरिक वासना' इतकाच विषय नाही हाताळत. सेक्स, गरज, सामाजिक दृष्टिकोन आणि taboos, व्यक्तिस्वातंत्र्य आणि स्त्री..  एकंदर या सगळ्यावर आधारित आहेत लस्ट स्टोरीज. 

पहिली कथा अनुराग कश्यपची. राधिका आपटेने खाऊन टाकली आहे. लग्न झालेल्या बाईचे कलीग सोबत विद्यार्थ्यांसोबत fling. त्यातून होणारी सेक्स, रिलेशनशिप, प्रेम , गिल्ट, जेलसी यांची सरमिसळ सगळं सगळं ती आपल्यासोबत शेअर करते. नेहमीप्रमाणे प्रामाणिक अभिनय, कसलाही भपका नाही. 'Bold & Beautiful yet Confused' कालिंदी तिने मस्त रंगवलीये. आकाश ठोसर ला चांगली संधी मिळाली आहे, पण त्याने त्याच्या बोलण्यावर अजून काम केलं नाही तर तो सैराट फेम परश्याच राहील कायम. 

झोया अख्तरच्या कथेत भूमी पेडणेकर एका मोलकरणीच्या भूमिकेत आहे. बॅचलर घर मालकसोबतचे तिचे संबंध. त्याच घरी त्याचा 'मुलगी बघणे' कार्यक्रम आहे. आणि कसं या पुरुषालेखी आपण केवळ शारिरीक गरजेपुरतं खेळणं आहोत, आपली लायकी नसून आपण भलतीच स्वप्न  बघतोय का?, हे सगळं सगळं ती मूकपणे बघते आहे. आत कुठेतरी सलतंय, मन स्वतःलाच खातंय ही ओरडून सांगणारी तिची शांतता अप्रतिम काम करून जाते. 

पुढची कथा दिबाकर बॅनर्जीची. मध्यमवयीन बाईचे नवऱ्याच्या मित्रासोबत विवाहबाह्य संबंध.  दोन मुलांची आई, करिअर सोडून घरात बसलेली, स्मार्ट तरी संसाराचा वीट आलेली रीना मनीषा कोईरालाने साकारली आहे. नवऱ्याला आपल्यात काही इंटरेस्ट उरलेला नाही त्यामुळे उडणारे खटके, घुसमट त्यामुळे वेगळं काहीतरी शोधणारी रीना नवऱ्याच्या मित्रासोबतच बिन नावाचं नातं जगणारी. एकीकडे सलमानसोबत घट्ट मैत्री आणि दुसरीकडे त्याच्याच बायकोसोबत अकर्षणापुढे गेलेले नाते यात गुरफटलेला सुधीर, हा जयदीप अहलावतने खूप छान साकारला आहे. नात्यांना गंज चढतो तेव्हा ती आपापसात टक्करही मुश्किलीने देतात. स्वतंत्र अस्तित्व शोधू पाहणारी बायको, अपरात्री परपुरुषाकडे आहे हा विषय थोडक्यात संपवण्याचा प्रयत्न संजय कपूरने सलमानच्या surprisingly छोट्या भूमिकेत ठळक रंगवलाय. 

शेवटची कथा करण जोहरची. 'ती आणि तिचं अपुरं सेक्सलाईफ'. ती आहे कियारा अडवाणी. तिच्या नवऱ्याच्या भूमिकेत आहे विकी कौशल. शरीर संबंध हे केवळ पुरुषाच्या सुखासाठी, आणि मुले पैदा करण्यासाठी असतात असे समज बाळगणाऱ्या समाजासाठी 'Female orgasm' वर भाष्य करणं तसं कठीणच. असो. कथा आहे छान पण घेतलीये पक्की करण जोहर स्टाईल. करणची हॉलिवूड सीनची कॉपी पकडली गेली आहे. बरं तेही ठीक आहे, बरेच जण करतात कॉप्या, पण करण सरांनी नेहा धुपिया आणि कियारा सारख्या साडीत ड्रेसअप होणाऱ्या प्रोफेसर्स नेमक्या कोणत्या कॉलेजात असतात प्लीज सांगावे. कुणी काय घालावे हा अर्थात ज्याच्या त्याच्या प्रश्न आहे शेवटी, पण मला आपलं कुतूहल. 

एका थीमवर वेगवेगळ्या कथा, वेगवेगळी माणसं, नात्यांचे पदर, समाजाचा दुटप्पीपणा, माणूस आणि आदिम गरज यांचे सत्य 'लस्ट स्टोरीज' मध्ये आहेत. झोया आणि दिबाकार यांच्या कथांना 4/5, अनुराग कश्यप 3.5/5 आणि करण जोहर 3/5. 

बाकी चित्रपट न बघता अव्वा ईश्श्या करणाऱ्यांनो, नुसतं ट्रेलर पाहून लिहिणाऱ्या टीकाकारांनो आणि नको तिथे ज्यांच्या संस्कृतीचे घडोघडी पतन' होते म्हणून नावं ठेवणाऱ्यांनो, मी काय म्हणते, पाहा आणि मग बोला. बाकी चित्रपट रसिकांनो, 'नक्की पाहा'.. 

- रमा

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