Skip to main content

Posts

Showing posts from 2016

'व्हेंटिलेटर आणि मी'

'व्हेंटिलेटर'...ICU किंवा IICU च्या बाहेर  चिंताक्रांत, जीवाचं रान, डोळ्यात प्राण आणून, जाणून घ्यायला आतुर, पेशन्ट कसा आहे?? किती तरी जण नातेवाईक, मित्रमंडळी..अगदी सोमेे-गोमे सुद्धा.. पेशन्ट च्या प्रत्येक श्वासाबरोबर वर-खाली होणारा त्यांचा श्वास..कुणाचे बदलणारे भाव, कुणाच्या नवीन श्रद्धा/अंधश्रद्धा.. कुणाचे अजब सल्ले..हॉस्पिटल सारख्या जागी वागणारी माणसे, डॉक्टर्स..सिस्टर्स, ब्रदर्स.. काय करावं?? काय करावं?? 'अब इन्हे दवोंकी नही, दुवाओंकी जरूरत है' टाईप काहीसं सांगितल्यावर जवळच्यांनी मोठ्याने किंवा मनोमन फोडलेला टाहो.. काचेच्या आत असलेला आपला सगा, डॉक्टरी भाषेत केवळ पेशन्ट असतो..अशा शेकडो केसेस त्यांनी हाताळल्या असतात की त्यांची मनं खूप तय्यार असतात 'पेशन्टच्या हर तऱ्हेच्या रिस्पॉन्स साठी'..  मला कल्पना आहे या सगळ्या अग्निदिव्यातून आपले नातलग, मित्रपरिवार जात असतात, कुठं तरी अंधुक आशा असते, व्हेंटिलेटरवर आहे म्हणजे सगळं संपलं असं नाही..अजून चान्स आहे..2012 मध्ये काही लोकांनी तो चान्स घेतला आणि आज ती व्हेंटिलेटर वर ठेवलेली मुलगी 'व्हेंटिलेटर' सिनेमा ...

अस्तु: So be it !

अस्तु पहिला!! आणि खूप काही देऊन गेला मला हा चित्रपट... अस्तु कथा आहे प्राध्यापक शास्रींची. संस्कृतचा गाढा अभ्यास असलेला, अनेक संस्कृत वचने, सुभाषिते ज्यांना मुखोद्गत आहेत, ज्याला ताओचे तत्वज्ञान ज्ञात आहे असा , एकेकाळी शब्दप्रभु म्हणून नावाजला जाणारा मोठा पंडित, 'मी कोण' याचेही उत्तर विसरतो. अस्तु कथा आहे अल्झायमर्स या व्याधीनं व उतारवयानं ग्रासलेल्या त्या प्राध्यापक शास्त्रींची उर्फ आप्पांची...ज्याच्या स्मृती फिक्या फिक्या होऊन आता स्मृतिपटल म्हणजे निव्वळ कोरा कॅनव्हास उरला आहे..ही कथा आहे त्यांच्या कुटुंबियांची, प्रियजनांची जे या रुग्ण वृद्ध बापाला सांभाळण्याच्या वेगळ्याच विचाराच्या गर्तेत आहेत.. त्यांना एखाद्या रुग्णालयात किंवा संस्थेत ठेवावं का, या डायलेमा मध्ये अडकले आहेत.. त्यांच्यातला कितीसा अंश त्यांचा स्वतःचा उरलेला आहे आणि किती एखाद्या पूर्णपणे अनोळख्या व्यक्तीचा आहे या संभ्रमात आहेत. अप्पा एक दिवस रस्त्यात गर्दीत हरवतात, एका हत्तीला पाहून उत्सुकतेने त्याच्या मागोमाग फिरायला लागतात. हत्ती, जो आपल्या स्मरणशक्तीसाठी प्रसिद्ध आहे त्याच्या पाठीमागे हा ओळख हरवल...

मेघ पाहुनी बावरले..

मेघ पाहुनी, निळे सावळे बावरले कृष्णा, मी मेघ पाहुनी बावरले.. एक घटा, बरसुनी गेली ती मी पण पाणी पाणी झाले, रे कृष्णा, मी मेघ पाहुनी बावरले... मीरेच्या गिरीधर गोपाळा तव प्रीतीमुळेच सावरले, रे कृष्णा, मी मेघ पाहुनी बावरले.. . - रमा (माझी मीरा)

सैराट..

