कोल्हापूरचा महापूर
नको नको ते राहून गेले
हवे हवे ते, वाहून गेले
पूरात उरल्या सुरलेल्यांना
सैतानच मग पाहून गेले
ढग फुटले नि कोसळला
रात्रंदिवस धो धो ढळला
किंकाळ्या मूक प्रेतांच्या
ऐकून, पाहून तळमळला
गुरे-ढोरे, जमिनी घरकुल
आणि फुटके-तुटकेसे पूल
जीव वाचूनही सारे गेले
जसे एखादे कुस्करले फूल
म्हणे 'कलयुग' आले कोणी
कुणी सांगी भविष्य वाणी
मला फक्त दिसत राहते
भयाण पावसाचे पाणी
आले उठून हात मदतीचे
दिवस-रात देण्या साथीचे
कोण-कुणाचे नाही तरीही
'आपला' या एका नात्याचे
एकमेकांपासून होते दूर
जोडी त्यांना हा महापूर
मदतीला जे पुढे धावते
ते कोल्हापूर, ते कोल्हापूर
- ©रमा
PC-The Hindu
Comments
क्या बात है !!
आमच्या भावनांना तुमचे शब्द !