परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ...
मंगेश जोशींचा 'कारखानीसांची वारी' हा अतरंगी चित्रपट पाहिला. लिओ टॉलस्टॉयची एक अतिशय प्रसिद्ध कादंबरी आहे ऍना कॅरेनिना. त्याच्या सुरुवातीला एक कोट आहे. "All Happy families resemble one another, but each unhappy family is unhappy in its own way.’'. 'कारखानीसांची वारी Ashes on a road trip' हाही या कोटने सुरू होतो. एक सर्वसाधारण एकत्र कुटुंब. ज्यातील ज्येष्ठ व्यक्ती पुरुषोत्तम कारखानीस याचे निधन झालेले आहे. त्याच्या अंतिम इच्छेनुसार आता त्याचे 3 वयस्कर भाऊ , एक बहीण आणि मुलगा त्याच्या अस्थी गावाकडल्या घरात, शेतात आणि शेवटी पंढरपूरला चंद्रभागेत विसर्जित करण्यासाठी निघाले आहेत. अस्थीविसर्जन झाल्यानंतर एका लाखोट्यातील पत्राचे वाचन करावे असेही सांगून ठेवले आहे. आता कारखानीस परिवार एक टिपिकल मध्यमवर्गीय एकत्र कुटुंब आहे. एकत्र असूनही प्रत्येकाची वेगळीच कहाणी आहे. वेगळीच सुखदुःखे, जगण्याची ओझी आहेत. पण एकमेकांना सांगायची चोरी असे हटवादी आणि अहंकारी प्रत्येकाचे स्वभाव. लखोट्यातील पत्रात इच्छापत्र असेल आणि माझ्या वाट्याला काही ना काही नक्कीच आले असेल जगणे तरून जायला असा प...