खरंतर मला सैराट वर लिहायचा अत्यंत कंटाळा आला होता, खरंतर पाहायला जायचाही कंटाळा आला होता. 'ईशकजादे' असेल असंही मी पिक्चर न बघताच समज करून घेतला होता ( काही लोकेशन्स ते ट्रेनचं, शेतांचं वगैरे बॅकग्राऊंड) .. पण एका मेसेज वर रिप्लाय करता करता हे ओकलं. मेसेज साधारण असा होता की बाबांनो सैराट जास्त सिरियसली घेऊ नका, नाहीतर जन्मभर डोशांच्या गाडीवर कांदे कापावे लागतील, अभ्यास करा, जेव्हा व्हायचं तेव्हा प्रेम , लग्न- बिग्न होईल, वगैरे कोण्या एका पालकाची व्यथा मांडली होती. मी फार समर्थन करत नाही पळून जाऊन लग्न करण्याचं, पण 0 तुन संसार उभा करण्याची ताकद कमावलीच ना आर्चि , परशानं ? आज कित्येक IT वाले नोकरी नाही म्हणून घरी बसून आहेत, फॅक्टरीत काम करून, डोश्याच्या गाडीवर कांदे कापून का होईना स्वतःचं घर येण्याइतपत हिम्मत किती जण दाखवतील? कुठलंही काम इमाने इतबारे केलं तर ते कमी दर्जाचं नाही. मी म्हणेन सैराट बघा एका वेगळ्या अँगलनं, आणि ऑनर किलिंगचा निषेध करा. ( ई, असं सांगणं म्हणजे खरंतर 'त्या पाक सपोर्टर खानड्यांचे पिक्चर बघू' नका टाएप चं आहे), मी पण...

योगायोग..

मंगेश पाडगांवकर आणि कुसुमाग्रज दोघेही माझे आवडते.. पाडगांवकर अगदी प्रांजळपणे कबूल करतात की सुरुवातीच्या काळातील त्यांच्या कवितांवर कुसुमाग्रजांची छाप आहे. १६ व्या वर्षी जेव्हा पाडगांवकरांच्या कवितेला नुकतेच धुमारे फुटत होते, कुसुमाग्रजांचा 'विशाखा' काव्यसंग्रह त्यांना तोंडपाठ होता. तसा तो पार सत्तरीनंतरही होता. कुसुमाग्रज 'धनुर्धारी' मासिकाचे संपादक असताना, पाडगांवकरांनी त्यांच्या ऑफिसात घुसून त्यांना आपल्या कविता वाचायला दिल्या.तिच्यावर कुसुमाग्रजांची छाप दिसत होतीच. असे2-3 वेळा झाले, कुसुमाग्रज प्रत्येकवेळी हसत..'लिहित रहा' म्हणत . धनुर्धारीच्या एका दिवाळी अंकात कुसुमाग्रजांची 'महाकालीस' ही क्रांतीचे आवाहन करणारी कविता छापून येणार होती, ती वाचल्यावर पडगावकरांनी त्यावर उत्तर म्हणून एक कविता लिहिली आणि कुसुमाग्रजांना दाखविली. कुसुमाग्रज नुसते हसले. आणि त्या वर्षीच्या दिवाळी अंकात दोघांच्याही कविता छापून आल्या.. पाडगावकरांच्या कवितेला मिळालेला तो एक विलक्षण सन्मान होता. ७० वर्षांचे असताना त्यांना पुन्हा एकदा कुसुमाग्रजांना भेटायचा योग आला. 68 ...

'सलाम'

आज मंगेश पाडगावकरांचा वाढदिवस. ऊफ्फ ते गेले नाही का.....जयंती..त्यांची जयंती! ते 2-3 वेळा घरी येऊन गेले असतील,पण त्या माणसानं मला वेड लावलं. तसं वेड अनेकांनी लावलं, पण भेटता आलं फक्त यांनाच. आपली कविता सादर कशी करावी, 'कोई इनसे सिखें'.. त्या जाड काचेच्या चष्म्यातून डोळ्यातलं भावदर्पण प्रेक्षकां ना अर्पण कसं करावं..आणि आपल्या वाचकांच्या 'वाह वा' ला ही आपणच दाद कशी द्यावी, यांच्याकडूनच शिकावं.. ना विषयाचं, ना वयोमानाचं, कसलंच बंधन नसे या माणसाला. सुखं-दुःख, अनुभव, कल्पना साऱ्या साऱ्या पलीकडल्याही वास्तवाचं दर्शन घडवणारं हे निराळाचं रसायन. ' रस्ता चुकलेलं त्यांचं वेडं कोकरू जेव्हा आईच्या कुशीत शिरतं, आपल्या जीवात जीव येतो, आईची उब जाणवते . कधी संध्याकाळी मनात काहूर माजतं, ते म्हणतात, 'डोळ्यात सांजवेळी, आणू नकोस पाणी'... मीडियाचा मुजोरपणा आणि आतंकवाद, वाढती असहिष्णुता याने आपलं मन हतबल झालं की ते म्हणतात,  ' कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी..गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी' हिडीस गाण्यावर थिरकणारी तरुणाई पाहून मला आठवते त्यांचे, ...